Fitness Pattern Tells About Your Personality : बऱ्याचदा लोकांना व्यायाम करा असं सांगावं लागतं. पण काही लोक असतात जे आपल्या फिटनेस विषयी फार जागरुक असतात. व्यायाम, जीम, योगासनं केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही.
पण व्यायामातही प्रकार असतात आणि तुम्हाला नेमक्या कोणत्याप्रकारचा व्यायाम करायला आवडतो यावर तुमचा स्वभाव ओळखता येऊ शकतो. जाणून घेऊया.
तुम्ही व्यायामाला फार महत्व देतात, रिकाम्या वेळेत जीमला जाणे पसंत करतात, तुम्ही एथलीट आहात का?
असे असेल तर याचा अर्थ होतो की, तुमच्याकडे भरपूर शारीरिक आणि मानसिक उर्जा आहे. जी फिजीकल अॅक्टीव्हीद्वारा तुम्ही बाहेर काढतात.
वॉलीबॉल, टेनिस, सॉकर, मार्शल आर्ट या पैकी कोणताही व्यायाम प्रकार करा एका अॅथलिटचा स्वभाव हा आक्रमक आणि गतीशील असतो.
द माइंड जर्नलमध्ये सांगितल्यानुसार फिटनेस फ्रीक किंवा खेळाडू लोकांच्या स्वभावाविषयी...
असे लोक फार कृतीशील असतात.
हे लोक दृढ निश्चयी, आत्मविश्वासू आणि उर्जेने भरलेले असतात.
हे लोक ध्येयवादी असतात.
स्पष्टवक्ते असतात
इतरांना सहज प्रेरीत आणि प्रभावीत करतात.
हे लोक लक्ष्य ठरवून काम करतात.
ते गाठण्यासाठी प्रचंड मेहनत घेतात.
सकारात्मक वृत्तीचे असतात.
फ्रेंडली स्वभावाचे असतात. टीम वर्क करण्यावर विश्वास असतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.