Egg Bread esakal
आरोग्य

Egg Bread : ब्रेकफास्टमध्ये ब्रेड अंडी एकत्र खाताय? हे कॉम्बिनेशन हेल्दी आहे काय? वाचा सविस्तर

अंडी आणि ब्रेड हे कॉम्बिनेशन आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नाही ते आज आपण जाणून घेणार आहोत.

साक्षी राऊत

Egg Bread : ब्रेकफास्टमध्ये अनेक लोक ब्रेडसोबत अंडी खातात. नाश्त्यात अंडी आणि ब्रेड खाणे अनेकांना आवडते. काही लोक ब्रेडवर अंड्याचे मिश्रण लावून खातात तर काही लोकांना अंडी आणि ब्रेड वेगळे खायला आवडते. तुम्हाला हे माहितीच असेल की अंडी आणि ब्रेडमध्ये हाय कॅलरीज असतात. जे नाश्त्यात खाल्ल्याने तुम्हाला संपूर्ण दिवस उर्जा मिळते. मात्र अंडी आणि ब्रेड हे कॉम्बिनेशन आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नाही ते आज आपण जाणून घेणार आहोत.

USDA च्या मते, अंडी आणि ब्रेड या दोन्हीमध्ये कॅलरीजचे प्रमाण अधिक आढळते. कॅलरीजचा विचार करता त्यामध्ये 250 ते 350 कॅलरीज असतात. नाश्त्यात हे पदार्थ खाल्ल्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते आणि लवकर भूक लागत नाही, म्हणजेच हे खाल्ल्याने तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहू शकते. अंडी-ब्रेडमध्ये प्रोटीनही मोठ्या प्रमाणात असतात, जे स्नायूंना निरोगी ठेवण्याचे काम करतात आणि बॉडी बिल्डिंगसाठी उपयुक्त ठरतात.

ब्रेकफास्टमध्ये ब्रेड अंडी एकत्र खाण्याचे काही तोटे आहेत का?

नाश्त्यात अंडा-ब्रेड खाल्ल्याने काही वेळा आरोग्याच्या समस्याही निर्माण होतात. जर तुम्ही रोज ब्रेड खाल्ले तर तुमचे वजन झपाट्याने वाढू शकते. कारण ब्रेडमध्ये कॅलरीज खूप जास्त असतात आणि फायबर खूप कमी असते. हे खाल्ल्याने तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो आणि पोटाशी संबंधित समस्या देखील उद्भवू शकतात.

आरोग्याच्या दृष्टीने कोणता ब्रेड फायद्याचा?

नाश्त्यात मैद्याच्या ब्रेडऐवजी होल ग्रेनपासून बनवलेला ब्रेड खाऊ शकता. कारण त्यात कॅलरी कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. हे खाल्ल्याने तुमची पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होईल आणि तुम्हाला पोटाचे विकारही होणार नाही. एवढेच नाही तर होल ग्रेन ब्रेड वजन वाढू न देत नाही ते नियंत्रणात ठेवते.

याशिवाय मधुमेहाचे रुग्णही याचे सेवन करू शकतात. कारण ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचे काम करते. एकूणच, तुम्ही नाश्त्यात अंडी-ब्रेड खाऊ शकता. पण मैद्याचा ब्रेड अजिबात खाऊ नका. दररोज 2 ब्रेड आणि 2 अंडी पेक्षा जास्त खाऊ नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT