recovery from depression Sakal
आरोग्य

नैराश्यातून उभारीसाठी...

पौगंडावस्थेतील; तसेच तरुणाईतील अस्वस्थतेचा आणि नैराश्याचा आजार यांच्याविषयी आपण माहिती घेत आहोत.

डॉ. विद्याधर बापट, मानसतज्ज्ञ

पौगंडावस्थेतील; तसेच तरुणाईतील अस्वस्थतेचा आणि नैराश्याचा आजार यांच्याविषयी आपण माहिती घेत आहोत. या आजाराची लक्षणं आणि परिणाम यांची माहिती आपण गेल्या आठवड्यात बघितली. आता कारणं आणि उपाय यांच्याविषयी माहिती आपण घेऊया. या नैराश्याच्या आजाराचं मुख्य कारण म्हणजे मेंदूतील रासायनिक बदल/ असंतुलन होय.

आजारास साह्यभूत ठरणारे घटक

कुटुंबाचा पूर्वेतिहास - आनुवंशिकता : आपत्ती; तसेच इतर ताण : परीक्षेतील अपयश, आई-वडिलांमधील सततच्या भांडणांमुळे येणारा ताण, घरातील तणावाचं वातावरण, जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूचा धक्का या सर्वांतून निर्माण होणारा ताण, एकतर्फी प्रेमातलं अपयश, आयुष्यातील यशाबद्दलच्या चुकीच्या कल्पना; झपाट्यानं बदलणारी सामाजिक परिस्थिती, दहशतवाद इत्यादींची नीट न होणारी उकल, भोवतालचा चंगळवाद आणि चांगले गुण मिळूनही भ्रष्टाचारामुळे हव्या त्या अभ्यासक्रमाला नाकारला गेलेला प्रवेश.

नकारात्मक व्यक्तिमत्त्व : स्व-प्रतिमा क्षीण असणं, आयुष्याविषयी नकारात्मक दृष्टिकोन.

आरोग्याच्या तक्रारी : गंभीर स्वरूपाच्या आरोग्याच्या तक्रारी.

बाल्यावस्थेतील आघात (Early childhood trauma) : लहानपणी ओढवलेला दुर्दैवी प्रसंग व आघात.

इतर मानसिक आजार : इतर गंभीर मानसिक आजारांबरोबरसुद्धा नैराश्याचा आजार असू शकतो. उदाहरणार्थ, स्किझोफ्रेनिया, अस्वस्थतेचे आजार, व्यसने, Eating disorders वगैरे.

उपाययोजना : तज्ज्ञाच्या सल्ल्याने औषधोपचार हा उपाय आहेच; पण त्याचबरोबर वेगवेगळ्या सायकोथेरपीज, कॉग्निटिव्ह बिहेविअर थेरपी (सीबीटी) व माइंडफुलनेस-बेस्ड कॉग्निटिव्ह थेरपी (एमबीसीटी). डिप्रेशनच्या उपचारामध्ये औषधांबरोबरच या थेरपी अतिशय महत्त्वाच्या आहेत.

सायकोथेरपी, सीबीटी व एमबीसीटीचे उपयोग

  • कशा प्रकारचे वर्तन, भावना व कल्पना हा आजार वाढण्यास कारणीभूत ठरल्या हे जाणून घेण्यात मदत होते.

  • ज्या घटना व प्रसंगांमुळे आजाराला चालना मिळाली त्यांना त्यावेळी कसे सामोरे गेलो व कसे जायला हवे हे जाणून घेणे.

  • भावनांवर ताबा कसा मिळवावा व आनंद कसा मिळवावा आणि टिकवावा याचे शिक्षण.

  • परिस्थितीशी जुळवून घेण्याची कला व समस्येतून मार्ग काढण्याची कला.

  • तणावाचा उगम/स्रोत शोधणे.

  • सकारात्मक दृष्टिकोनाची जोपासना करण्यास शिकवले जाते.

  • आयुष्यातील प्राथमिकता ठरवणे / बदलणे शिकवले जाते.

  • योजनाबद्ध पद्धतीने, पायरीपायरीने विचार व कृती करण्याची सकारात्मक पद्धत शिकणे अर्थात नकारात्मक पद्धत बदलणे.

  • रिलॅक्सेशन थेरपीज, पॉझिटिव्ह रिजनरेशन इमेजरीज, क्लिनिकल ट्रान्स; तसेच तणाव नियोजनाच्या विविध पद्धती शिकवल्या जातात.

  • एमबीसीटीमध्ये प्रत्येक क्षणात, वर्तमानात, स्वस्थ कसे राहावे; तसेच तटस्थपणे स्वतःकडे, परिस्थितीकडे कसे पाहावे, हे शिकवले जाते. काही ध्यानाच्या पद्धती शिकवल्या जातात.

स्व-मदत : औषधे व सायकोथेरपीबरोबरच खालील गोष्टी आजारातून बाहेर पडण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्या तज्ज्ञांच्या सल्ल्याने कराव्यात. -

  • योग्य व संतुलित आहार घ्या.

  • डिप्रेशन जर्नल लिहायला सुरवात करा, ज्यायोगे भावनांना वाट मिळेल.

  • रोज भरपूर व्यायाम करा (चल पद्धतीचा एरोबिक). त्याने शरीरात सेरोटोनीन, एंडॉर्फिन्स व नैसर्गिक अँटिडिप्रेसंट्स स्रवतील. योगासने व प्राणायाम करा.

  • रोज संगीत ऐका.

  • सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, ही प्रतिकूल परिस्थिती बदलेल. हेही दिवस जातील.

  • मनात उमटणारे नैराश्याचे विचार, भीती म्हणजे वास्तव नव्हे, याचे भान ठेवा.

  • सोपीसोपी, सहज साध्य टार्गेट्स ठेवा व ती साध्य करण्याचा प्रयत्न करा.

  • तणावनियोजनाचे मार्ग समजून घ्या.

  • परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्याबरोबर ताबडतोब तज्ज्ञांची मदत घ्या.

लहानपणापासून भावनिक समतोल मिळवण्याचे शिक्षण मनाला दिल्यास, योग्य जीवनशैली राखल्यास, मनोव्यापारांचे स्वरूप समजून घेऊन मनाच्या स्वास्थ्यासाठी प्रयत्न केल्यास, नैराश्याचा आजार टाळण्यास किंवा त्याची तीव्रता कमी होण्यास मदत होईल. लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत डिप्रेशनच्या आजाराचा प्रादुर्भाव होत आहे. आत्तापासूनच, त्यापासून बचावाचे प्रयत्न प्रत्येकाने करायला हवेत आणि योग्य प्रयत्नाने हे नक्कीच घडू शकते.

नैराश्याच्या आजारामुळे, फुलणाऱ्या कळ्या, उमलणारी व्यक्तिमत्व कोमेजून जातात. वेळेवर काळजी घेतली तर आपण असं घडणं टाळू शकतो. त्यांना पुन्हा एकदा सुंदर आयुष्य मिळायला मदत करू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT