Dr Vidhi Bhanushali writes about Take stains on teeth seriously  sakal
आरोग्य

Oral hygiene : दातांवरील डाग गांभीर्याने घ्या!

चेहऱ्यावर त्वचारोग असलेल्या लोकांना आपण फार चांगले वागवत नाही.

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. विधी भानुशाली

Oral hygiene : दा त हा आपल्या शरीराचा मौल्यवान आणि मजबूत (इनॅमल) भाग आहे. तरीही मौखिक आरोग्याला कोणी गांभीर्याने घेताना आपण क्वचितच पाहतो. चेहऱ्यावर त्वचारोग असलेल्या लोकांना आपण फार चांगले वागवत नाही.

पिवळे, तपकिरी, लाल डाग असलेले तोंड घेऊन फिरणारे अनेक लोक आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात आणि ते आपल्या समाजात अगदी नॉर्मल समजले जातात. आपण केवळ शरीरारातील दिसणाऱ्या भागांची काळजी घेतो कारण सौंदर्याशी कोणालाही तडजोड करायची नाहीये.

हाच दृष्टिकोन मौखिक आरोग्य संदर्भात ३६० अंशाने बदलतो, कारण प्राथमिक शिक्षणामध्ये मौखिक आरोग्य फक्त दात दिवसातून दोन वेळा घासणे यापुरताच मर्यादित आहे.

७० टक्के भारतीयांना दात किडण्याचे आणि ५५ टक्के भारतीयांना हिरड्यांचे आजार आहेत. यातील केवळ १३ टक्के लोक डेंटिस्टकडे जाऊन उपचार करून घेतात. दातांचे आजार हे त्वचेपेक्षा खूप निराळे असते. खूप सारे आजार आपोआप बरे होऊ शकतात.

परंतु दातांवरील कीड एकदा सुरू झाल्यानंतर फक्त वाढत जाते. अगदी सुरुवातीच्या अवस्थेत आपण दंतरोग प्रतिबंध करू शकतो परंतु बरेच लोक वेदना आणि सूज असहाय्य होते तेव्हाच दंतचिकित्सा करतात. यात फक्त एका व्यक्तीचा दोष नाही.

दंतरोगासारखा व्यापक आजाराचे प्रतिबंध करण्यासाठी आपल्याला ‘सार्वजनिक-केंद्रित’ आणि ‘समुदाय-केंद्रित’ दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज आहे. तुम्हाला माहिती आहे का? डागाळलेले दात, किडलेले दात, हिरड्यांमधून रक्त येणे आणि श्वासाची दुर्गंधी हे हृदयाच्या समस्या, मधुमेह, स्मरणशक्ती कमी होणे आणि आपल्या मुलाचा जन्म धोक्यात येण्यासारखे आहे.

खरंच... तोंडाचे सर्व रोग थेट हृदय, बुद्धी आणि प्रजनन प्रक्रियांवर परिणाम करतात आणि विद्यमान परिस्थिती आणखी बिघडवत राहतात.

आपल्याकडे टूथब्रशपेक्षा जास्त लोकांकडे स्मार्टफोन आहे. या फोनप्रमाणेच आपण सर्वांना स्मार्ट बनायची गरज आहे. आपले दंतआरोग्य स्वस्थ ठेवण्याची पहिली पायरी आहे स्वतः करायची तपासणी.

आपण रोज चेहरा आरशात पाहतो, तसेच दातांवरचे डाग, सुरू झालेली कीड आपण स्वतः तपासू शकतो. दुसरी पायरी म्हणजे दंतआरोग्य बद्दलचा आपला दृष्टिकोन उपचारात्मक कडून प्रतिबंधात्मक बनवणे. दातांवरील डाग स्केलिंग प्रक्रियेने काढले जाऊ शकतात, यामुळे कॅलक्यूलस जमा होण्यापासून रोखले जाऊ शकतो. दातावरील कीड अगदी सुरुवातीच्या स्थितीमध्ये असताना फिलिंग ट्रीटमेंट करून रूट कॅनाल पासून वाचवला जाऊ शकतो.

आधुनिक भारतामध्ये अन्न, निवारा आणि वस्त्र या मूलभूत गरजा समाविष्ट आहेत. प्रत्येकाला आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छता या नवीन मूलभूत गरजांचा समावेश असेल, आणि हा बदल आपण स्वतः घडवायचा आहे. माझा विश्वास आहे की, आपण प्रतिबंधात्मक आरोग्याच्या चांगल्या परिणामांबद्दल जागरूक होऊ आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपले आरोग्य रक्षण करू, तेव्हा आपण सर्व चमकदार आणि आरोगी दातांनी हसू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीमध्ये अजित पवारांनी घेतली आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT