Yoga For Lower Body Fat Sakal
आरोग्य

वजन कमी करण्यासाठी या 2 आसनांचा करा सराव, शरीर होईल सडपातळ व लवचिक

सकाळ डिजिटल टीम

Yoga To Reduce Body Fat: शरीर आकर्षक, सडपातळ व निरोगी असावे; अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. पण यासाठी मेहनत घेण्याची तयारी खूपच कमी लोकांची असते. पण मित्रांनो-मैत्रिणींनो कंटाळा करून कसे चालेल? 

फिट राहायचे असेल तर वर्कआऊट रूटीन नियमित फॉलो करावे लागेल. तेव्हाच शरीरातील अतिरिक्त चरबी घटण्यास मदत मिळेल. व्यायामासोबतच पौष्टिक आहाराचेही नियम फॉलो करणं गरजेचं आहे. आपण देखील वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहात का?

तर मग या लेखाद्वारे आपण दोन सोप्या योगासनांची माहिती जाणून घेणार आहोत. ज्याचा सराव आपण तज्ज्ञ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली करू शकता. 

शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी योगासने (Yoga To Reduce Body Fat)

उत्कटासन

  • सर्वप्रथम ताडासनाच्या स्थितीत उभे राहा. श्वासोच्छवासाची प्रक्रिया सुरू ठेवत पाय गुडघ्यामध्ये दुमडा. 

  • आता दोन्ही हात चेहऱ्याच्या समोर आणा आणि खुर्चीवर बसल्याप्रमाणे आसनस्थितीत यावे. 

  • पाठीचा कणा सरळ ठेवावा. आपल्या क्षमतेनुसार या स्थितीमध्ये काही सेकंद राहावे.

  • आपल्या क्षमतेनुसारच हे आसन दोन ते तीन वेळा करण्याचा प्रयत्न करावा.  

उत्कटासनाचे फायदे  

उत्कटासनाच्या सरावामुळे मांड्या व नितंबाचा भाग मजबूत होतो. यावरील अतिरिक्त चरबीही कमी होते. शरीराचे स्नायू देखील मजबूत होतात.  

सेतु बंधासन 

  • सर्वप्रथम योगमॅटवर आपल्या पाठीवर झोपावे. आता गुडघे दुमडा आणि पाय नितंबाजवळ आणून ठेवा. 

  • आता हात आपल्या शरीराच्या शेजारी ठेवा. हाताचे तळवे जमिनीच्या दिशेनं करून ठेवावेत.

  • आता श्वासोच्छवासाची प्रक्रिया सुरू ठेवत पायांवर जोर द्यावा आणि पोट व कमरेचा भाग वरील बाजूस उचलावा. 

  • खांदे आणि पाय जमिनीवरच ठेवावेत. 

  • आपल्या क्षमतेनुसार या स्थितीत काही सेकंद राहा आणि आसानातून बाहेर यावे. 

सेतु बंधासनाचे फायदे   

या आसनाचा सराव केल्यास मांड्या व पाठीच्या भागातील स्नायू मजबूत तसेच लवचिक होतात. सेतु बंधासनाचा नियमित अभ्यास ओटीपोटाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. 

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratan Tata Funeral : रतन टाटांच्या अंत्यसंस्कारासाठी मुंबईत वाहतुकीत बदल; 'या' रस्त्यावर वाहनांना 'नो' एंट्री

पाकिस्तानची वाट लावली! Harry Brook चे त्रिशतक, जो रूटसह मोडला ९० वर्षांपूर्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड; इंग्लंड ७९० पार

Pune Porsche Crash Case : तीनशे शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा सुनावणाऱ्या 'त्या' दोन अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई!

Latest Maharashtra News Updates : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी रतन टाटा यांना अखेरची श्रद्धांजली वाहिली

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याची उत्सुकता, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाषणाकडे लक्ष

SCROLL FOR NEXT