Actress Pratiksha Jadhav sakal
आरोग्य

Untitled Sep 20, 2024 08:31 pm

सकाळ वृत्तसेवा

- प्रतीक्षा जाधव, अभिनेत्री

मी मुळात खेळाडू आहे. मी ज्युदो खेळत असे. त्यामुळे खेळाची आवड लहानपणापासूनच असल्यानं आपलं आरोग्य तंदुरुस्त राखण्यासाठी मी पहिल्यापासूनच प्रयत्न करते. शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी मी दररोज नियमितपणे योगासनं करते. मी दीक्षा घेतली असल्यानं मला पहाटे ब्राह्ममुहूर्तावर म्हणजेच रोज साडेतीन वाजता उठावं लागतं.

आंघोळ झाल्यानंतर मी लगेचच साधना म्हणजे ध्यानधारणा करते. पोटाचा आकार कमी होण्यासाठी सूर्यनमस्कार व कपालभारती करते. ताडासनाबरोबरच योगासनाची इतर प्रकारही करते. माझा सर्वांत आवडता प्रकार म्हणजे पॉवर सूर्यनमस्कार होय. शरीराला जास्तीत जास्त ताण देऊन मी ५१ सूर्यनमस्कार करते. मी लवकरच १०८ सूर्यनमस्कार घालणार आहे.

मी आता जिम बंद केली आहे. जिम सुरू असते, तेव्हा आपण आहाराची पथ्यं काटेकोरपणे पाळतो; मात्र जिम बंद झाल्यानंतर त्यात सातत्य राहत नाही. त्यामुळे आपलं वजन पुन्हा वाढतं. अभिनय क्षेत्रात असल्यामुळे चित्रीकरणासाठी मला नेहमीच बाहेर राहावं लागते. त्यामुळे बाहेरचे पदार्थ नाइलाजास्तव खावेच लागतात. त्यामुळे वजन वाढतं.

माझं वजन आठ-नऊ वर्षांपूर्वी ऐंशी किलो होतं. ‘देवमाणूस’ मालिका सुरू असतानाही वजन वाढलं होतं. मात्र नियमित सूर्यनमस्कार, योगासनं आणि ध्यानधारणा केल्याने आता माझं वजन साठ किलो झालं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं आहारावर नियंत्रण हवं. माझा आहार मीच ठरवते आणि पूर्ण शुद्ध शाकाहारी खाते. सकाळी उठल्या उठल्या गरम पाण्याबरोबर लिंबू पाणी पिते.

पोहे, उपमा, इडली असे पदार्थ नाश्त्याला खाते. सकाळी अकराच्या दरम्यान वेगवेगळ्या पद्धतीचे ज्यूस घेते. उकडलेल्या बिटामध्ये डाळिंब, टोमॅटो, गाजर घालते. त्यातून माझ्या शरीराला हवे ते घटक मिळतात. यातून आयर्न व कॅल्शियम मिळतं. परिणामी माझी त्वचाही चमकदार झाली आहे. दुपारी दीडच्या सुमारास जेवण करते. चपाती आणि चटपटीत भाजी खाते.

जेवणाबरोबर कोशिंबीर असते आणि ताकही पिते. दुपारी चार वाजता चहाबरोबर बिस्कीट खाते. रात्री सात वाजता दोन चमचे गाईचं तूप घालून वरण-भात खाते. रात्री सात-साडेसातनंतर काहीही खात नाही. आता मी आहार निम्मा केला आहे. ही सर्व पथ्यं पाळल्यामुळेच माझं वजन कमी झालं आहे.

सुदृढ आरोग्यासाठी टिप्स

  • अनेक जण वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या खातात. खरंतर त्याचे दुष्परिणाम होतात. त्यामुळे ध्यानधारणा, योगासनं आणि प्राणायाम करून आपलं आरोग्य तंदुरुस्त ठेवावं.

  • वेगवेगळ्या प्रकारचे डाएट प्लॅन न पाळता आहारावर नियंत्रण ठेवावे. प्रत्येक देशात वेगवेगळ्या प्रकारचा आहार असतो. त्यामुळे आपणही भारतीय म्हणजेच शाकाहारी आहार घ्यावा.

  • शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी योगासनं हा प्रभावी उपाय आहे.

  • आपल्या मुलांनाही लहानपणापासून ध्यानधारणा, योगासनं आणि प्राणायाम करण्यास मार्गदर्शन करावं.

  • ऋतुमानानुसार वेगवेगळ्या प्रकारची फळं खावीत.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: ‘महाराष्ट्र नायक’ फडणवीसांनाच मुख्यमंत्री करा, भाजपची जोरदार Lobbying

Utpanna Ekadashi 2024: 26 कि 27 नोव्हेंबर कधी साजरी केली जाणार उत्पन्न एकादशी? जाणून घ्या काय करावे अन् काय नाही

Beed Voter Assembly Polls : तीन हजार मतदारांची एकाही उमेदवाराला पसंती नाही

IND vs AUS 1st Test: नाद खुळा... जसप्रीत बुमराहच्या नेतृत्त्वाखाली भारताने इतिहास रचला, ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला

Latest Maharashtra News Updates : उद्धव ठाकरे आमदारांकडून घेणार प्रतिज्ञापत्र; पुन्हा पक्ष फुटीची भीती

SCROLL FOR NEXT