Health Care  esakal
आरोग्य

Health Care : भगर पौष्टिक घटकांचा खजिना..! भगरीचे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती वाढते अन् हाडांना मिळते मजबूती

Health Care : भगरीचे अर्थात वरईचे सेवन केल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात.

सकाळ वृत्तसेवा

Health Care : उपवासात विशेषत: एकादशीच्या आहारातील भगर हे पौष्टिक अन्न आहे. यामध्ये असलेल्या फायबर, प्रथिने, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शिअम, लोह आणि व्हिटॅमिन सी मुळे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवते.

अपचन, गॅसेस, मधुमेह आदींपासून लांब राहण्यास याचा चांगला उपयोग होतो. पाकिटबंद पदार्थांच्या जमान्यात भगरचे महत्त्व आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते भगरचे सेवन केवळ उपवासापुरते मर्यादित न ठेवता इतरवेळीही त्याचा समावेश करायला हवा.

भगर हे महत्त्वाचे तृणधान्य

महाराष्ट्रात त्र्यंबकेश्‍वर, इगतपुरी, घोटी, पेठ, सुरगाणा, हरसूल, जव्हर, मोखाडा या आदिवासी या भागातून चांगल्या दर्जाचे भगरीचे उत्पादन होते. भगर तयार करण्यासाठी उपयोगात आणलेल्या धान्यावरून भगरीचे प्रकार पडतात.

वरई भगर, सावा भगर, बर्टी भगर व कोद्रा भगर. यामध्ये वरई भगर उच्च प्रतीची मानली जाते. त्यामुळे त्याला दरही चांगला मिळतो. १५ टक्के कच्चा माल महाराष्ट्रातून, तर ८५ टक्के माल मध्य प्रदेश, छत्तीसगड, तमिळनाडू, आंध्र, गुजरात, ओरिसा आदी राज्यांतून महाराष्ट्रात येतो. त्यावर प्रक्रिया करून त्याची विक्री केली जाते.

वरईचे (भगरीचे) सेवन केल्याने आरोग्याला होणारे फायदे :

1) कोलेस्ट्रॉल कमी होते - भगरमध्ये कार्बोहायड्रेट आणि फॅटचे प्रमाण खूप कमी असते. कोलेस्ट्रॉल कमी होऊन हृदयविकार अथवा हृदयासंबंधित आजाराचा धोका कमी होतो.

2)पचनाच्या समस्या कमी होतात - भगर खाल्ल्याने पचनाच्या समस्या कमी होतात. यामध्ये असलेले फायबर बद्धकोष्ठता, अपचन, गॅस दूर होण्यास मदत करते. हा भात सहज पचतो. त्यामुळे पोट निरोगी राहते. पोट लवकर साफ होते.

3) वजन कमी करण्यास मदत - कॅलरीज खूप कमी असतात. फायबर भरपूर असते. चयापचय लवकर होते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

4) हाडे मजबूत होतात - कॅल्शिअम मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे हाडे मजबूत होतात. हाडे दुखण्यापासून आराम मिळतो.

5) मधुमेहामध्ये फायदेशीर - कमी ग्लायसेमिक इंडेक्स फूड आहे. जे शरीरातील रक्तातील साखर वाढू देत नाही. लिपीड प्रोफाइल सुधारते. त्यामुळे तांदळ्या भाताऐवजी भगरभाताचा आहारात समावेश केल्यास मधुमेह रुग्णांना फायदेशीर ठरते.

6) प्रतिकारशक्ती वाढते - भगर शरीरासाठी पोषक आहे. फायबर, प्रथिने, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शिअम, लोह आणि व्हिटॅमिन सी असे अनेक पोषक घटक असतात. जे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवते. त्यामुळे केवळ उपवासाऐवजी इतरवेळीही भगरचा आहारात समावेश करणे आरोग्यासाठी निश्‍चित फायदेशीर ठरते.

भगर अनेक पोषक तत्त्वांनीयुक्त, कमी कॅलरीज असणारी, पचायला हलकी आणि शरीराला ऊर्जा देणारी आहे. भगर बहूगुणी असल्याने केवळ उपवासावेळी नव्हे, तर दैनंदिन आहारातही भगरीचा समावेश असावा.

- सुनीता वैराट, आहारतज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Raut Video: 'जय भीम' म्हटल्याने विलासरावांनी मंत्रिपद नाकारलं; काँग्रेस नेते नितीन राऊतांचा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray : प्रियंका गांधी बाळासाहेबांवर भरभरुन बोलल्या; त्यांनी भाजपचे दात घशात घातले, उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

IND vs AUS: 'विराट किंवा रोहितचा फॉर्म नव्हे, तर गौतम गंभीर ही टीम इंडियाची सर्वात मोठी समस्या'; वाचा कोण म्हणतंय असं

Chh. Sambhajinagar : चेकपोस्टवर पाच कोटींची रक्कम जप्त....परिक्षेत्रातील चार जिल्ह्यांमध्ये निवडणुकीसंदर्भात पोलिसांची दक्षता

'डॉ. आंबेडकरांचं संविधान धोक्यात आलंय, दलित समाजाला आता त्यांचं भावनिक भाषण नकोय'; समरजित घाटगेंचा हल्ला

SCROLL FOR NEXT