Weight Loss esakal
आरोग्य

Weight Loss : वजन कमी करायचंय? तज्ज्ञ सांगतात तूप खा

आपल्याला वजन कमी करायचं म्हटलं की, आपण पहिले तूप खाणं सोडतो. पण तज्ज्ञांचं म्हणणं उलटंच आहे. जाणून घ्या.

सकाळ डिजिटल टीम

Ghee For Weight Loss : हल्ली बहुतेक जण हेल्थ आणि वेट काँशियस झाल्याचं आपण पाहतो. आणि त्यासाठी सगळ्यात पहिले काही केलं जात असेल तर स्निग्ध पदार्थ विशेषतः तूप खाणं बंद करतात. पण हे योग्य नाही असं तज्ज्ञ म्हणतात. उलट वजन कमी करण्यासाठी तूप आवश्यक असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. असं का, जाणून घ्या.

याविषयी न्यूट्रीशनिस्ट आंचल सोगनी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. त्या म्हणतात आपल्या देशात फुलक्यावर, पोळीवर तूप लावल्याशिवाय ती खाल्ली जात नाही, नाहीतर ती कोरडी लागते. पण वेट काँशियस लोक त्याला नकार देत तूप खाणं, तूपाची चपाती किंवा इतर पदार्थ खाणं बंद करतात. पण असं करणं योग्य नाही.

वजन कमी करण्यासाठी तूप करतं मदत

  • चपातीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी करण्यासाठी तूप मदत करतं. पदार्थातलं कार्बोहायड्रेट्स मोजण्यासाठी ग्लायसेमिक इंडेक्सचा उपयोग होतो. यातून कोणता पदार्थ तुमची रक्तातली साखर वाढवण्यासाठी लवकर प्रभावी आहे हे समजतं.

  • तूपाने तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटतं. अजून काही खाण्याची गरज उरत नाही.

  • तूपात फॅट्स वितळवणारे जीवनसत्व असतात, ज्यामुळे वजन कमी होतं. तसंच तूपामुळे हार्मोन्स आणि हेल्दी कोलेस्ट्रॉल संतूलित होतं.

  • मूक्त रॅडिकल्स तुमच्या पेशी डॅमेज करतात. तूपामधला उष्म बिंदू त्याला रोखतो.

किती तूप खावं

शरीरासाठी आणि वजन कमी करण्यासाठी तूप आवश्यक असतं. पण ते प्रमाणातच खाणं आवश्यक आहे. एका चपातीवर एक टीस्पून तूप पुरेसं आहे. त्यापेक्षा जास्त खाऊ नका. असंही आंचल सोगनी सांगतात.

प्रसिध्द न्युट्रिनिस्ट रुतूजा दिवेकर यांनीपण इंस्टाग्रामवर तूपातले पदार्थ याविषयी पोस्ट केली आहे. त्यांनी लिहीलं आहे, "तूपात पदार्थ शिजवणे आणि वरण, भात, भाकरी, बट्टी, पोळी यावर तूप लावणं आवश्यक आहे. यात आवश्यक असं फॅटी अ‍ॅसिड असतं आणि यामुळे व्हिटॅमिन डी, ए आणि इ शरीरात शोषून घेण्यासाठी त्याचा फायदा होतो. यामुळे चवपण वाढते."

योग्यप्रमाणात तूपाचं सेवन करणं आरोग्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी आवश्यक असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT