जगात अनेक जण तणावाचा सामना करत आहेत. चुकीच्या जीवनशैलीमुळे लोकं अजारी पडत आहेत. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाली आहे. आपल्या देशात, दर 4 पैकी 1 व्यक्तीला उच्च रक्तदाबाची समस्या आहे. आजच्या काळात तरुणांनाही या समस्येने ग्रासले आहे.
जेव्हा रक्तदाब वाढतो तेव्हा हृदयविकाराचा झटका, हार्ट फेल्युअर आणि स्ट्रोक यासह अनेक घातक हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही वाढतो. अशा परिस्थितीत या समस्येपासून वेळीच सुटका होणे अत्यंत गरजेचे आहे.
जर तुम्ही देखील उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल तर आम्ही तुम्हाला अशा 4 पदार्थांबद्दल सांगत आहोत, ज्यांचे नियमित सेवन औषधांशिवायही रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकते.
लसणात औषधी गुणधर्म असतात ज्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते. तुम्ही ते कच्चे किंवा तुमच्या जेवणात वापरू शकता. याशिवाय ऑलिव्ह ऑईल, सीड्स आणि नट्स, डार्क चॉकलेट आणि कमी मिठाच्या पदार्थांमुळे बीपी कंट्रोल होऊ शकतो.
सॅल्मन, टूना आणि मॅकरेल, ओमेगा -3 फॅटी अॅसिडमध्ये समृद्ध असतात, जे रक्तदाब कमी करण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. आठवड्यातून किमान दोनदा मासे खा.
पोषणतज्ञांच्या मते, बीटरूटमध्ये असलेले नायट्रिक ऑक्साईड रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. नायट्रिक ऑक्साईड हा एक मोलेक्यूल आहे जो संपूर्ण शरीरात ब्लड सर्कुलेशनची प्रक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते. अशा परिस्थितीत, त्याचे सेवन आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
या सगळ्या व्यतिरिक्त तुम्ही टरबूज देखील खाऊ शकता. टरबूज खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यासही मदत होते, असे पोषणतज्ञांचे म्हणणे आहे. टरबूजमध्ये नैसर्गिकरित्या सिट्रुलीन आढळते, जे ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त आहे.