पावसाळ्यातील आ जा र sakal
आरोग्य

पावसाळ्यातील आ जा र

पावसाळ्यात हवेत दमटपणा वाढत असतो, तसेच सगळीकडे कृमी कीटक, बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस यांचा प्रादुर्भाव होतो. पावसाळ्यात शरीराची एकूणच प्रतिकारक्षमता कमी झालेली असते. या सगळ्यांच्या प्रभावामुळे की काय, या काळात त्रास वाढलेले दिसतात.

सकाळ वृत्तसेवा

डॉ. मालविका तांबे

पावसाळ्यात हवेत दमटपणा वाढत असतो, तसेच सगळीकडे कृमी कीटक, बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस यांचा प्रादुर्भाव होतो. पावसाळ्यात शरीराची एकूणच प्रतिकारक्षमता कमी झालेली असते. या सगळ्यांच्या प्रभावामुळे की काय, या काळात त्रास वाढलेले दिसतात. या काळात हवेतही एक वेगळा गारवा असतो. त्यामुळे पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप, घसा दुखणे, श्र्वास लागणे, ब्राँन्कायटीस तसेच श्र्वसनसंस्थेशी संबंधित वेगवेगळे त्रास डोकं वर काढू लागतात. एकूणच या काळात श्र्वसनसंस्था अर्थात फुप्फुसे, सायनस ची काळजी घेणे गरजेचे असते

पावसाळा असल्यामुळे बऱ्याचदा खिडक्या, दारे बंद करून ठेवली जातात, त्यामुळे घरात ताजी हवा कमी प्रमाणात असते. अधून-मधून खिडक्या उघड्या ठेवणे, पंखा लावून घरात हवा खेळती ठेवणे अत्यंत गरजेचे असते.

  • पावसाळ्यात घरात डिह्यूमिडीफायर नक्की वापरावे. यामुळे हवेतील दमटपणा कमी होऊन जंतूंच्या वाढीवर प्रतिबंध येतो.

  • घरात थोड्या वेळासाठी हीटर लावून ठेवावे. यामुळे दमटपणा व गारवा कमी झाल्यामुळे व तापमान नियंत्रित झाल्यामुळे जंतूंच्या वाढीस आळा बसतो.

  • रोज घरात संतुलन प्युरिफायर, संतुलन टेंडरनेस धूपासारखा धूप नक्की करावा, जेणेकरून जंतूंच्या वाढीला प्रतिबंध होतो व श्र्वसनसंस्थेची ताकद वाढायला मदत मिळते.

  • संध्याकाळी देवाला धूप करत असताना किंवा इतरही वेळा ओवा, बाळंतशोप वगैरे घालून धूप करणे उत्तम.

  • ज्याठिकाणी धूळ व धूर असेल वा धूम्रपान करणारी व्यक्ती असेल अशा जागी शक्यतो मास्क वापरणे इष्ट. धूम्रपानाची सवय असल्यास पावसाळ्याच्या दिवसात आवर्जून धूम्रपान टाळावे.

  • संपूर्ण शरीराला, विशेषतः छाती व पोटाला, अभ्यंग करणे उत्तम. रोज रात्री झोपताना रोज रात्री किमान छातीला संतुलन अभ्यंग सेसमी सिद्ध तेलासारखे तेल नक्की लावावे.

  • लहान मुलांना संतुलन अभ्यंग कोकोनट सिद्ध तेलासारखे तेल लावून नंतर ओव्याच्या पोटलीने छाती, मान, गळा या ठिकाणी शेकावे. मोठ्यांनी रुईच्या पानांनी शेक करावा. असे करणे फुप्फुसांच्या आरोग्यासाठी उत्तम ठरते.

  • नाक सतत चोंदण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांनी नस्यसॅन घृताचे नस्य करावे. नाक चोंदण्याबरोबर घसा दुखत वा खवखवत असल्यास पाण्यात पुदिना. ओवा, तुळस वगैरे द्रव्ये घालून वाफारा घेणे उत्तम.

  • फुप्फुसांच्या आरोग्यासाठी रोज सकाळी व्यायाम करणे उत्तम ठरते. रोज नियमित चालणे, प्राणायाम करणे, ॐकार साधना करणे, यांचा शरीरात वातदोषाच्या संतुलनासाठी मदत होते. फुप्फुसे व सायनसेस हे दोन्ही अवयव पोकळ असल्यामुळे त्यांच्यात वातदोषाचा जास्त प्रभाव असतो. नियमित व्यायाम केल्यास यांचे आरोग्य नीट राहायला मदत मिळू शकते.

  • पावसाळ्यात गरम वा कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी उत्तम ठरते. शक्य असल्यास एक कप कोमट पाण्यात मध घालून घेणे उत्तम. यात अर्धा चमचा आल्याचा रस घातल्यासही चालू शकते.

  • पावसाळ्यात चहा पिण्याचे प्रमाण वाढलेले दिसते. नेहमीचा चहा घेण्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारचे हर्बल चहा घेणे उत्तम. यातही पाण्यात सुंठ, मिरी व पिंपळी घालून उकळावे व चवीला थोडे मीठ घालून प्यायल्यास पचन सुधारायला तसेच फुप्फुसांची ताकद वाढायला मदत मिळते.

  • १३. घरी चहा करत असताना त्यात गवती चहा, तुळस, ज्येष्ठमध व आले घालणे उत्तम.

  • सुंठ किंवा आल्याचा वापर पावसाळ्यात थोडा जास्त प्रमाणात करावा. यामुळे भाज्या, आमटी, सूप यांच्यात आल्याची पेस्ट किंवा आल्याचे पाणी वापरले तर चालू शकते.

  • सुपाच्य गोष्टी खाण्यात ठेवणे उत्तम. बार्ली, डाळी, भाज्या यांपासून बनवलेले सूप घेणे उत्तम.

  • पावसाळ्यात स्वयंपाक करताना लवंग, सुंठ, दालचिनी, मिरी, आले, लसूण यांचा वापर नक्की करावा.

  • आले घालून केलेली पुदिन्याची चटणी वरचेवर खाण्यात ठेवावी.

  • वारंवार घसा खराब होण्याऱ्यांनी या ऋतूत मध, तुळशीचा रस व आल्याचा रस यांचे मिश्रण दिवसातून एक चमचा या प्रमाणात घ्यावे.

  • फुप्फुसांची कार्यक्षमता व आरोग्य वाढवण्यासाठी वरचेवर सितोपलादी चूर्ण, तालिसादी चूर्ण घेणे उत्तम. तसेच च्यवनप्राश, संतुलन आत्मप्राश वगैरेंसारखे श्र्वसनसंस्थेला मदत करणारे रसायन घेणे चांगले.

  • वैद्यांच्या सल्ल्याने श्र्वासकुठार, श्र्वासकासचिंतामणी, प्राणसॅन योग वगैरे औषधे प्रकृतीनुसार घेता येतात.

  • नियमित नस्य करणे, वेगवेगळी वनस्पती द्रव्ये पाण्यात टाकून वाफारा घेणे, श्र्वसनसंस्थेची कार्यक्षमता वाढविणाऱ्या वनस्पतींच्या मदतीने छाती पोटलीने शेकण्याचा फायदा होताना दिसतो.

  • एकूणच आहार, आचरण यांची काळजी घेतली तर पावसाळ्यात आजारांपासून थोडे लांब राहायला मदत होऊ शकते. आजाराची सुरुवात झालीच तर त्वरित उपचार घेतल्यास लवकर बरे होण्यास मदत मिळू शकेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Central Vidhan Sabha Election: महाविकास आघाडीत ‘मध्य’चा तिढा सुटला; वसंत गितेंना उमेदवारी, नाशिक पश्चिम सुधाकर बडगुजर

Latest Maharashtra News Updates live : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कॅबिनेटची बैठक सुरू

Barack Obama : महात्मा गांधींना जगाचे नेते म्हणणाऱ्या बराक ओबामांना काँग्रेसचं निमंत्रण; काय आहे खास कारण?

Maharashtra Vidhansabha Nivadnuk: महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? मोठ्या नेत्यानं सांगितलं गणित; पाहा व्हिडिओ

Uddhav Thackeray: आर्थिक व्यवहाराने निष्ठेवर मात केली; कट्टर शिवसैनिकाचा ठाकरेंवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT