gym open sakal
आरोग्य

Health: अति फिटनेससुद्धा ठरतोय आरोग्यासाठी घातक?

खेळाडूंमध्ये ह्रदयविकाराचे प्रमाण वाढतेय; शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष

सकाळ डिजिटल टीम

अश्‍विनी पवार : सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - मेजर ध्यानचंद यांचा वाढदिवस म्हणजेच २९ ऑगस्ट. हा दिवस देशात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. मात्र, हा दिवस साजरा करीत असताना खेळाडूंचे शारीरिक व मानसिक आरोग्यावर चर्चा होणे हे गरजेचे आहे.

प्रत्येक स्पर्धेत भाग घेण्याचा अट्टहास, फार्म टिकून राहावा यासाठी सुरू असणारा खटाटोप, या सर्वांमुळे पडणाऱ्या ताणामुळे खेळाडू आपल्या आरोग्याशी तर खेळ करीत नाहीत ना? हा प्रश्‍न उपस्थित होतो आहे. याचाच परिणाम म्हणून खेळाडूंमध्ये ह्रदयरोगाचे प्रमाण वाढत आहे.

खेळाडू म्हटले की तंदुरुस्त शरीरयष्टी व व्यायामाने कमावलेले बळकट स्नायू अशीच प्रतिमा डोळ्यापुढे उभी राहते. सध्याच्या स्पर्धेत आपला फिटनेस राखण्यासाठी खेळाडू प्रचंड मेहनत घेत असतात.

त्या अट्टहासापायी अनेकदा शरीराच्या तक्रारींकडे खेळाडूंकडून दुर्लक्ष केले जाते. याचाच परिणाम म्हणून खेळाडूंमध्ये ह्रदयरोगाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मैदानावर असतानाच खेळाडूला ह्रदयविकाराचा झटका आल्याच्या घटनाही देशात घडल्या आहेत. त्यामुळे खेळाडूंचे आरोग्य हा कळीचा मुद्दा बनला आहे.

अति व्यायाम व ‘डाएट सप्लिमेंट’

खेळाडूंकडून अनेकदा बाहेरील तंदुरुस्तीकडे लक्ष दिले जाते. त्यासाठी अतिव्यायाम, कडक सकस आहाराचे पालन केले जाते. मसल वाढविण्यासाठी विविध ‘प्रोटिन सप्लिमेंट’ घेतल्या जातात. त्याचा अतिवापरही ह्रदयासाठी घातक ठरू शकतो.

प्रत्येक खेळाडूचे शरीर वेगळे असते. त्यामुळे खेळाडूने आपला आहार ठरविण्यासाठी शरीराची गरज ओळखण्यासाठी काही मूलभूत तपासण्या करणे आवश्‍यक आहे. अनेकदा तपासण्या न करताच विशिष्ट डाएट सुरू केला जातो.

त्यामुळे शरीराला कोणते घटक हवे? कोणते नको हे समजून येत नाही. त्यामुळे खेळाडूंचा आहार ठरविण्यासाठी विशेष क्रीडा आहारतज्ज्ञ असतात. त्यांच्याकडूनच खेळाडूने आहार ठरवून घेतला पाहिजे.

स्पर्धेत टिकून राहण्याचा तणाव

क्रीडा जगतालाही जितके प्रसिद्धीचे वलय आहे, तितकीच या क्षेत्रात तीव्र स्पर्धाही आहे. यासाठी वयाच्या पंधराव्या वर्षांपासूनच विविध स्पर्धासाठी तयारी केली जाते. त्यात टिकून राहण्यासाठी खेळाडू सातत्याने सहभाग घेत असतात.

आपला असणारा फॉर्म टिकवून ठेवण्यासाठीही कष्ट घेत असतात. मात्र, अतिखेळामुळे थकलेल्या शरीराला आरामाचीही गरज असते. हा आराम कमी मिळाल्याने खेळाडूंना दुखापतीला सामोरे जावे लागते. त्यामुळे दोन स्पर्धांच्या दरम्यान खेळाडूने शरीराला आराम देणे गरजेचे आहे.

कोरोनाचा परिणाम

कोरोना महामारीनंतर नागरिकांमध्ये ह्रदयविकाराचे प्रमाण वाढले आहे. त्‍याचा परिणाम खेळाडूंच्या आरोग्यावरही झालेला दिसून येतो. ज्यांना कोरोना होऊन गेला आहे, त्यांना इतरांच्या तुलनेत ह्रदयविकार, मधुमेह यांच्यासारखे विकार उद््भवल्याचे निरीक्षणातून आढळून आल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.

नियमित व्यायाम व डाएट केला म्हणजे आपण तंदुरुस्त आहोत, असा समज अनेक खेळाडूंमध्ये असतो. मात्र, जे नियमाने जीमसारखे व्यायाम करतात. त्यांनी वेळोवेळी आपल्या आरोग्याच्या चाचण्या करून घेणे गरजेचे आहे. स्पर्धेसाठी मैदानावर उतरताना याबाबत केलेला निष्काळजीपणा अंगलट येऊ शकतो.

- डॉ गौतम जुगल, हृदयविकारतज्ज्ञ

आहारातज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय अनेकदा खेळाडू अचानकपणे आहारात बदल करतात. प्रोटिन सप्लिमेंटचा अतिवापरही ह्रदयरोगाला आमंत्रण देऊ शकतो. फिटनेस राखण्यासाठी शरीराला आराम देणेही तितकेच गरजेचे आहे. मात्र, अनेक खेळाडू याकडे दुर्लक्ष करतात.

- पूजा कुलकर्णी-मोकाशी, स्पोर्टस फिजिओथेरपिस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT