Foods For Constipation esakal
आरोग्य

Foods For Constipation : बद्धकोष्ठतेपासून आराम हवा? मग, 'या' खाद्यपदार्थांचा आहारात करा समावेश, पचनक्रिया राहील तंदूरूस्त

Monika Lonkar –Kumbhar

Foods For Constipation : सध्याची बिघडलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. बद्धकोष्ठता ही एक अशी समस्या आहे की, ज्यामध्ये व्यक्तीला मलत्याग करण्यास त्रास होतो. या समस्येचा त्रास मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे, याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.

बद्धकोष्ठतेमुळे अन्न पचन करण्यास अडचण येते. वजन वाढते आणि व्यक्तीला अस्वस्थता जाणवते. या सगळ्याचा रोजच्या दैनंदिन कामांवर ही परिणाम होतो. या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही आहारात काही बदल करणे आवश्यक आहे.

औषधोपचारांसोबतच तुम्ही फायबरयुक्त अन्नाचा आहारात समावेश करू शकता. यामुळे, तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून आराम मिळू शकतो. आज आम्ही तुम्हाला काही अशाच खाद्यपदार्थांबद्दल सांगणार आहोत. ज्यांचा तुम्ही आहारात समावेश केल्यास बद्धकोष्ठतेपासून सुटका होऊ शकतो. कोणते आहेत ते खाद्यपदार्थ? चला तर मग जाणून घेऊयात.

दही आणि पनीर

दही आणि पनीर या दुग्धजन्य पदार्थांमध्ये प्रोबायोटिक्स मोठ्या प्रमाणात असतात. या प्रोबायोटिक्समुळे आतड्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. त्यामुळे, रोजच्या आहारात दही आणि पनीरचा जरूर समावेश करा. दही अन् पनीरचे सेवन केल्याने अन्नाचे पचन सुधारण्यास मदत होते.

फायबरयुक्त खाद्यपदार्थ

बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही आहारात फायबरयुक्त खाद्यपदार्थांचा अवश्य समावेश करा. यासाठी, हिरव्या पालेभाज्या, कोबी, रताळे, पडवळ, भेंडी, गाजर, वांगी इत्यादींचे सेवन अवश्य करा. यासोबतच फळांमध्ये सफरचंद, संत्री, द्राक्षे, डाळिंब, केळी इत्यादी फळांचे सेवन करायला विसरू नका. यामुळे, पचनसंस्था उत्तम राहण्यास मदत होईल.

हायड्रेट राहा

रोज भरपूर पाणी प्यायल्याने संपूर्ण शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. यासोबतच पुरेसे पाणी प्यायल्यामुळे, बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून बऱ्याच अंशी आराम मिळतो. त्यामुळे, अन्नाचे योग्य प्रकारे पचन ही होते. त्यामुळे, बद्धकोष्ठतेची समस्या टळते. दररोज दिवसातून किमान ३ लीटर पाणी अवश्य प्या.

डाळी आणि धान्ये

मसूर डाळ, हरभरा, राजमा आणि तूरडाळ यांसारख्या डाळी आणि कडधान्यांमध्ये पोषकतत्वांचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे, या खाद्यपदार्थांच्या सेवनामुळे बद्धकोष्ठता दूर राहण्यास मदत होते. यासोबतच बाजरी, ब्राऊन राईस, ओटमील यांसारख्या संपूर्ण धान्यांमध्येही भरपूर प्रमाणात फायबर असते. जे अन्न पचन सुधारण्यास मदत करते. त्यामुळे, बद्धकोष्ठतेची समस्या टळू शकते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का, भाजपने फोडली अजित पवारांची राष्ट्रवादी, 'हा' आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश!

IND vs BAN T20I : सूर्याच्या टीमला टक्कर देण्यासाठी बांगलादेशने जाहीर केला संघ; स्टार खेळाडूला दीड वर्षानंतर बोलावले

Cabinet Meeting: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; निवृत्तीनंतरच्या निधीमध्ये वाढ अन्...

Sharad Pawar: बालेकिल्ल्यावर पवार मिळवणार पुन्हा विजय? राजन पाटलांनंतर, आमदार बबन शिंदे दुसऱ्यांदा शरद पवार यांच्या भेटीला

Latest Maharashtra News Updates : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का

SCROLL FOR NEXT