improve the digestive system sakal
आरोग्य

मनाची शक्ती : पचनसंस्था सुधारण्यासाठी...

आपल्या पचनसंस्थेच्या सुरळीत कार्यासाठी काही काळजी आणि लक्ष देणे आवश्यक आहे.

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. हंसा योगेंद्र

आपल्या पचनसंस्थेच्या सुरळीत कार्यासाठी काही काळजी आणि लक्ष देणे आवश्यक आहे. पाचक प्रणाली नियमितपणे रिसेट करणे गरजेचे आहे.

पचनसंस्थेची काळजी घेण्याचे काही नैसर्गिक मार्ग समजून घेऊया.

जिव्हा मूल शोधन क्रिया

या क्रियेमध्ये जिभेचे मूळ स्वच्छ करणे अपेक्षित आहे. हे शुद्धीकरण संपूर्ण पचनाच्या प्रक्रियांवर परिणाम करते. हे तंत्र सकाळी उत्तम प्रकारे केले जाते.

  • वॉश बेसिनसमोर उभे रहा.

  • दात घासल्यानंतर, यू-आकाराच्या जीभ क्लिनरने तुमची जीभ स्वच्छ करा.

  • नंतर तुमचा जबडा अधिक उघडा. तर्जनी आणि मधली बोटे तोंडात घाला आणि ते जिभेच्या मुळाशी खूप मागे घासून घ्या.

  • जीभ २-३ वेळा चोळत राहा

  • पाण्याने गार्गल करा.

  • या क्रियेमुळे पचनक्रिया वाढते त्याचबरोबर बद्धकोष्ठता दूर होते. ही क्रिया सकाळी लवकर रिकाम्या पोटीच केली पाहिजे.

पश्चिमोत्तनासन

  • हे आसन ओटीपोटात ताण निर्माण करतो. त्याचे टप्पे आहेत…

  • पाय समोर ताठ हात आपल्या बाजूला पसरवून बसा.

  • शक्य तितके आपले डोके हळूवारपणे गुडघ्याच्या दिशेने वाकवा.

  • दोन्ही हाताने पायाचे तळवे पकडण्याचा प्रयत्न करा

  • काहीक्षण या स्थितीत स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. श्वासोच्छास सुरूच ठेवा.

  • एकाच वेळी तीन वेळा हा सराव करा.

  • हे आसन पोटाला मालिश करते आणि चरबी कमी होते. बद्धकोष्ठता, कमकुवत झालेली पचनशक्ती पूर्ववत होण्यास मदत होते.

भस्त्रिका प्राणायाम

  • हा उत्साहवर्धक प्राणायाम शरीर शुद्ध करण्यासाठी ऊर्जा निर्माण करतो.

  • कोणत्याही ध्यानाच्या आसनात बसा.

  • दीर्घ श्वास घ्या.

  • श्वासोच्छवासाच्या वेळी ओटीपोट आत खेचा आणि बाहेर सोडा.

  • काही काळ ही क्रिया करा. ती करताना श्वास घेताना ऐकू येईल असा अनुनासिक आवाज करा.

  • श्वासोच्छवासाचा वेग तुमच्या क्षमतेनुसार ठेवा. तो लयबद्ध आणि नियंत्रित असल्याची खात्री करा.

  • प्रत्येक फेरीत दहा श्वास चक्रांचा सराव करा. साधारणपणे श्वास घेऊन दरम्यान काही सेकंद आराम करा.

  • एकावेळी तीन पेक्षा जास्त फेऱ्यांचा सराव करू नका.

  • भस्त्रिका प्राणायाम शरीरात चयापचय वाढवण्यासाठी आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी अग्नी किंवा ऊर्जा प्रज्वलित करते. हे शरीरातील वात, पित्त आणि कफ दोष देखील स्थिर करते. हा प्राणायाम सकाळी लवकर रिकाम्या पोटी केले पाहिजे.

प्रोबायोटिक अन्न

ही पद्धत अतिशय सोपी आहे. तुमच्या आहारात प्रोबायोटिक पदार्थांचा समावेश केल्याने तुमच्या पचनसंस्थेतील फायदेशीर बॅक्टेरिया वाढू शकतात. आंबवलेल्या अन्नामध्ये प्रोबायोटिक्स असतात. ते आपल्या शरीराच्या कार्यक्षम कार्यासाठी आवश्यक असलेले जिवंत जीवाणू असतात. ते पचनास मदत करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. ५) महिन्यातून एकदा फळांचा आहार तुमची पचनशक्ती रिसेट करण्यासाठी पचनक्रियेला थोडा विश्रांती द्यावी लागेल.

यासाठी महिन्यातून एकदा फलाहार घ्या. कोणत्याही प्रकारची फक्त ताजी फळे खावीत. लिंबूवर्गीय फळांना प्राधान्य द्या. केळी फायबर समृद्ध असतात आणि त्यात इन्शुलिन असते, एक पदार्थ जो आतड्यात चांगल्या बॅक्टेरियाच्या वाढीस उत्तेजन देतो.

सफरचंद, पीच, अंजीर, डाळिंब, द्राक्षे, अननस, किवी ही फळे देखील तुमच्या पचनशक्तीसाठी उत्तम आहेत. फलाहाराच्या काळात भरपूर पाणी पिणे आणि कॉफी आणि चहासारखी पेये टाळणे महत्त्वाचे आहे. हलका आहार घेत असताना जास्त व्यायाम करणे टाळा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Constituency: मनसेनं २००९ मध्ये कोणते मतदारसंघ जिंकले होते? ते आमदार आता कुठे आहेत? राज ठाकरेंना पुन्हा यश येणार?

Latest Marathi News Updates live : shivsena live: शरद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर, राज्यात ५५ पेक्षा जास्त सभा घेणार

Tax Evasion: देशात 18,000 बनावट कंपन्या; सरकारची 25,000 कोटी रुपयांची फसवणूक, काय आहे प्रकरण?

शेवटी आईच ती! दिवाळीच्या सुट्ट्या संपवून शूटिंगला परतणाऱ्या सिम्बाला निरोप देताना हमसून रडली माउली, नेटकरी म्हणाले-

Sawantwadi Election : सावंतवाडीत राजकीय 'संशयकल्लोळ'; बंडखोरीमुळे मतदारसंघात पेच, कोण कोणाची मते पळवणार?

SCROLL FOR NEXT