Corona Fourth Wave  
आरोग्य

Corona Fourth Wave : जूनमध्ये येणार कोरोनाची चौथी लाट, तज्ज्ञांचे मत काय?

सकाळ डिजिटल टीम

कोरोना अद्याप गेलेला नाही. आता कोरोना संक्रमणापासून थोडी विश्रांती दिली आहे पण ती जास्त काळ टिकणार नाही. तज्ज्ञांकडून सुरु असलेल्या अभ्यासातून हेच स्पष्ट होते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) कानपूरचे संशोधकांनी एका अभ्यासामध्ये सांगितले आहे की, भारतामध्ये कोरोना व्हायरसची चौथी लाट (Covid Fourth Wave India) 22 जूनच्या आसपास येऊ शकते आणि ऑगस्ट महिन्याच्या मधल्या काळात Peak वर असू शकते. हा अभ्यास मेडरिव पत्रिकेमध्ये नुकत्याच प्रकाशित झाला आहे यावर अद्याप निष्कर्ष काढणे बाकी आहे. संशोधकांनी सांख्यिकीय पध्दतीनुसार हा अंदाज वर्तविला असून त्यानुसार संभाव्य चौथी लाट साधारण चार महिन्यांपर्यंत असेल.

आयआयटी कानपूरच्या गणित आणि सांख्यिकी विभागाच्या साबरा प्रसाद राजेशभाई, सुभ्र शंकर घर आणि शलभ यांच्या नेतृत्वामध्ये झालेल्या अभ्यासातून समोर आले आहे की, चौथी लाटेचे गांभीर्य कोरोना व्हायरसच्या नव्या संभाव्य व्हेरिअंटवर आणि देशामध्ये लसीकरणाच्या स्थितीवर अवलंबून असेल. संशोधकांनुसार, आकडवरून स्पष्ट होते की,३0 जानेवारी 2020 रोजी SARs-COV-2 च्या प्रादुर्भावाच्या प्रारंभिक आकड्यांनुसार उपलब्धतेच्या तारखेपासून भारतामध्ये संक्रमणाची चौथी लाट 936 दिवसानंतर येईल. (Fourth wave of Covid-19 in India from June, to last for 4 months, says study of IIT Kanpur team )

कधी पासून कधीपर्यंत राहिल चौथी लाट

त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, चौथी लाट 22 जून 2022 पासून सुरु होईल आणि 23 ऑगस्ट 2022 पर्यंत संक्रमणाच्या सर्वोच्च शिखरावर पोहचेल. संशोधकांनी असेही सांगितले की, संभाव्य नवा व्हेरिअंटचा एकूण मूल्यांकनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता नेहमीच असते. त्यांनी सांगितले की, हा परिणाम संसर्ग आणि इतर कारणांवर आधारित असेल.

संशोधकांनुसार, या तथ्यांशिवाय संसर्ग, संसर्गाची पातळी आणि चौथ्या लाटे संबधी विविध मुद्द्यवर लसीकरण, पहिला, दुसरा किंवा बुस्टर डोसच्या प्रभावाची भूमिका महत्त्वाची ठरेल. जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला होता की, कोरोना व्हायरसचा ओमीक्रॉन व्हेरिअंट हा शेवटचा व्हेरिअंट नाही आणि त्याचा पुढचा व्हेरिअंट अधिक संसर्गजण्य असू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT