cancer sakal
आरोग्य

वाशीम : लवकर निदान केल्यास कॅन्सर होतो बरा

असे मत कॅप्टन डॉ. रितू बियाणी यांनी व्यक्त केले

सकाळ वृत्तसेवा

वाशीम : पेशींच्या ‘डीएनएम’मध्ये काही बदल किंवा फेरफार होतो आणि पेशींचे विभाजन नियंत्रणाबाहेर घडून येते, तेव्हा कॅन्सर होतो. हा कॅन्सर रक्तवाहिन्यांतून प्रवाहित होतो तेव्हा, आपल्या पांढऱ्या पेशी त्याला रोखण्याचा प्रयत्न करतात. या अवस्थेत शरीरात काही बदल घडून येतात. त्वचेखाली गाठ येणे, त्वचेत बदल पडणे, आवाज घोगरा होणे, अशक्तपणा येणे, शौचाच्या वेळेत बदल होणे, अशी लक्षणे दिसली तर, त्वरित तपासणी करून लवकर निदान केल्यास कॅन्सर बरा होऊ शकतो, असे मत कॅप्टन डॉ. रितू बियाणी यांनी व्यक्त केले.

त्या कारंजा येथे सुरू असलेल्या ऑनलाइन शरद व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना बोलत होत्या. ‘कॅन्सरचा विळखा वेळीच ओळखा’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. प्रारंभी उदयसिंह ठाकूर यांनी त्यांचे स्वागत केले. डॉ. कविता मिसाळ यांनी परिचय करून दिला. कॅन्सरची कारणे व उपचार पद्धती याविषयी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, धूम्रपान, तंबाखू, अल्कोहोलचे वाढते प्रमाण, अनुवंशिकता, वाढते वय, लठ्ठपणा आणि शरीराच्या मर्यादित हालचाली.

ताण-तणाव असणाऱ्यांना कॅन्सरचा धोका अधिक असतो. स्तन कॅन्सर विषयी त्यांनी सांगितले की, स्तन कॅन्सरचे दरवर्षी एक लाख २० हजार नवीन रुग्ण आढळतात.

त्यामुळे स्त्रियांनी अधिक जागरूक राहाणे महत्त्वाचे आहे. त्यांनी वर्षातून एकदा स्वास्थ्य चिकित्सा करून घ्यावी. स्त्रियांमध्ये स्तन कॅन्सरचे प्रमाण अधिक असते. पुरुषांनाही स्तन कॅन्सर होऊ शकतो. मात्र, त्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

कॅन्सरच्या उपचाराविषयी त्यांनी सांगितले की, कॅन्सर झाल्यावर तपासणी केली जाते. रक्ताचे नमुने घेतले जातात. कोणत्या भागात कॅन्सर आहे हे निश्चित झाल्यावर संदिग्ध ट्युमरमधून गोळा केलेल्या टिशूची बायोप्सी केली जाते. ट्युमरची अवस्था, पेशींच्या प्रजननाची तिव्रता जाणून घेतली जाते. सर्जरीमध्ये पेशींचा गोळा काढला जातो. केमोथेरीपीमध्ये वाढलेल्या पेशींच्या गाठी औषधीने नष्ट केल्या जातात तर, रेडियोथेरीपीमध्ये ट्युमरवर किरणांचा वापर केला जातो.

कॅन्सरवर मात करायची असल्यास प्रत्येकानी दक्ष व जागरूक रहावे. हा रोग संसर्गजन्य नसल्याने भीतीचे कारण नाही. मात्र, शरीरावर काही बदल व संभाव्य लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नवीन तंत्रज्ञानामुळे व तुमच्या दक्षतेमुळे कॅन्सर पूर्ण बरा होत असल्याचे बियाणी यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन रघु वानखडे यांनी केले तर, शारदास्तवन डॉ. सुशिल देशपांडे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Purandar Assembly Election 2024 Result Live: तिरंगी लढतीत विजय शिवतारेंनी पुरंदरचा 'गड' राखला, संजय जगताप यांना धोबीपछाड

Sajid Khan Pathan won Akola West Election 2024: भाजपचा बालेकिल्ला काँग्रसने जिंकला! अकोला पश्चिममध्ये साजिद खान पठाण करणार 'राज्य'

Bramhapuri Assembly Election Results 2024 : ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांनी घातला विजय मुकुट! तब्बल 'इतक्या' मतांनी विजयी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Guhagar Assembly Election 2024 Results : गुहागरचा गड शिवसेना ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांनी राखला; महायुतीच्या राजेश बेंडलांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT