Hair Care esakal
आरोग्य

Hair Care : शक्तीवर्धक वाटणाऱ्या याच पदार्थांमुळे पडतं पुरुषांना टक्कल, वेळीच सावध व्हा नाहीतर...

चीनमध्ये झालेल्या एका रिसर्चमधून असे पुढे आले आहे की पुरुषांमध्ये एनर्जी ड्रिंक हे टक्कल पडण्याचं कारण ठरतंय. कसे ते जाणून घ्या

सकाळ ऑनलाईन टीम

Hair Care : डोक्यावरील केस जाणे किंवा टक्कल पडणे या समस्या हल्ली पुरुषांमध्ये वाढतच चालल्या आहेत. पुरुषांमध्ये केस गळण्याची बरीच कारणे असू शकतात. डिप्रेशन, वाढते वय, चुकीची लाइफस्टाइल या सगळ्या गोष्टींचा परिणाम तुमच्या केसांवर होऊ शकतो. मात्र चीनमध्ये झालेल्या एका रिसर्चमधून असे पुढे आले आहे की पुरुषांमध्ये एनर्जी ड्रिंक हे टक्कल पडण्याचं कारण ठरतंय. कसे ते जाणून घ्या.

तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये रोज एनर्जी ड्रिंक पित असाल तर तुमच्या केसांचं आरोग्य तुम्ही खराब करताय. दररोज एनर्जी ड्रिंक पिल्याने तुमचे केस वेगाने गळायला लागतात.

काय सांगते स्टडी

'द सन' च्या मते, पुरुष एनर्जी ड्रिंकचे वेडे असतात. नियमित रुपाने टक्कल पडण्याच्या समस्या ह्या ३० टक्के एनर्जी ड्रिंकमुळे होत असल्याचे दिसून येते. एनर्जी ड्रिंक, स्पोर्ट्स ड्रिंक, गोड चहा या सगळ्या कारणांनी केस गळतीचे प्रमाण आणखी जास्त वाढते.

जर्नल न्यूट्रिएंट्सने असा दावा केलाय की, पुरुष आठवड्यातून एक ते तीन लीटर ड्रिंकचे सेवन करतात. त्यामुळे त्यांच्या केसगळतीच्या समस्या वाढतात.

चार महिन्यांपर्यंत या विषयावर अभ्यास झाला

तज्ज्ञांनी या अभ्यासादरम्यान १८ ते ४५ वर्षाच्या वयोगटातील हजार चीनी पुरुषांच्या लाइफस्टाइल आणि खाण्यापिण्याच्या सवईंचा अभ्यास केला. यामध्ये जे पुरुष एन्झायटीच्या समस्यांनी त्रस्त आहेत त्यांना या समस्या प्रकर्षाने जाणवतात असे पुढे आले आहे.

केसांच्या आरोग्यासाठी हेल्दी डाएट फॉलो करा

लंडनचे स्कीन एक्सपर्ट डॉ. शेरोन वोंग यांनी सांगितले की, हेअर फॉलिकल वाहिन्या शरीरातील दुसऱ्या स्थानाच्या वेगाने विभाजित होणाऱ्या वाहिन्या आहेत. त्यामुळे केसांच्या आरोग्यासाठी पोषक तत्वांनी युक्त अशा आहाराची गरज असते.

३) दही - दह्यात चांगले बॅक्टेरिया, बी,सी,ई जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे वर्षभर दही खाल्ले तरी त्याचे अनेक चांगले परिणाम दिसतात. मुरूम पुटकुळ्यांना दह्याचे नियमित सेवन अटकाव करते. त्वचेवरील डाग कमी करते. तसेच त्वचा ओलसर राखण्यासही मदत करते. केसांसाठीही दही उपयुक्त आहे कारण ते केसांखालची त्वचा ओलसर ठेवते व त्यामुळे केस गळण्याचे प्रमाण कमी होते.(Health Care)

४) अक्रोड - वास्तविक पाहता सर्वच सुकामेवा आरोग्यासाठी खूपच लाभदायक असतो. पण त्यातही अक्रोड त्वचा व केसांसाठी सुपरफूड म्हणता येईल. त्यात ओमेगा थ्री फॅटी अॅसिड विपुल प्रमाणात असते व त्यामुळे त्वचा हेल्दी राहते. उन्हाळ्यातही त्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही व तिचे आरोग्य राखले जाते. केसांना अक्रोड सेवन चमकदार बनविते.

५) नारळ - नारळाचे पाणी पोटॅशियमचे भंाडार म्हणता येईल. यामुळे त्वचेचा ओलसरपणा टिकून राहण्यास मदत मिळते व त्वचा ग्लो होते. हे त्वचेसाठी कायमचे नॅचरल मॉइश्चरायझर आहे. त्यात ई, के व अन्य जीवनसत्वे व अनेक क्षार असतात. यामुळे केस घनदाट, चमकदार बनतात. (Hair Care)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT