Ajwain Esakal
आरोग्य

आजीचा बटवा: बडीशेपचा जोडीदार असलेल्या ओव्याचे आरोग्यदायी फायदे

बडीशेपचा जोडीदार असलेल्या हिंदीत ‘अजवाईन’ नावाने प्रसिद्ध असलेला ओवा याचेही आरोग्यदायी अनेक फायदे आहेत.

सकाळ डिजिटल टीम

ओवा’ म्हटले की, सगळ्यात आधी नजरेसमोर येतो ‘पानपुड्याचा डब्बा’. ओवा, बडीशेप, सुपारी इ. पानपुड्याचा डब्बा सजवतात. बडीशेपचा जोडीदार असलेल्या हिंदीत ‘अजवाईन’ नावाने प्रसिद्ध असलेला ओवा याचेही आरोग्यदायी अनेक फायदे आहेत. बडीशेप सारखेच ओवा खाण्याचे देखील लोकांना व्यसन लागते आणि हे व्यसन शरीरासाठी अधिक उत्तम आहेत.

चला तर जाणून घेऊयात ओवा खाण्याचे आरोग्यदायी फायदे…

भारतात ओव्याचे पीक प्रामुख्याने उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश व काही प्रमाणात महाराष्ट्रामध्ये घेतले जाते. ओवाचे शास्त्रीय नाव Trachyspermum copticum ट्रॅकिस्पर्मम कॉप्टिकम हे आहे. ही पश्चिम आशिया व दक्षिण आशियात उगवणारी एक औषधी वनस्पती आहे. याच्या बिया घरगुती वापरात असतात. आपल्याला अपचन झालंय. पोटात गॅस झालाय, तर ओवा खा. तुम्हाला तात्काळ आराम पडतो. पाचक ओवा अनेक तक्रारी दूर करीत असल्याने औषधांमध्ये त्याला महत्वाचे स्थान आहे.

ओवा चवीला आंबट, कडवट, उष्ण आणि थोडासा तिखट असतो. वात, तसेच कफ दोषाचे शमन करतो, पोटात वायू धरणे, उदररोग, जंत आदींवर रामबाण ठरतो.ओव्याच्या सेवनाने भूक वाढते, त्यामुळे जेवणामध्ये याचा वापर नियमितपणे करावा. मुखवास म्हणून आणि स्वयंपाकात ओव्याचा वापर भारतात प्रामुख्याने केला जातो.

आता बघू या ओव्या चाऔषधी उपयोग नेमका काय काय आहे?

1) ओवा खाल्याने शरीरातील हानिकारक तत्वे बाहेर पडतात. कफ निघून जाण्यासाठी देखील ओव्याचा उपयोग होतो. पोटाशी संबंधित विकारांवर ओव्याचे सेवन फायदेशीर ठरते.

2) मासिक पाळीमध्ये अनेकजणींना पोटदुखी आणि कंबरदुखी सहन करावी लागते. मासिक पाळीत पोट आणि कंबर दुखू लागल्यास ओवा तव्यावर गरम करून कोमट पाण्यासोबत घेतल्यास त्वरीत आराम मिळतो.

3) ओवा, काळे मीठ, आणि सुंठ एकत्र करून त्याची पावडर करुन घ्यावी. हे चूर्ण घेतल्याने पित्त आणि उलट्यांच्या त्रासामध्ये लगेच आराम मिळतो.

4) ओव्यामधील थायमॉल या जंतूनाशक घटकांमुळे दम्याच्या त्रास ओवा खाण्याने तुम्हाला नक्कीच आराम मिळू शकतो. दम्याचा त्रास कमी करण्यासाठी गुळासोबत दिवसातून दोनदा ओवा खा.

5) वजन कमी करण्यासाठी ओवा फायदेशीर ठरतो. ओवा टाकून पाणी प्यायल्याने शरीराची पचन क्षमता वाढते. एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा ओवा रात्रभर भिजवून ठेवावा. सकाळी या पाण्यामध्ये एक चमचा मध घालून हे पाणी रिकाम्या पोटी प्यावे.

6) गुडघे दुखत असल्यास ओवा गरम करावा आणि तो एका रुमालात बांधून घेऊन त्याने गुडघ्यांना शेक द्यावा. त्यामुळे गुडघ्यांना आराम मिळतो.

7) केस काळे करण्यासाठी देखील ओव्याचा वापर तुम्ही करू शकता. यासाठी दोन ते तीन कडीपत्त्याची पाने, दोन मनुका, एक चिमुट ओवा एक ग्लास पाण्यात उकळून घ्या. या पाण्यात साखर घालून दिवसातून एक ग्लास दररोज प्या. हळूहळू तुमचे केस काळे होतील.

8) सांधेदुखीचा त्रास होत असल्यास ओवा गरम करून त्याचा शेक घेतल्यास चांगला आराम मिळतो.

9) सतत खोकला येत असेल तर ओव्याचे पाणी त्यावर अतिशय गुणकारी आहे. यासाठी पाण्यामध्ये ओवा घालून हे पाणी उकळून घ्यावे. नंतर थोडेसे काळे मीठ घालून ह्या पाण्याचे सेवन करावे.

10) ताप आल्यास ओवा आणि दालचिनी टाकलेला काढा प्या. ज्यामुळे तुम्हाला बरं वाटू लागेल.

टीप: ओवा अतिप्रमाणात घेऊ नये. कारण प्रमाणात घेतल्यास ओवा जितका आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तितकाच अतीप्रमाणात घेतल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. अतीप्रमाणात ओवा सेवन केल्यास तुम्हाला अॅसिडीटी, अल्सर, डायरिया, यकृताच्या समस्या होण्याची शक्यता असते. मात्र ओव्याचे सेवन दररोज करायचे असेल तर थंड वातावरणात करावे, असा सल्ला अनुभवी लोक देतात. त्याबरोबरच वरील सर्व उपाय अनुभवी लोकांच्या सल्ल्याने आणि मार्गदर्शनाने करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आशिष शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT