Healthy Food sakal
आरोग्य

मनाची शक्ती : आरोग्यवर्धक ‘सुपरफूड’

आपल्या आहारात ‘सुपरफूड’चा समावेश असणे अत्यंत आवश्‍यक आहे. सहज उपलब्ध होणारे पाच सुपरफूड कोणते याची माहिती जाणून घेऊया.

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. हंसा योगेंद्र

आपल्या आहारात ‘सुपरफूड’चा समावेश असणे अत्यंत आवश्‍यक आहे. सहज उपलब्ध होणारे पाच सुपरफूड कोणते याची माहिती जाणून घेऊया. थोड्या प्रमाणात त्यांचे सेवन केले तरी शरीरासाठी उपयोगी आहेत.

त्यामुळे कर्करोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, प्रतिकारशक्ती कमी असणे, पित्त हे विकार दूर राहतात. तसेच, ताकद व एकाग्रता वाढणे, मेंदूला विश्रांती मिळणे, झोप शांत लागणे यासाठीही सुपरफूड उपयुक्त आहेत.

दही

दह्यात कॅल्शिअम, जीवनसत्त्वे बी-२ व बी-१२, पोटॅशिअम, मॅग्नेशिअमचे प्रमाण भरपूर असते. कॅल्शिअममुळे हाडे मजबूत होतात. लॅक्टोबेसिलमुळे पचनशक्ती सुधारते. शरीरातील विविध प्रकारचे विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते.

योनी आणि मूत्रमार्गात होणारे विविध संसर्ग बरे होतात. त्वचेतील कोरडेपणा कमी होतो. रोजच्या जेवणात किंवा नाश्‍त्यात दह्याचा समावेश अवश्‍य करा. रात्रीच्या वेळी दही खाऊ नये. ताक पिणेही आरोग्यासाठी उत्तम आहे.

आवळा

आयुर्वेदानुसार वात, पित्त आणि कफ या त्रिदोषांवर रामबाण औषध म्हणून आवळ्याकडे पाहिले जाते. आवळा हा रक्त शुद्ध करणारा प्रमुख घटक आहे. त्याच्यात असलेल्या जीवनसत्त्व ‘क’मुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते.

तुम्हाला सतत सर्दी-खोकला होत असल्यास रोज आवळा खा. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढेल. आवळ्यातील कॅरोटिनमुळे दृष्टी सुधारते. मूत्राशयाचे विकार बरे होतात. केस गळतीवर आवळा फायदेशीर आहे. आवळ्याचा रस आणि एक चमचा मध एकत्र घेतल्याने अनेक लाभ होतात.

शेंगदाणे

रोज १०० ग्रॅम शेंगदाणे खाल्ल्यास शरीराला पुरेशा प्रमाणात प्रथिन्यांचा पुरवठा होतो. हृदयासाठी आवश्‍यक असलेल्या फॅटी ॲसिडचे प्रमाण दाण्यांमध्ये मुबलक असते. शेंगदाण्यामधील सेरोटोनिनमुळे मेंदूला चालना मिळते. शेंगदाण्यांतील ऑलिक ॲसिडमुळे शरीराला आवश्‍यक असलेल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

कच्चे किंवा भाजलेले दाणे खाण्यापेक्षा उकडलेले खाणे अधिक लाभदायक असते. त्यामध्ये साध्या दाण्यांपेक्षा चार पट अधिक ॲन्टिऑक्सिडन्ट्स असतात. शेंगदाण्यांना गरिबांचे बदाम असे म्हटले जाते, त्यामुळे ते कुठेही सहजपणे उपलब्ध होतात.

तूप

तूप हा भारतीय खाद्यसंस्कृतीतील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे पूर्वीपासूनच आपल्याकडे पोळी, विविध गोड पदार्थ, आमटी, भाज्यांमध्ये तूप घातले जाते. तुपात ओमेगा २ फॅटी ॲसिड असते. त्यामुळे बुद्धी तल्लख व शरीर निरोगी होते. शरीराला ऊर्जा मिळते.

रोज किमान एक चमचा तूप आहारात असावे. तूप खाल्ल्याने त्वचा तजेलदार होते. आयुर्वेदानुसार तूप खाल्ल्याने दृष्टिदोष जातात. स्नायूंच्या मजबुतीसाठीही तूप फायदेशीर आहे. तुमच्या जेवणात तूप नसल्यास अगदी आजपासूनच ते खाण्यास सुरुवात करा. त्याचे फायदे तुम्हाला नक्कीच दिसून येतील.

पपई

बद्धकोष्ठता, सूज येणे अशा विविध विकारांचे प्रमाण पपईच्या सेवनाने कमी होते. पपईतील पपेन या घटकामुळे पचन प्रक्रियेत अडथळा निर्माण करणारे प्रथिने नष्ट होतात आणि पचनक्रिया सुरळीत होते.

पपईत लायकोपेनमुळे स्तनांचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो. शरीरातील दाह कमी होण्यास व स्नायूंचे दुखणे कमी होण्यासही मदत होते. रोज पपई खाणे तुम्हाला निरोगी ठेवते.

सामान्य माणसाला परवडणाऱ्या आणि सहज उपलब्ध होऊ शकणाऱ्या अशा या सुपरफूडचा आहारात आवर्जून समावेश करा आणि त्यामुळे होणारे सकारात्मक बदल बघा. शरीराच्या अनेक तक्रारी कमी होत असल्याचे तुम्हाला जाणवेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT