Cancer Prevention sakal
आरोग्य

Cancer Prevention : बागकाम केल्याने दूर होणार कँसरचा धोका; रिसर्चमधून आलं समोर

नुकत्याच एका लँसेट प्लेनेटरी हेल्थ जर्नल मध्ये प्रकाशित झालेल्या रिसर्चमध्ये असा दावा करण्यात आलाय की बागकाम केल्याने कँसरचा धोका टाळता येतो.

सकाळ डिजिटल टीम

Cancer Prevention : हल्ली कँसर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कँसर हा असा आजार आहे जो सुरवातीच्या काळात त्यावर उपचार केले तर रुग्ण बरा होतो नाहीतर रुग्णांचा जीव वाचविणेही कठीण होतं. मुळात कँसरमुक्त होण्यासाठी सकारात्मक उर्जा हवी असते. जी आनंददायी वातावरणातून सहज मिळते.

नुकत्याच एका लँसेट प्लेनेटरी हेल्थ जर्नल मध्ये प्रकाशित झालेल्या रिसर्चमध्ये असा दावा करण्यात आलाय की बागकाम केल्याने कँसरचा धोका टाळता येतो. सोबतचं बागकाम केल्याने मानसिक आरोग्यही सुदृढ राहतं. (Gardening Reduce Risk of Cancer)

अमेरिकेच्या कँसर सोसायटी तर्फे सीयू बोल्डर संस्थानच्या पर्यावरण अभ्यास विभागाच्या रिसर्चकर्त्यांना सामुदायिक बागकाम करणारे असे लोक ज्यांच्या जेवणात फायबरची अधिक मात्रा असते आणि जे भरपूर शारिरीक मेहनत करतात त्यांना कँसर आणि अन्य आजारांचा धोका कमी असतो, असे निदर्शनास आले. त्यांनी 41 वर्ष वय असणाऱ्या 291 लोकांवर हा रिसर्च केला

फायबरचं प्रमाण महत्त्वाचे...

बागकाम करणाऱ्या लोकं फळ भाज्या जास्त खातात. रिसर्चमध्ये असे दिसून आले की बागकाम करणारे लोक इतर लोकांच्या तुलनेत जास्त फळ भाज्या खातात आणि फळ भाज्यांमध्ये फायबरचे मोठ्या प्रमाणावर असते जी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास भरपूर मदत करते.

फायबर किती घ्यायला हवं?
डॉक्टरांच्या मते प्रतिदिन एका वयोवृद्ध व्यक्तीने 25-40 ग्राम फायबर घ्यावे. पण साधारणत: एक व्यक्ती फक्त 16 ग्रामपर्यंतच फायबर घेतात.

तणावमध्ये कमतरता 
बागकाम करणाऱ्या लोकांनी सांगितले की जेव्हापासून त्यांनी बागकाम सुरू केले तेव्हापासून त्यांना आधीपेक्षा कमी तणाव यायचा. अनेक लोक सामुहीक बाग काम करतात फळ-भाज्या उगवतात आणि त्यामुळे या लोकांचे आयुष्यचं बदलले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: डोनाल्ड ट्रम्प जिंकले तर शेअर बाजार कोसळणार; कमला हॅरिस अध्यक्ष झाल्यास काय होईल?

Pandharpur Vidhansabha: पंढरपूरात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण ?

Latest Marathi News Updates live : अजित पवार गटातील कार्याध्यक्ष, जनरल सेक्रेटरींची शरद पवारांच्या पक्षात घरवापसी

Fact Check :'गंभीरकडून काही होणार नाही, मला कमबॅक करावं लागेल'; MS Dhoniचा Video Viral, चाहते सैराट

Mobile Addiction : दिवाळीच्या सुट्टीत पालकांना ब्लॉक करून मुले रिल्स, गेम्सच्या आहारी....सोशल मीडियावर नको ते उद्योग

SCROLL FOR NEXT