प्रत्येक गृहिणीला स्वयंपाक करताना विशेष काळजी घ्यावी लागते. प्रत्येकाची आवड निवड जपताना त्यांच्या आरोग्याचीदेखील तितकीच काळजी घेणं महत्त्वाच असतं. त्यासाठी स्वयंपाक करताना प्रत्येक गृहिणी निवडक धान्यांची खरेदी करतेच. त्याच बरोबर तेलाची खरेदी करतानाही विशेष काळजी घेताना दिसते. ( which oil to use for cooking )
शेंगदाणा तेल, सोयाबीन तेल, सूर्यफुलाचं तेल, खोबरेल तेल, पाम तेल, ऑलिव्ह ऑईल, मोहरी तेल किंवा अॅव्होकॅडो तेल असे अनेक तेल बाजारात उपलब्ध आहेत. पण कधी कधी तेल खरेदी करताना महिलांचा गोंधळ उडतो. आरोग्यासाठी नेमकं कोणतं तेल फायद्याचे आहे? असा प्रश्न पडतो. पण टेन्शन घेण्याचे काही कारण नाही. कारण आज तुम्हाला आम्ही एका खास व्यक्तीचा सल्ला सांगणार आहोत.
अभिनेत्री माधुरी दिक्षितचे पती डॉक्टर श्रीराम नेने यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डॉ. नेने नेहमी आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोग्यासंदर्भात अनेक सल्ले देत असतात. आत त्यांनी स्वयंपाक करताना कोणत्या तेलाची निवड करावी याची माहिती टिप्स दिले आहेत. जाणून घेऊया.
राईस ब्रेने ऑईल पॉली आणि मोनो अनसॅचुरेटेड फॅक्ट्सचा फार मोठा स्त्रोत आहे. या तेलाचा जेवण बनवण्यासाठी वापर केल्यास शरीरात कोलेस्ट्राल मर्यादीत राहते. तसेच, हृदयविकार आणि मधुमेहाचा त्रासदेखील कमी होतो असे डॉक्टर नेने यांनी आपल्या इंस्टावरील व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.
शेंगदाण्याचे तेल
स्वयंपाक करताना तुम्ही शेंगदाण्याच्या तेलाचा वापर करा. शेंगदाण्याच्या तेलाद्वारे शरिराला ला ई व्हिटॅमीन मिळतं. तसेच शरिरात अनसॅचुरेटेड फॅटच्या जागी सॅचुरेटेड फॅट तयार होते. ज्यामुळे तुमच्या शरीरात कोलेस्ट्रालचं प्रमाण नियंत्रणात राहातं. त्यामुळं जेवणात शेंगदाण्याचे तेल फायद्याचे ठरेल.
मोहरीचे तेल फायद्याचे
जेवण बनवताना तुम्ही मोहरीच्या तेलाचाही वापर करु शकता. मोहरीच्या तेलाचा वापर केल्यामुळे तुमचा रक्त दाब नियंत्रणात राहातो. तसेच हृदयविकारांसारखे आजारदेखील उद्भवणार नाहीत.
ऑलिव्ह ऑईल
ऑलिव्ह ऑईल इतर तेलांच्या तुलनेत आरोग्यासाठी अधिक फायद्याचे आहे. ऑलिव्ह ऑईलचा वापर केल्यास हृदयविकारांचं प्रमाण पाच ते सात टक्क्यांनी कमी होतो. ऑलिव्ह ऑईलमध्ये असलेल्या मोनोसॅच्युरेटेड फॅटी अॅसिडमुळे ते सर्वाधिक फायदेशीर ठरतं. यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, पॉलीफेनॉल्स आणि झाडांमध्ये आढळणारे मायक्रोन्यूट्रिएंट्स असतात.
तिळाचं तेल
तिळाच्या तेलामध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व आढळले जातात. तिळाच्या तेलात ओमेगा 3, ओमेगा – 6 आणि ओमेगा -9 फॅटी ऍसिट असतं. या पोषक तत्वाची गरज आपल्या शरीराला, केसांना आणि त्वचेला असते. तसेच या तेलाचा जेवणात वापर केला तर रक्त दाब नियंत्रणात राहातो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.