Brisk Walk Benefits esakal
आरोग्य

Brisk Walk Benefits : निरोगी आरोग्यासाठी उपयुक्त असणारे 'ब्रिस्क वॉक' म्हणजे काय? जाणून घ्या ‘हे’ फायदे

Brisk Walk Benefits : निरोगी जीवनशैलीसाठी नियमित व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Brisk Walk Benefits : निरोगी जीवनशैलीसाठी नियमित व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. शारिरीक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी शरीर तंदूरूस्त असणे गरजेचे आहे. आजकाल लोक फिटनेस उत्तम प्रकारे राखण्यासाठी जिमला जातात, योगा करतात किंवा घरीच व्यायाम करतात, तर काही जण सकाळी आणि संध्याकाळी चालायला जातात.

सध्याच्या धावपळीच्या जगात लोकांना कामामुळे किंवा व्यस्त वेळापत्रकामुळे व्यायाम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. मग, अशावेळी उत्तम फिटनेस राखण्यासाठी काय करावे? असा प्रश्न लोकांना पडतो. तुमच्या या प्रश्नाचे उत्तर आहे ब्रिस्क वॉकिंग. आता ब्रिस्क वॉकिंग म्हणजे काय? आणि याचे आरोग्याला काय फायदे आहेत? ते आपण जाणून घेणार आहोत.

ब्रिस्क वॉक म्हणजे काय?

सामान्य चालण्यापेक्षा ब्रिस्क वॉक हे जरा वेगळे आहे. या ब्रिस्क वॉकिंगच्या स्थितीमध्ये तुम्ही खूप वेगाने चालत नाही आणि खूप हळू देखील चालत नाही, यालाच ब्रिस्क वॉक असे म्हटले जाते.

वेगाने वजन कमी करण्यासाठी हे ब्रिस्क वॉकिंग अतिशय फायदेशीर आहे. फक्त हे तुम्हाला रोज न चुकता करावे लागते. वजन कमी करण्यासोबतच ब्रिस्क वॉक करण्याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. नियमितपणे ब्रिस्क वॉक केल्याने हृदयाच्या समस्या, मधुमेह आणि काही प्रकारचे कर्करोग यांचा धोका कमी करते.

ब्रिस्क वॉक करण्याचे आरोग्यदायी फायदे :

हृदयासाठी फायदेशीर

हृदय निरोगी ठेवण्यासाठी ब्रिस्क वॉक अतिशय फायदेशीर आहे. काही आरोग्य तज्ज्ञांच्या मते दररोज ३० ते ४० मिनिटे वेगाने चालल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. शिवाय, दररोज ब्रिस्क वॉक केल्याने आपल्या शरीरातील खराब कॉलेस्ट्रॉलचे प्रमाणही कमी होते. खराब कॉलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रित राहिल्यास हृदयाशी संबंधित आजार कमी होतात. थोडक्यात नियमित ब्रिस्क वॉकिंग करणे हे हृदयासाठी फायदेशीर आहे.

ताण-तणाव दूर होतो

मानसिक ताण-तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी ब्रिस्क वॉकिंग करणे फायदेशीर आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दररोज ब्रिस्क वॉक केल्याने मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे, आरोग्य सुधारते आणि झोप न येण्याची समस्या दूर होते. हा चालण्याचा व्यायाम केल्याने ताण-तणाव दूर होतो आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

दररोज ब्रिस्क वॉकिंग केल्याने वजन कमी करण्यास मदत होते. काही आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दररोज वेगवान चालण्याने स्नायू मजबूत होतात आणि कॅलरीज लवकर बर्न होतात. जेव्हा आपल्या शरीरातील अतिरिक्त कॅलरीज बर्न होतात तेव्हा लठ्ठपणा आणि वजन कमी करण्यास फायदा होतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT