Fenugreek Seeds sakal
आरोग्य

Fenugreek Seeds For Weight Loss : वजन कमी करण्यासाठी या चार प्रकारे करा मेथीच्या दाण्यांचे सेवन... वाढते वजन येईल आटोक्यात

सकाळ डिजिटल टीम

आजच्या काळात बहुतेक लोक वजन कमी करण्यासाठी धडपडत असतात. पण तरीही ते वजन कमी करू शकत नाहीत कारण ते त्यांच्या आहाराची काळजी घेत नाहीत. तुम्ही वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची औषधे, पावडर, शेक किंवा फॅन्सी डाएट फॉलो करत असाल. पण, तुम्हाला माहित आहे का? तुमच्या स्वतःच्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी उपलब्ध आहेत ज्या वजन कमी करण्यात मदत करतात.

यापैकी एक मेथीचे दाणे आहे. हे वजन कमी करण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे. मेथीचे दाणे मेटाबॉलिक रेट वाढवू शकतात, ज्यामुळे शरीराला अधिक कॅलरी बर्न करण्यास मदत होते. जर तुम्हालाही नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करायचे असेल, तर तुम्ही या चार प्रकारे मेथीच्या दाण्यांचे सेवन करू शकता.

मेथीच्या दाण्यांचे पाणी प्या

वजन कमी करण्यासाठी तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी मेथीच्या दाण्यांचे पाणी पिऊ शकता. मेथीमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असल्याने भूक नियंत्रित ठेवण्यास मदत होते. जे वजन कमी करण्यास मदत करते. मेथीच्या दाण्यांचे पाणी बनवण्यासाठी १-२ चमचे मेथीचे दाणे एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या.

मेथीच्या दाण्यांचा चहा

मेथीच्या दाण्यांचा चहा शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतो, पचनास मदत करतो आणि चयापचय वाढवतो, या सर्व गोष्टी वजन कमी करण्यास हातभार लावतात. हा चहा बनवण्यासाठी एक चमचा मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. आणि सकाळी तुळशीच्या पानांसोबत पाण्यात उकळा. त्यात थोडा मध टाकून पिऊ शकता.

मेथी दाण्याची पावडर बनवा

तुम्ही मेथीच्या दाण्यांची पावडर बनवूनही त्याचे सेवन करू शकता. मेथीच्या दाण्याची पावडर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास, भूक कमी करण्यास आणि मेटाबॉलिक रेट वाढविण्यास मदत करते. मेथीच्या दाण्याची पावडर बनवण्यासाठी प्रथम मेथी दाणे भाजून बारीक वाटून घ्या. आता 1 चमचे ही पावडर एका ग्लास कोमट पाण्यात किंवा दुधात मिसळा आणि नियमित प्या.

मेथी दाणे आणि मध

वजन कमी करण्यासाठी मेथी दाणे आणि मधाची पेस्ट देखील खाऊ शकतो. ही पेस्ट बनवण्यासाठी प्रथम मेथी दाणे काही तास पाण्यात भिजत ठेवा. आता भिजवलेल्या मेथीच्या दाण्याची पेस्ट बनवा. त्यात एक चमचा मध मिसळा. ही पेस्ट सकाळी रिकाम्या पोटी खावी.

AUS W vs SA W: गतविजेता ऑस्ट्रेलिया 15 सामन्यानंतर मोक्याच्या क्षणी हरला; दक्षिण आफ्रिकेने इतिहास घडवला

Hamas Chief Death: हमास प्रमुख याह्या सिनवर इस्राईल लष्कराच्या हल्ल्यात ठार; पंतप्रधान नेत्यानाहूंची घोषणा

Baba Siddiqui Case: मुंबई पोलीस अॅक्शन मोडमध्ये, आरोपी शिवकुमार गौतम आणि जीशान अख्तरच्या विरोधात लुक आउट सर्कुलर जारी

Navi Mumbai Assembly Elections: नवी मुंबईत महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; शरद पवार गट नवा डाव खेळणार!

IND vs NZ: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्व बदलाचा फैसला झाला! न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघाची घोषणा

SCROLL FOR NEXT