आजकाल रेड वाईन पिण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. रेड वाईन बद्दल अनेक लोकांचे अनेक गैरसमज असतात. पण ही रेड वाईन आपल्या आरोग्यासाठी खुप फायद्याची आहे. वाईन पिणं आरोग्यासाठी चांगलं असतं, हा विचार 1970 च्या दशकातला आहे. त्यावेळी फ्रान्सच्या नागरिकांना इतर देशातील नागरिकांच्या तुलनेत हृदयविकार कमी होतो, हे शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आलं होतं.(health benefits of red wine know all details)
सर्व अल्कोहोलिक पेयांमध्ये रेड वाईन हा आरोग्यदायी पर्याय मानला जातो. द्राक्षे फॉरमॅट करून रेड वाईन बनवली जात असल्यामुळे यात अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असल्याचे म्हटले जाते. द्राक्षांमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात. यामध्ये रेझवेराट्रोल, कॅटेचिन, एपिकेटचिन आणि प्रोअँथोसायनिडिन यांचा समावेश आहे.
तर जाणून घेऊया रेड वाईनचे फायदे
हृदयविकाराचा धोका कमी
रेड वाईन प्यायल्याने चांगले एचडीएल कोलेस्ट्रॉल राखण्यात मदत होऊन हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. पण रेड वाईन पिण्याला मर्यादा हवी. अधिक सेवनाने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, जे लोक दररोज सुमारे 150 मिली रेड वाईन पितात त्यांना हृदयविकाराचा धोका न पिणार्यांपेक्षा 32% कमी असतो.
कर्करोगाचा धोका कमी
रेड वाइनचे सेवन केल्याने कोलन, फुफ्फुस, स्तन, अंडाशय आणि प्रोस्टेट कर्करोगासह अनेक प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो. रेड वाईनमध्ये रेसवेराट्रोल आणि इतर अँटिऑक्सिडंट्स असतात.
रेड वाईनमुळे वजन नियंत्रित राहते
रेड वाईनमध्ये आढळणारे रेझवेराट्रॉल हे पिसॅटॅनॉलमध्ये रूपांतरित होते, ज्यामुळे आपल्या शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते.
पचनसंस्थेसाठी लाभदायक
पोटाची जळजळ आणि इतर पचनक्रियेसंबंधित आजारांवर रेड वाईनचे अँटी-बॅक्टेरियल गुण फायदेशीप ठरतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.