आरोग्य

Summer Cloths: पर्यावरणपूरक खादीमुळे शरीराला मिळतो थंडावा, खादीच्या फॅशनेबल कपड्यांकडे तरुणाईचा वाढता कल

Summer Cloths: डिझायनरही खादीला नव्या फॅशन आणि ट्रेंडमध्ये आणत आहेत. त्यामुळे देशातच नव्हे तर जगभरात आधुनिक पेहरावात याचे प्रयोग होत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Summer Cloths: खादी हे केवळ कापड नसून जीवनशैली आहे. थंड आणि आरामदायी असलेले हे कापड पर्यावरणास अतिशय अनुकूलही आहे. कारण ते प्रत्येक मोसमात परिधान केले जाऊ शकते. लोकांना उन्हाळ्यात ते जास्त परिधान करायला आवडते. हे कापड विशेषतः त्याच्या पोतसाठी ओळखले जाते. थंडीत शरीर उबदार व उन्हाळ्यात थंड ठेवते. ते जितके जास्त धुतले जाते तितके चांगले असते. खादीचे दोन कापड हे एकसारखे नसतात, त्याचा पोत वेगळा असतो. त्यामुळे याला एक वेगळेपण आहे.

भारतात खादी केवळ वस्त्र नाही, तर तो एक विचारही आहे. स्वातंत्र्य चळवळीत महात्मा गांधी यांनी इंग्रजांविरोधात लढण्यासाठी आणि भारताला स्वावलंबी बनविण्यासाठी खादीचा अचूक वापर केला, त्यामुळे खादीच्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळ घराघरांत पोचली. मात्र, चरख्याचा वापर करून हाताने विणलेले हे कापड आपल्या स्वातंत्र्य चळवळीचा अविभाज्य भाग आहे. परंतु काळाच्या ओघात खादी मागे पडली होती.

त्याचे कापड नव्या रूपात, आकर्षक रंगांत आणि विविध डिझाईनमध्ये उपलब्ध होत असल्याने त्याला विशेषतः तरुणांकडून पसंती वाढत आहे. त्यामुळे कापडासह रेडिमेड कपडेही उपलब्ध आहेत. रोजच्या वापरातील उच्चप्रतीच्या खादीला मागणी वाढत आहे. जुन्या ग्राहकांसह नव्या पिढीच्या पसंतीमुळे पूर्वी पडद्याआड गेलेली खादी पुन्हा एकदा प्रकाश झोतात आली आहे.

देशातच नव्हे जगातही आधुनिक पेहरावात प्रयोग

डिझायनरही खादीला नव्या फॅशन आणि ट्रेंडमध्ये आणत आहेत. त्यामुळे देशातच नव्हे तर जगभरात आधुनिक पेहरावात याचे प्रयोग होत आहेत. खादीची पेंट कॅज्युअल लुकमध्येही चालता येते. खादीच्या रंगीबेरंगी स्कार्फने कोणत्याही आउटफिटला पूर्ण लुक देतो येतो. साध्या खादी कुर्त्यासोबत पँट वापरता येते. विशेषप्रसंगी जॉर्जेट साठीही नेसता येते.

खादीचे विविध प्रकार

खादी कॉटन

शुद्ध कापसाच्या यॉर्नपासून बनवले जाते. खादी कॉटन व हातमाग खादी कॉटन हे विशेष आहेत. ग्राहक खादी कॉटनला सर्वाधिक पसंती देतात.

खादी सिल्क

हे रेशीमपासून बनविले जाते. त्यासाठी शुद्ध खादी रेशीम वापरले जाते. इतर धागे वापरूनही अन्य प्रकारच्या खादी सिल्क बनवले जाते.

लोकरी खादी

लोकरीपासून खादी बनविली जाते. खासकरूनहिवाळ्यात याचा वापर केला जातो.

फायदे

अत्यंत टिकाऊ, उच्च दर्जाचे आणि आरामदायी कापड असते.

पर्यावरणपूरक असते.

लोकांना रोजगार मिळतो.

प्रत्येक ऋतूमध्ये परिधान करता येतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Candidate List: शिवसेनेची पहिली यादी जाहीर, दिग्गज नेते रिंगणात; कोणाला कोठून संधी?

Ramesh Wanjale: मनसेनं ठेवली आठवण! रमेश वांजळेंचे पुत्र मयुरेश वांजळेंना खडकवासल्यातून उमेदवारी जाहीर

Pune Crime : मालकाने पाळीव कुत्र्याला लटकावले फासावर; पर्वतीमध्येही श्वानावर गोळी झाडल्याचा प्रकार उघडकीस

MNS Vidhan Sabha Candidate List: दुसरे ठाकरेही निवडणुकीच्या रिंगणात! मनसेची ४५ उमेदवारांची यादी जाहीर; वरळीतून संदीप देशपांडे

महिला आयोगातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची कंत्राटे रद्द; ऐन दिवाळीत क्रूर निर्णय घेतल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT