headache  sakal
आरोग्य

Monsoon Health Tips : पावसाळ्यात डोकेदुखी वाढलीये? मग ‘ही’ असू शकतात कारणे! जाणून घ्या

Monsoon Health Tips : पावसाळ्यात डोकेदुखी का वाढते हे जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का?

सकाळ डिजिटल टीम

आजच्या काळात डोकेदुखी ही लोकांची सामान्य समस्या बनली आहे. काही वेळा सकाळी उठल्यानंतर काही लोकांना डोकेदुखी सुरू होते. अनेकदा डोकेदुखी इतकी वाढते की, काहीच खाऊ वाटत नाही, ना काही काम करावेसे वाटते. अनेकवेळा आपल्याला पुरेशी झोप मिळत नाही किंवा आपण तणावग्रस्त होतो त्यामुळे आपल्याला डोकेदुखीचा त्रास होतो. पण पावसाळ्यात ही समस्या खूप वाढते, पावसाळ्यात डोकेदुखी का वाढते हे जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का? तुमच्याही मनात हा प्रश्न असेल तर आम्ही या प्रश्नाचे उत्तर सांगतो.

या कारणामुळे होते डोकेदुखी

  • पावसाळ्यात डिहायड्रेशन हे डोकेदुखीचे सर्वात मोठे कारण आहे. या हंगामात आर्द्रता इतकी जास्त असते की तुम्हाला खूप घाम येतो. त्यामुळे शरीरातून खूप पाणी निघून जाते आणि शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाली की डोकेदुखीचा त्रास होतो.

  • अनेकदा पाऊस पडल्यानंतर आर्द्रता आणखी वाढते. त्यामुळे मेंदूतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊ लागते. त्यामुळे डोकेदुखीची समस्या उद्भवते. ब्रेन सेरोटोनिन हे केमिकल पावसाळ्यात असंतुलित होते. यामुळे तुम्हाला डोकेदुखी देखील जाणवू शकते.

  • पावसाळ्यात आर्द्रतेमुळे तणावही वाढतो. यामुळे तुम्हाला डोकेदुखी देखील जाणवू शकते. शरीरात मेलाटोनिन, सेरोटोनिन आणि व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यामुळे तणाव जाणवतो.

हे घरगुती उपाय करा

हायड्रेटेड रहा

पावसाळ्यात जास्तीत जास्त पाणी प्यावे. दिवसातून किमान चार लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे डोकेदुखीचा त्रास होतो. पाण्याव्यतिरिक्त, तुम्ही रस आणि सूप देखील घेऊ शकता.

एक रुटीन तयार करा

डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी एक रुटीन बनवा आणि ते फॉलो करा. योग्य वेळी झोपा, संतुलित आहार घ्या आणि तणावमुक्त राहा. पावसाळ्यात जीवनशैलीत बदल केल्यास डोकेदुखीपासून आराम मिळतो.

हेअर ऑइल लावा

तसेच तुमच्या आवडीचं हेअर ऑइल घ्या आणि ते थोडं गरम करून घ्या. या हेअर ऑइलने तुमच्या डोक्यात हलक्या हातांनी मसाज करा किंवा दुसऱ्या व्यक्तीकडून तेलाने मसाज करुन घ्या. यामुळे तुम्हाला आराम मिळेल आणि डोकं शांत होण्यास मदत होईल.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT