आरोग्य

हिवाळ्यात हात-पाय थंड पडतात? जाणून घ्या कारण अन् उपाय

सकाळ डिजिटल टीम

Reason to Hands-Feet Cold in Winter : हिवाळ्यात(Winter) अनेक लोकांना त्यांचे हात-पाय थंड (Cold)राहत असल्याचा त्रास होतो. मग आपल्या हात-पायाला कितीही मोजे घातले किंवा शाल किंवा चादरमध्ये हात-पाय ठेवले तरी ते थंडच राहात. बऱ्याच लोकांना ही अगदी सामान्य गोष्ट वाटते. पण, त्यामागील कारणे शरीरा असलेले आजार (Diseases) आणि कमतरता असू शकतात. त्याचबरोबर काही गोष्टी अशा असतात ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करत राहता. चला तर मग आज जाणून घेऊया हिवाळ्यात हात-पाय थंड पडण्यामागील कारण काय आणि त्यापासून आराम मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

हायपोथायरॉईडीझममुळे हात-पाय थंड पडतात

घशात असलेल्या थायरॉईड ग्रंथीमधून थायरॉईड संप्रेरक स्राव बिघडणे किंवा त्याच्या कमतरतेमुळे शरीरात रक्तप्रवाह मंद होऊ शकतो. जे हात-पाय थंड पडण्यास कारणीभूत ठरतात आहे. विशेष म्हणजे, थायरॉईड संप्रेरक आपल्या चयापचय आणि हृदय गतीवर देखील परिणाम करतात. त्यामुळे शरीरातील त्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे रक्तप्रवाह मंदावतो आणि त्यामुळे आपले हात-पाय थंड पडतात.

मधुमेहामुळे हात-पाय थंड पडतात

मधुमेह किंवा शुगरवरील औषधांमध्ये काही रसायने असतात जी आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी करतात. साहजिकच, यामुळे रक्ताभिसरण मंदावते आणि आपले हात-पाय थंड राहतात. याव्यतिरिक्त, शुगरच्या त्रासामध्ये मज्जासंस्थेला नुकसान होण्याचा धोका असतो. ज्या लोकांना याचा त्रास होतो त्यांना हाता-पायाला मुंग्या येणे आणि सर्दी होण्याचा त्रास होतो.

अॅनिमियामुळे हात-पाय थंड पडतात

अॅनिमियाचा शब्दशः अर्थ रक्ताची कमतरता होतो. खरं तर, आपल्या रक्तातील बहुतेक लाल रक्तपेशी आरबीसी असतात. याच्या अभावामुळे अॅनिमिया होतो. लोह आणि फोलेट तसेच व्हिटॅमिन-बी (12) ची कमतरता यासाठी कारणीभूत असू शकते. याव्यतिरिक्त, मूत्रपिंडाच्या अयोग्य कार्यामुळे अॅनिमिया किंवा रक्त पातळ होण्याची शक्यता असते. अॅनिमिया किंवा रक्त पातळ होण्याचा त्रास होतो त्यांचे हात-पाय बऱ्याचदा थंड पडतात. कारण लाल रक्तपेशीच आपले रक्त प्रवाहा व्यवस्थित ठेवतात.

रक्ताभिसरणाचा वेग मंदावल्यामुळे हात-पाय थंड पडतात

जेव्हा तुमचा रक्तप्रवाह मंद होतो तेव्हा शरीरामध्ये उष्णाता वाढते. हे सतत सुस्तावल्यासारखे बसल्यामुळे देखील होते त्यामुळे मग तुमचे हात-पाय थंड पडतात. यासाठी रोज काही योगासन किंवा व्यायाम करावा. जेणेकरून तुमचा रक्तदाब योग्य राहील आणि तुम्हाला थंडी वाजणार नाही आणि तुमचे हात-पाय थंड पडणार नाही.

रक्तवाहिन्यांमधील अडथळ्यामुळे हात-पाय थंड पडतात

कोलेस्टेरॉल किंवा इतर कारणांमुळे आपल्या धमन्या आकुंचन पावतात तेव्हाही आपला रक्तप्रवाह मंदावतो. अशा प्रकारे आपले रक्ताभिसरण बिघडते. ज्यामुळे आपले हात-पाय थंड होतात आणि खूप प्रयत्न करूनही उबदार राहू शकत नाहीत. हे रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या तयार झाल्यामुळे देखील असे होते, त्यामुळे आपण ही समस्या टाळली पाहिजे.

हात-पाय थंड पडू नये म्हणून या गोष्टींची घ्या काळजी

हिवाळ्यात हात आणि पाय थंड ठेवण्यासाठी लोकरीचे किंवा उबदार शूज वापरा. नेहमी उबदार कपडे, हातमोजे आणि मोजे घाला. दररोज व्यायाम आणि शारीरिक क्रियाकलाप करत रहा. निकोटीनचा प्रभाव टाळा, कारण या गोष्टी थंड होण्याचा प्रभाव वाढवतात. बसताना व काम करताना मधेच उठून वेगाने चालावे म्हणजे शरीर उबदार राहते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT