Sarcopenia Symptoms  Sakal
आरोग्य

Sarcopenia Symptoms सार्कोपेनियाशी म्हणजे काय? वय वाढताना स्नायूंकडे लक्ष देणे का आहे गरजेचं

सार्कोपीनिया ज्याला गंभीर टप्प्यावर पोहोचलेली स्नायूंची हानी असेही म्हटले जाते.

Harshada Shirsekar

Sarcopenia Symptoms & Cause :  आपले वय जसजसे वाढत जाते, तसतसे स्नायूंची झीज देखील होऊ लागते. निरोगी आरोग्य जगण्यासाठी शरीराचे स्नायू देखील बळकट असणे गरजेचं आहे. पण अनेकांकडून उतारवयात एकूणच स्नायूंच्या होणाऱ्या हानीकडे बरेचदा दुर्लक्ष केले जाते.  १७.५ टक्‍के भारतीयांमध्ये स्नायूंच्या गंभीर हानीची म्हणजे सार्कोपीनिया या आजाराची समस्या आढळून येते. 

आपण कशाप्रकारे वृद्धावस्था गाठणार याचे निदान स्नायूंच्या आरोग्यावरून कसे करता येते?  उतारवयात सार्कोपीनिया आजाराचे परिणाम कमी करण्यासाठी आपण स्नायूंच्या आरोग्याचे मोजमाप करून त्यांना पुन्हा कसे घडवता येईल? यावर अबॉटच्या न्युट्रिशन बिझनेसमधील मेडिकल अँड सायंटिफिक अफेअर्स विभागाचे प्रमुख डॉ. इरफान शेख यांनी सविस्तर माहिती दिली आहे

सार्कोपीनिया आणि तुमचे आरोग्य

सार्कोपीनिया ज्याला गंभीर टप्प्यावर पोहोचलेली स्नायूंची हानी असेही म्हटले जाते. या आजारामध्ये वयोमानानुसार व्यक्तीच्या स्नायूंचे वस्तूमान खूप प्रमाणात घटते व त्याबरोबरच ताकद-कार्यक्षमताही कमी होते.

महत्त्वाचे म्हणजे स्नायूंची हानी होणे हा फक्त म्हातारपणी जडणारा आजार नाही, तर वृद्ध अवस्थेपूर्वीही या आजाराची लागण होऊ शकते. खरंतर चाळीशी सुरू झाल्यानंतर दर दहा वर्षांत शरीरातील स्नायूंचे वस्तूमान आठ टक्क्यांपर्यंत घटू शकते. ७० वर्षांनंतर हे प्रमाण दुप्पट होण्याची शक्यता असते.

काय होऊ शकतात परिणाम?

  • स्नायूंच्या हानीमुळे शरीराची ऊर्जा कमी होते आणि हालचाली मंदावतात.

  • तोल जाऊन पडण्याचा व फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो.

  • आजारपण वा शतस्त्रक्रियेतून वाचण्याची आणि प्रकृती सुधारण्याची एखाद्या व्यक्तीची क्षमताही यामुळे कमी होऊ शकते.

स्नायूंचे वस्तूमान कसे मोजावे? 

आपल्या स्नायूंच्या ताकदीची परीक्षा कशी घ्यायची? ग्रिप टेस्ट अर्थात हाताची पकड आजमावणे ही एक साधीसोपी चाचणी आहे, जी तुम्ही स्वत:च करून पाहू शकता. बरणीचे झाकण उघडणे, हाताने संत्र पिळणे किंवा आपण किती ताकदीने हस्तांदोलन करतो, याची तपासणी तुम्ही करून पाहू शकता. 

आपल्या कृतीत तुम्हाला काही फरक जाणवला तर याबाबत काही पाऊल उचलण्याची वेळ आली आहे, असे म्हणायला हवे. चेअर चॅलेंज चाचणीसुद्धा तुमच्या स्नायूंची ताकद मोजण्याचे एक सोपे साधन आहे, ज्यामुळे तुम्हाला सुधारणेच्या दृष्टीने वेळच्यावेळी काही कृती करता येईल. एका ४३ सेमी (१.४ फूट) उंचीच्या खुर्चीवर ५ वेळा सीट-अप्स करण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागतो? यावरून तुमच्या स्नायूंचे वय समजू शकते.  

या गोष्टी ठेवा लक्षात 

सकाळचा नाश्ता महत्त्वाचा : 

सकाळचा नाश्ता आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो. कारण यामुळे तुमचे दिवसभरातील कार्य सुरळीत सुरू राहते. सकाळच्या नाश्त्यामध्ये पौष्टिक आहाराचा समावेश असावा. अंडी, कडधान्ये, फळे व दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करावे. यामुळे दिवसभर शरीरात ऊर्जा टिकून राहील. प्रथिनेयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा.

नियमित करा व्यायाम  

निमयित व्यायाम केल्यास शरीरातील स्नायू बळकट राहण्यास मदत मिळते. वर्कआऊट रूटीनमध्ये आपण चालणे, सायकल चालवणे, पोहणे, पायऱ्या चढणे यासारख्या व्यायामांचा समावेश करू शकता. 

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT