Bad habit Of drinking Water After Tea esakal
आरोग्य

Bad habit Of drinking Water After Tea: चहा पिल्यानंतर पाणी पिण्याची सवय आहे? वेळीच सावध व्हा नाहीतर..

अनेकांना चहा पिल्यानंतर पाणी पिण्याची सवय असते. मात्र असे केल्यास तुमच्या आरोग्यावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो ते जाणून घेऊया

सकाळ ऑनलाईन टीम

Health Tips: सकाळी उठल्यावर मूड फ्रेशनिंगसाठी जवळपास सगळेच चहा पितात. मात्र चहा पितानाही काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. त्याबाबत जर तुम्ही टाळाटाळ केली तर तुमच्या आरोग्याला धोका संभवू शकतो. अनेकांना चहा पिल्यानंतर पाणी पिण्याची सवय असते. मात्र असे केल्यास तुमच्या आरोग्यावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो ते जाणून घेऊया.

चहा पिल्यानंतर पाणी न पिण्याचे वैज्ञानिक कारणं आहेत. चला तर जाणून घेऊया चहा पिल्यानंतर नेमकं पाणी का पिऊ नये.

दातांसाठी हानिकारक

चहा पिल्यानंतर पाणी पिल्याने दांतांना धोका पोहोचतो. चहावर पाणी पिल्याने त्याचा थेट प्रभाव तुमच्या दातांवर होतो. दातांच्या बाहेरील लेयरवर गरम चहानंतर लगेच थंड पाणी प्यायल्याने दातांच्या इनॅमलवर त्याचा प्रभाव पडतो. गरम चहानंतर लगेच दातांना थंड जाणवल्याने तुमचं इनॅमल डॅमेज होतं. चहावर पाणी पिल्याने हिरड्याही कमजोर होते. त्याने सेंसिटीव्हीटीचाही त्रास होतो.

अल्सरचे महत्वाचे कारण

चहानंतर पाणी पिणे पचनशक्तीसाठीही हानिकारक ठरते. चहावर पाणी पिल्याने अल्सरचा धोका वाढतो. चहावर थंडगार पाणी पिल्याने लोकांमध्ये अॅसिडीटीचा धोका वाढतो. या त्रासाचे रुपांतर पुढे अल्सरमध्ये होते.

सर्दी तापाच्या समस्या

वातावरणातील बदलामुळे सर्दी आणि तापाच्या समस्या उद्भवतात. शरीरातील तापमानाच्या बदलामुळे या समस्या जाणवतात. चहावर पाणी प्यायल्याने अचानक तापमानात बदल होतो. याच कारणाने गळ्यात खरखर जाणवते.

नाक वाहणे

गर्मीमध्ये अनेक लोकांना नाकातून ब्लिडिंग जातं. यामागे उष्णता हे कारण नसून गरम आणि थंड तापमानाच्या एकत्रित बदलाचं हे कारण आहे. त्यामुळे चहावर गरम चहावर थंड पाणी प्यायल्याने ब्लिडींगची समस्या निर्माण होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT