Beautiful Face sakal
आरोग्य

चेहरा - सौंदर्याचा आरसा

व्यक्ती आकर्षक आहे की नाही हे तिच्या चेहऱ्यावर अवलंबून असते.

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. मालविका तांबे

व्यक्ती आकर्षक आहे की नाही हे तिच्या चेहऱ्यावर अवलंबून असते. चेहऱ्याची त्वचा नितळ, मऊ, तेजस्वी व कांतियुक्त असली, चेहऱ्यावर सुरकुत्या कमी असल्या तर एकूणच व्यक्तीची प्रकृती चांगली आहे हे कळते. चेहऱ्याचा केवळ शारीरिक आरोग्याशी नव्हे तर मानसिक आरोग्याशीही संबंध असतो. कुठल्याही प्रकारचा ताण-तणाव असला, मन दुःखी असले तर लगेचच चेहऱ्यावर परिणाम जाणवतो.

मनुष्य चिडका वा रागीट असला तरी त्याच्या चेहऱ्यावर तशा प्रकारचे भाव दिसतात. चेहरा आपल्या आरोग्याचा आरसा पण असतो. त्यामुळे आयुर्वेदात चेहऱ्याच्या आरोग्यासाठी बरेच काही सुचवलेले आहे. चेहऱ्यावर साय लावणे, काकडीचा रस लावणे, कोरफडीचा गर लावणे वगैरे घरगुती उपचारांचे मूळ आपल्याला आयुर्वेदातच सापडते.

चेहऱ्याच्या त्वचेचा विचार केला तर त्याची गुणवत्ता त्रिदोषांप्रमाणे बदलत असते.

  • वाताची त्वचा कोरडी व कमी तेजस्वी असते; अर्थात अशा त्वचेची काळजी सर्वांत जास्त घ्यावी लागते.

  • पित्ताची त्वचा मऊ, नितळ व बरीच संवेदनशील असते; त्यामुळे या त्वचेला ॲलर्जीचे त्रास होण्याची शक्यता सर्वांत जास्त असते, या त्वचेची काळजी थोड्या-फार प्रमाणात घ्यावीच लागते.

  • कफाची त्वचा मऊ, नितळ, स्निग्ध व थोडी गार असते; अशा लोकांना त्वचेची फार काळजी घ्यावी लागत नाही, पण घेतली तर उत्तम असते.

चेहऱ्यावरून वयाचा अंदाज लावता येतो. काळजी न घेतल्यास कमी वयात सुरकुत्या येऊन म्हातारपण दिसायला लागते. त्वचेची काळजी कशी घ्यावी यासाठी आयुर्वेदात खूप चांगले उपाय दिलेले आहेत.

1) चेहऱ्यावर वनस्पतींचा लेप लावणे - याला मुखलेप असे म्हणतात. उदा. रक्तचंदन, लोध्र, मंजिष्ठा, कोष्ठ वगैरे वनस्पतींबरोबर मसुराची पूड करून त्याचा लेप लावला तर वर्ण सुधारण्यास मदत मिळते. चांगल्या गुणवत्तेच्या या गोष्टी घरी ठेवाव्या. गरजेप्रमाणे यात पाणी, दूध, साय वगैरेंचा वापर करता येतो. उदा. वाताची कोरडी त्वचा असल्यास साय व हळदीच्या चूर्णाचा वापर करणे चांगले. स्निग्ध त्वचा असणाऱ्यांनी पाणी घालून लेप करणे उत्तम ठरते. गरजेनुसार यात मधही घालता येतो.

लेप करण्याची पद्धत – लेप खूप पातळ न भिजवता साधारण श्रीखंडाइतपत घट्ट असावा. नंतर हा लेप संपूर्ण चेहरा, मान व गळा यांच्यावर लावावा. डोळे व ओठ यांच्यावर लेप लावू नये. लेप साधारण २ सें.मी. जाडीचा असावा. लेप फार जाड असल्यास किंवा फार कमी जाडीचा लावल्यास चेहरा कोरडा होऊन सुरकुत्या वाढतात. लेप पूर्णपणे कोरडा होण्यापूर्वी एखादे कापड कोमट पाण्यात भिजवून पुसून काढून टाकावा.

लेप संपूर्ण कोरडा होऊ देणे त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले नसते. सध्या रसायनयुक्त लेप बाजारात उपलब्ध असतात. त्यांचा अगदी पातळ थर चेहऱ्यावर लावला जातो, कोरडे झाल्यावर त्वचेवर राहू दिले जातात, ज्यामुळे चेहऱ्याचे स्नायू बळकट होऊन सुरकुत्या कमी व्हायला मदत मिळते असे सांगितले जाते. याचबरोबरीने यात त्वचा ब्लीच करणारी द्रव्येही टाकलेली असतात.

यामुळे हा लेप लावल्यावर चेहरा स्वच्छ झाला आहे अशी भावना येते. पण चेहऱ्यावर अशा प्रकारची अनैसर्गिक उत्पादने वापरणे टाळणेच इष्ट. संतुलन वात फेस पॅक, संतुलन पित्त फेस पॅकसारखे वनस्पतीजन्य नैसर्गिक उत्पादने वापरणे जास्त इष्ट ठरते.

चेहऱ्यावर लेप लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुणे (क्लिन्झिंग) तसेच स्वेदन करणेही चांगले असते. जमत असल्यास चेहऱ्याला स्वेदन करताना पाण्यात एखादे इसेंशियल तेल, तुळशीची पाने, कडुनिंबाची पाने टाकणे उत्तम असते. त्याचबरोबरीने चेहरा स्वच्छ करण्यासाठी चांगल्या प्रतीचे गुलाबजल वापरणे जास्त चांगले.

चेहऱ्यावरचा लेप काढल्यावर संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेलासाख्या तेलाचा हलक्या हाताने मसाज करावा. यामुळे त्वचेचे आरोग्य नीट राहण्यास मदत मिळते व मुखलेपाचा अधिक फायदा मिळतो.

अशा प्रकारचा मुखलेप चेहऱ्याचा वर्ण सुधरवतो, चेहऱ्यावर असलेले काळे डाग, वांग कमी करण्यासाठी मदत करतो, चेहऱ्यावर तारुण्यपीटिका येण्यास तसेच अकाली सुरकुत्या येण्यास प्रतिबंध करतो, त्वचेच्या संक्रमणास प्रतिबंध करतो.

सध्याच्या काळात फेशियलला खूप महत्त्व दिले जात आहे. फेशियल करताना नाना प्रकारच्या रासायनिक द्रव्यांचा, क्रीम्सचा वापर केला जातो. वधूसाठी केला जाणारा फेशियल सोने वगैरे टाकून केला जातो असे सांगितले जाते. पण फेशियलमध्ये सगळ्यात महत्त्वाचे असते चांगल्या प्रकारे मसाज करणे, हा मसाज संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेल किंवा संतुलन राधा फेस तेलासाख्या आयुर्वेदिक सिद्ध तेलाने केला तर त्यातील स्नेह त्वचेच्या आतपर्यंत शोषले जाऊन चेहऱ्याची त्वचा लवचिक राहायला मदत मिळते. याऐवजी रासायनिक घटकांपासून बनविलेल्या क्रीम्सचा मारा त्वचेवर केला तर तात्पुरती त्वचा मऊ वाटला तरी दीर्घकाळ काहीही उपयोग होत नाही.

2) कार्ला येथील पंचकर्म केंद्रात आम्ही आयुर्वेदिक फेशियल करतो. त्याचा अनुभव बाजारात होत असणाऱ्या फेशियलपेक्षा खूप वेगळा असतो कारण आमच्याकडे नैसर्गिक द्रव्यांपासून बनविलेल्या उत्पादनांच्या साहाय्याने फेशियल केले जाते. यामुळे चेहऱ्याचे रक्ताभिसरण सुधारणे, चेहऱ्याची कांती सुधारणे, त्वचा चमकदार होणे, अकाली सुरकुत्या यायला प्रतिबंध होणे वगैरे फायदे जास्त प्रमाणात दिसतात.

त्वचेच्या आरोग्यासाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे उद्वर्तन. उद्वर्तन म्हणजे घर्षण. वनस्पतींचे चूर्ण एखाद्या स्निग्ध द्रव्यात मिसळून त्वचेवर लावण्याने तेथील मृत पेशी (डेड सेल्स) निघून जायला मदत मिळते. यालाच आजकाल एक्सफोलिएशन असे म्हटले जाते.

८-१० दिवसांतून अशा प्रकारे त्वचेचे उद्वर्तन केल्यास त्वचेतील रक्तप्रवाह नीट राहायला व त्वचेचा नितळपणा वाढायला मदत मिळते. यासाठी संतुनलचे फेस पॅक संतुलन क्रेम रोझमध्ये मिसळून हलक्या हाताने चेहऱ्यावर घासावे. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून त्यावर गुलाबपाण्यात बर्फ मिसळून हलक्या हाताने लावावे. यामुळे त्वचेचा पोत सुधारतो, बरोबरीने व्यक्तीला ताजेतवानेही वाटते.

मुखलेप, उद्वर्तन दोन्ही करतेवेळी डोळ्यांवर संतुलन गुलाबपाण्याच्या पट्ट्या ठेवणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते व यामुळे क्रीम, वनस्पतींचे चूर्ण डोळ्यांमध्ये जाण्यास प्रतिबंध होतो.

3) चेहऱ्याच्या त्वचेच्या आरोग्यासाठी तिसरा उपाय आहे कवल वा गंडूष. वनस्पतींनी सिद्ध केलेले तेल तोंडामध्ये थोडा वेळ धरून ठेवायची असतात. असे करताना चेहऱ्यावर वनस्पतींपासून तयार केलेला लेप लावला जातो. साधारण १५-२० मिनिटे लेप, गंडूष केल्याने त्वचेचे आरोग्य सुधारायला मदत मिळते.

आत्मसंतुलनमध्ये पंचकर्म करत असणाऱ्यांना अशा प्रकारे उपचार दिल्याने चेहऱ्याच्या त्वचेचे आरोग्य सुधारते व मुखरोग अर्थात कुठल्याही प्रकारचा दातांचा, हिरड्यांचा त्रास कमी होतो, अन्नाची चव नीट लागत नसल्यास त्यात सुधारणा होते, जिभेवर थर साठण्यास प्रतिबंध होतो. कवल वा गंडूष केल्यामुळे चेहऱ्याच्या सर्व स्नायूंना व्यायाम मिळून चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी व्हायला तसेच यातील वर्ण्य द्रव्यांमुळे त्वचेतील दोष कमी व्हायला मदत मिळते.

त्वचेचे आरोग्य नीट ठेवण्यासाठी आपल्याला आतून व बाहेरून असे दोन्ही प्रकारे काम करावे लागते. स्वतःच्या शरीराच्या पोषणाबरोबरच आतील शुद्धी करणेही महत्त्वाचे असते. आहारात ताज्या भाज्या, फळे, तूप, दूध, लोणी, संतुलन अनंत कल्प, संतुलन अमृशर्करायुक्त पंचामृत यांचा समावेश करणे त्वचेच्या आरोग्यासाठी उत्तम असते. बरोबरीने अनंतसॅन, मंजिष्ठासॅनसारख्या गोळ्या घेण्याचा उपयोग होतो.

तळलेले, खूप मसालेदार, खूप तिखट गोष्टी त्वचेच्या आरोग्यासाठी चांगल्या नसतात, त्या टाळलेल्या बऱ्या. चांगल्या प्रतीची हळद, तुळशीचा रस, दालचिनी, आवळा, गुलाब, काळ्या मनुका वगैरे त्वचेच्या आरोग्यासाठी उत्तम असतात. याचा आपल्या दैनंदिन जीवनात समावेश करावा. उदा. धात्री रसायन, संतुलन गुलकंद स्पेशल, च्यवनप्राश वगैरे गोष्टी रोज वापराव्यात. तसेच संतुलन पंचकर्मामध्ये विरेचन घेणे, वर्ण्य बस्ती घेणे वगैरे सुद्धा मगत करू शकतात.

या सगळ्यांबरोबर आयुष्यात बाकीचे ताण कसे कमी करता यातील, रोगांमुळे झालेले त्वचेचे विकार कसे का करता येतील याबद्दल आयुर्वेदाच्या तज्ज्ञांकडून सल्ला घेणे योग्य ठरते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT