Multiple Alarms Is Bad For Health sakal
आरोग्य

Health Care News : सकाळी उठण्यासाठी एकापेक्षा जास्त अलार्म सेट करणे पडू शकते महागात, जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ..

Multiple Alarms Is Bad For Health : प्रत्येकजण सकाळी उठण्यासाठी अलार्म सेट करतो. कुठेही वेळेवर पोहोचण्यासाठी झोपेतून उठणे आवश्यक आहे.

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येकजण सकाळी उठण्यासाठी अलार्म सेट करतो. कुठेही वेळेवर पोहोचण्यासाठी झोपेतून उठणे आवश्यक आहे. अनेकांना वेळेवर उठण्याची सवय असते, पण काहींना ती सवय नसते. म्हणूनच बहुतेक लोक एकापेक्षा जास्त अलार्म सेट करून झोपतात. कारण जवळजवळ प्रत्येकजण अलार्ममुळे उठतो, परंतु तुम्हाला माहित आहे का की सकाळी एकापेक्षा जास्त अलार्म सेट करणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतो. जर तुम्हाला सकाळी उठण्यासाठी एकापेक्षा जास्त अलार्म सेट करावे लागत असतील, तर तुमच्या मेंदूसाठी ती चांगली गोष्ट नाही. याचा मेंदूच्या कार्यावर परिणाम होतो.

अमेरिकन न्यूरोलॉजिस्ट ब्रँडन पीटर्स यांच्या मते, एकापेक्षा जास्त अलार्म सेट केल्यानंतर उठणे आणि नंतर पुन्हा झोपणे आपल्याला चांगले वाटू शकते, परंतु यामुळे झोपेची गुणवत्ता खराब होते आणि कमकुवत होते. अशा लोकांना बहुतेक वेळा नीट झोप येत नाही. खरं तर, झोपेच्या शेवटच्या तासांमध्ये, लोक सहसा स्लिप सायकलच्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात असतात, ज्याला रॅपिड आय मूव्हमेंट (Rapid Eye Movement) म्हणून ओळखले जाते. स्मरणशक्ती आणि सर्जनशीलतेसाठी आरईएम झोप महत्त्वाची आहे.

दररोज एकाच वेळी झोपणे आणि जागे होणे उपयुक्त ठरू शकते

स्लीप डिसऑर्डर थेरपिस्ट ॲलिसिया रॉथ म्हणतात की, अलार्म हा जागे होण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. काही लोकांसाठी हे कठीण असू शकते. अशा परिस्थितीत, अशी अलार्म घड्याळे वापरा, ती बंद करण्यासाठी तुम्हाला अंथरुणातून बाहेर पडावे लागेल. तसेच, दररोज एकाच वेळी झोपणे आणि जागे होणे उपयुक्त ठरू शकते.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT