Foods For Anxiety Relief esakal
आरोग्य

Foods For Anxiety Relief : चिंता, तणाव अन् नैराश्याशी लढण्यास मदत करतात ‘हे’ खाद्यपदार्थ, आजच करा आहारात समावेश

Foods For Anxiety Relief : चिंता, नैराश्य या मानसिक आरोग्याशी संबंधित प्रमुख समस्या आहेत.

Monika Lonkar –Kumbhar

Foods For Anxiety Relief : सध्याचे धावपळीचे जीवन, बिघडलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी अन् व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. या समस्या शारिरीक आणि मानसिक स्वरूपातील आहेत. चिंता, नैराश्य या मानसिक आरोग्याशी संबंधित प्रमुख समस्या आहेत. या समस्या संपूर्ण जगाच्या लोकसंख्येच्या अंदाजे ७.३% लोकांना प्रभावित करतात.

या समस्येने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला सामान्यत: तणाव, चिंता आणि नैराश्य जाणवते. त्यामुळे, या व्यक्तींना त्यांची दैनंदिन कामे पार पाडताना खूप अडचणी येतात. त्या पार्श्वभूमीवर आज आम्ही तुम्हाला अशा काही खाद्यपदार्थांबद्दल सांगणार आहोत की, ज्यांच्या मदतीने तुम्ही तणाव, चिंता आणि नैराश्यापासून बऱ्याच अंशी आराम मिळवू शकता. शिवाय, यामुळे तुमचे मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होऊ शकेल. चला तर मग जाणून घेऊयात, या खाद्यपदार्थांबद्दल.

ओट्स

अनेकांना सकाळच्या नाश्त्यामध्ये ओट्स खायला आवडतात. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी ओट्स फायदेशीर आहेत. परंतु, त्यासोबतच ओट्सला फायबरचा उत्तम स्त्रोत म्हणून ओळखले जाते. ओट्समुळे शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवता येते आणि चिंताग्रस्त लक्षणे कमी होण्यास मदत होते. त्यामुळे, उत्तम मानसिक आरोग्यासाठी आणि चिंता-तणाव दूर करण्यासाठी ओट्सचा आहारात समावेश करा.

केळी

केळ्यांमध्ये पोषकघटकांचे विपुल प्रमाण आढळून येते. ट्रिप्टोफॅनचा एक उत्तम स्त्रोत म्हणून केळीला ओळखले जाते. शिवाय, केळीमध्ये जास्त प्रमाणात मॅग्नेशिअमचे भरपूर प्रमाण आढळते. जे आपल्या शरीरातील स्नायूंना आराम देण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत करते.

डार्क चॉकलेट

चॉकलेट खायला तर सगळ्यांनाच आवडते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच विविध प्रकारचे चॉकलेट्स खायला आवडतात. या चॉकलेटपैकी एक असलेल्या डार्क चॉकलेटचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.

खास करून मानसिक आरोग्यासाठी आणि चांगल्या त्वचेसाठी डार्क चॉकलेट खाण्याचे अनेक फायदे आहेत. डार्क चॉकलेटमध्ये फ्लेव्होनॉल्स आणि अँटिऑक्सिडंट्स असतात जे मूड सुधारतात आणि चिंता-तणाव कमी करतात.

बेरीज

अँटिऑक्सिडंट्सचा उत्तम स्त्रोत म्हणून बेरीजला ओळखले जाते. बेरीजमध्ये विविध प्रकारच्या बेरीजचा समावेश होतो. स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, ब्लूबेरी, ब्लॅकबेरी इत्यादी. बेरीजचे सेवन केल्याने मूड सुधारण्यास मदत होते.

शिवाय, बेरीजमध्ये ‘व्हिटॅमिन सी’ चे विपुल प्रमाण आढळते. यासोबतच चिंता कमी करणारे गुणधर्म देखील बेरीजमध्ये आढळतात. त्यामुळे, बेरीजचे सेवन करणे मानसिक आणि शारिरीक आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स तेजीत?

IND vs AUS : विराट कोहलीला खुणावतोय राहुल द्रविडचा विक्रम; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर हव्यात फक्त १०२ धावा

तर 'कुछ कुछ होता हैं' मध्ये राणी मुखर्जी ऐवजी दिसली असती ऐश्वर्या राय; 'या' कारणामुळे दिलेला नकार, म्हणालेली-

Stock Market: कोण आहेत FPI आणि FII? त्यांच्यामुळे शेअर बाजार कोसळतो अन् तेजीत येतो?

महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू, 'अदृश्य' शक्तीने कारस्थान रचून दोन पक्ष फोडले; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला

SCROLL FOR NEXT