vitamin a foods Esakal
आरोग्य

Vitamin A साठी आहारात करा या पदार्थांचा समावेश, अनेक समस्या होतील दूर

Vitamin A Sources: व्हिटॅमिन ए मुळे रोगप्रतिकारक शक्ती Immunity वाढण्यास मदत होते. निरोगी त्वचेसाठी आणि निरोगी डोळ्यांसाठी Healthy Eyes व्हिटॅमिन ए गरजेचं असतं. शरीराच्या वाढीलाठी आणि रिप्रोडक्शनसाठी व्हिटॅमिन ए गरजेचं आहे

Kirti Wadkar

vitamin a sources: शरीरासाठी व्हिटॅमिन्स आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स अत्यंत गरजेची असतात. शरीराचं कार्य सुरुळीत चालण्यासाठी सर्वच विटामिनचं योग्य प्रमाण असणं गरजेचं आहे. विविध विटामिन्सपैकी काही विटामिन्स हे शरीर तयार करत असतं. Food For Health Marathi Tips Try This Fruits and vegetables for vitamin A

तर काही व्हिटॅमिन्ससाठी व्हिटॅमिनयुक्त आहार घेणं गरजेचं असतं. यापैकीच एक म्हणजे अत्यंत महत्वाचं असं व्हिटॅमिन  ए. Vitamin A ची निर्मिती शरीर करत नसल्याने त्यासाठी व्हिटॅमिन ए युक्त आहार घेणं गरजेचं आहे.

व्हिटॅमिन ए मुळे रोगप्रतिकारक शक्ती Immunity वाढण्यास मदत होते. निरोगी त्वचेसाठी आणि निरोगी डोळ्यांसाठी Healthy Eyes व्हिटॅमिन  ए गरजेचं असतं. शरीराच्या वाढीलाठी आणि रिप्रोडक्शनसाठी व्हिटॅमिन ए गरजेचं आहे.

Vitamin Aच्या कमतरतेमुळे होणाऱ्या समस्या (vitamin a deficiency diseases)

  • डोळ्यांसाठी व्हिटॅमिन ए अत्यंत गरजेचं आहे. व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे रातांधलेपणा येण्याचा धोका वाढतो. 

  • तसचं महिलांमध्ये व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे गर्भधारणेसाठी समस्या येऊ शकतात. तसचं गरोदर महिलांमध्ये देखील Vitamin Aच्या कमतरतेमुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. 

  • Vitamin Aच्या कमतरतेमुळे रोगप्रिकारक शक्तीच्या कार्यावर परिणाम होतो. 

  • लहान मुलांमध्ये व्हिटॅमिन ए ची कमतरता निर्माण झाल्यास त्याचा परिणाम त्यांच्या वाढीवर होवू शकतो. 

  • तसचं त्वचा आणि डोळे तसचं केस कोरडे होण्याची समस्या निर्माण होते. 

  • यासोबत व्हिटॅमिन ए कमी असल्याल एखादी जखम भरून येण्यास अडचण निर्माण होते. 

    हे देखिल वाचा-

व्हिटॅमिन ए असलेले पदार्थ (vitamin a rich foods)

  1. रताळं- रताळं हे एक कंदमुळ असून यामध्ये मोठ्या प्रमाणात Vitamin A आढळतं. एका मध्यम आकाराच्या रताळ्यामध्ये जवळपास 900 mcg व्हिटॅमिन A उपलब्ध असतं.

    तसंच यात त्वचेसाठी फायदेशीर असणारं कॅरेटीन देखील मुबलक प्रमाणात आढळतं.

    तसचं यात व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, आयरन आणि फायबर असल्याने शरीराला अनेक फायदे होतात. खास करून लहान मुलांसाठी रताळ्याचं सेवन फायदेशीर ठरू शकतं 

  2. गाजर- गाजरमध्ये देखील व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात उपलब्ध असत. नियमितपणे गाजराचं सेवन केल्यास डोळ्यांच्या समस्या कमी होण्यास मदत होते. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स त्वचेचं फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण करतात. 

  3. टोमॅटो- रोजच्या जेवणासाठी वापरला जाणारा टोमॅटो हा देखील व्हिटॅमिन एचा एक चांगला स्त्रोत आहे. तसचं यात अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतं. टोमॅटोच्या नियमित सेवनामुळे त्वचेच्या कॅन्सरचा धोका कमी होतो. तसचं विषारी किरणांमुळे त्वचेचं होणारं नुकसान टाळण्यासाठी टोमॅटोचं सेवन उपयुक्त ठरतं. 

४. आंबा- आंबा हे फळ फक्त मे महिन्यातच उपलब्ध असलं तरी त्यात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ए तसचं व्हिटॅमिन ए ची कमतरता भरून काढणारे अँटी ऑक्सिडंट्ल आढळतात. तसंच आंब्यामध्ये इतरही अनेक पोषक तत्व असल्याने मे महिन्याच्या दिवसांमध्ये आंबे खाण्याची मनसोक्त मजा लुटावी. याचा फायदा तुमच्या आरोग्याला होईल.

५. हिरव्या पालेभाज्या- हिरव्या पालेभाज्यांचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. हिरव्या पालेभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ए आढळतं. तसचं या भाज्यांमध्ये इतरही अनेक व्हिटॅमिन आणि खनिजं आढळतात जी शरीरासाठी गरजेची असतात. 

हे देखिल वाचा-

आहारामध्ये नियमितपणे हिरव्या पालेभाज्यांचा समावेश केल्याने रक्तदाब, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहून कॅन्सर सारख्या आजारांचा धोका कमी होतो. 

  1. सिमला मिरची- सिमला मिरची हे व्हिटॅमिन एचं एक समृद्ध स्त्रोत आहे. तसचं यात व्हिटॅमिन सी देखील असल्याने डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदा होतो. 

  2. पपई- पपईमध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात आढळतं. तसचं यात व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम, आयरन उपलब्ध असतं. डोळ्याचं आणि त्वचेचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी पपईचं सेवन फायदेशीर ठरतं. आहारामध्ये तुम्ही कच्च्या किंवा पिकलेल्या पपईचा समावेश करू शकता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:ठाणे पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवरच

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT