health sakal
आरोग्य

Health Care News : तुमचेही मनगट सतत दुखते का? मग 'या' व्यायामामुळे मिळेल अराम

ही समस्या कमी करण्यासाठी तुम्ही आम्ही सांगितलेले व्यायाम करू शकता.

सकाळ डिजिटल टीम

जास्त वजन उचलणे, हाताच्या साहाय्याने  केलेले व्यायाम आणि लॅपटॉप-मोबाईलचा सतत वापर यामुळे मनगटात दुखणे सामान्य आहे. पण हे जाणून घ्या की हे दुखणे सहजासहजी जात नाही आणि कधी कधी हे दुखणे इतके वाढते की कोणतेही काम नीट करता येत नाही. ही समस्या कमी करण्यासाठी तुम्ही आम्ही सांगितलेले व्यायाम करू शकता.

कोबरा स्ट्रेच

मनगटाचे फ्लेक्सर्स ताणण्यासाठी कोब्रा स्ट्रेच करता येते. कोब्रा स्ट्रेचमुळे कडकपणा कमी होतो. याशिवाय तुमचे शरीरही तंदुरुस्त राहते.

  • कोब्रा स्ट्रेच करण्यासाठी सर्वप्रथम योगा मॅटवर पोटावर झोपा.

  • तुमचे पाय सरळ आणि खांद्याच्या रेषेत ठेवा. शरीराला आरामदायी स्थितीत ठेवा.

  • दीर्घ श्वास घेत, शरीराचा वरचा भाग वरच्या दिशेने उचला.

  • या दरम्यान, तुमची कोपर शरीराच्या सरळ रेषेत असावी.

  • पाय अशा रीतीने स्ट्रेच करा की तुम्हाला जास्त ताण जाणवणार नाही. डोकं शक्य तितके वर करा.

  • 15-30 सेकंद या स्थितीत राहा. त्यानंतर दीर्घ श्वास घ्या आणि सामान्य स्थितीत या आणि हे आसन पुन्हा करा.

हँडस्टँड स्ट्रेच

जर तुमच्या मनगटात तीव्र वेदना होत असतील तर आम्ही सांगितलेले व्यायाम नक्की करा. हे ब्‍लड सर्कुलेशन आणि लिम्फ फ्लो वाढवून कोर स्‍ट्रेंथ सुधारण्यासाठी ओळखले जाते. हे तुमचे खांदे, हात, कोर आणि पाठीवर परिणाम करते.

फिंगर बेंडिंग स्ट्रेच

हातांसाठी हा एक अतिशय प्रभावी व्यायाम आहे, जो तुम्हाला नियमितपणे केल्याने फायदा होईल. हे केवळ बोटांची चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त नाही. हा व्यायाम दिवसातून दोनदा फक्त 5 मिनिटांसाठी करता येतो.

Ayodhya Deepotsav: अयोध्येत पार पडला भव्य दिपोत्सव! गिनिस बुकमध्ये झाली नोंद; डोळे दिपवणारे फोटो पाहा

Ben Stokes पाकिस्तानात होता अन् लंडनमध्ये त्याच्या घरी घडलं काहीतरी भयंकर; इंग्लंडच्या कर्णधाराची मदतीसाठी याचना

IPL Retention 2025: Shubman Gill चा मनाचा मोठेपणा,कमी पगारात संघासोबत राहायला तयार; कारण काय तर…

RCB ने मोठा डाव खेळला! ट्रेड करून भारी ओपनर संघात, आता प्रतिस्पर्धींची लागणार वाट

Pench Hot Air Balloon: पर्यटकांसाठी पर्वणी! पेंचच्या व्याघ्र प्रकल्पात 'हॉट एअर बलून', 'पॅरामोटरिंग सफारी', ‘कोलितमारा फ्लाइंग' सुरु

SCROLL FOR NEXT