Summer Health Care : मागील काही दिवसांपासून पाऊस व ढगाळ वातावरणाने अचानक कमाल व किमान तापमानात फेरबदल होत आहे. या प्रकारामुळे विषाणूजन्य तापसदृश आजाराच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. सोलापुरात मागील काही दिवसांपासून तापमानातील बदल मोठ्या प्रमाणात होत आहे.
सकाळी कडक ऊन पडल्यानंतर अचानक ढगाळ वातावरण होते. त्यामुळे तपमान कमी होते. पण शरीराला हे बदल सहन होत नाहीत. त्यातच लग्नसराईमुळे भर दुपारी कडक उन्हात वऱ्हाडी मंडळी व नागरिक लग्न सोहळ्यात हजेरी लावत आहेत.
दुपारचे तापमान सर्वाधिक आहे. त्यामुळे उन्हाचा चटका देखील बसतो आहे. रात्री तपमान कमी झाले तरी काहीसे दमट असते. त्यामुळे अनेक वसाहतीमध्ये डासांचा उपद्रव भरपूर आहे. त्यातून डेंगीसदृश रुग्णांची संख्या भरपूर आहे.
विषाणूजन्य तापाच्या खालोखाल डेंगीसदृश आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. ढगाळ वातावरणाने काही काळ तपमान कमी झाल्याचा दिलासा मिळत असला तरी रात्री प्रचंड उकाड्याचा त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे ताप येऊन आजारी पडण्याचे प्रकार वाढले आहेत.
रोजच्या जेवणात हलका आहार घ्यावा
नियमितपणे व्यायाम सुरू ठेवावा
दुपारच्या वेळी शक्यतो घराबाहेर पडू नये
उन्हात जाताना डोक्याला रुमाल, टोपी वापरावी
मागील महिनाभरात उन्हाने कडाका गाठला होता. सोलापूर शहराचे तपमान ४२ अंशाच्या पुढे गेले होते. अजून मे महिना शिल्लक असल्याने हे तपमान ४५ पुढे जाईल असा अंदाज आहे. मात्र सध्या तरी अवकाळी पाऊस व वादळ वाऱ्याने तापमानाचा पारा काही प्रमाणात उतरवण्याचे काम केले आहे. तरीही कडक उन्हाने सुरवात झाल्यानंतर अचानक ढगाळ वातावरण निर्माण होते. त्यामुळे वातावरण काही प्रमाणात थंड होते.
तपमान बदलाच्या काळात सर्वाधिक विषाणूजन्य संसर्गाचा उद्रेक दिसून येत आहे. यामध्ये कोणत्याही कारणाशिवाय ताप व अशक्तपणा दिसून येतो. तसेच काही प्रमाणात डेगींसदृश रुग्ण आहेत.
- डॉ.अमरदीप कंदले, अत्तार नगर, विजापूर रोड, सोलापूर
तारीख (कमाल - किमान)
ता. २१ ३८ - २२
ता. २२ ३८ - २२
ता. २३ ३८ - २२
ता. २४ ३७ - २३
ता. २५ ३८ - २४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.