आरोग्य‍ हीच खरी संपत्ती Sakal
आरोग्य

आरोग्य‍ हीच खरी संपत्ती

सकाळ वृत्तसेवा

मी एकदा बॉडी शेमिंगचा अनुभव घेतला आहे, ज्‍यामुळे मला चिंता वाटण्‍याबरोबरच राग आला होता. मी मार्गदर्शक तत्त्व म्‍हणून स्‍वत:ची काळजी घेण्‍यास सुरुवात केली, जिथून आत्‍मचिंतनाला सुरुवात झाली. चिंतन आणि वाचनामुळे माझे मानसिक आरोग्‍य उत्तम राहते, तसेच मला मन:शांतीही मिळते.

अभिनय क्षेत्रात असल्यामुळे मला शारीरिक व मानसिक आरोग्‍य उत्तम ठेवावेच लागते. अर्थात याच क्षेत्रातील नव्हे, तर सर्वांनीच आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम ठेवणे गरजेचे आहे. शरीरस्वास्थ्यासाठी मी जंकफूडचे सेवन न करता हिरव्‍या पालेभाज्‍या, ताजे अन्‍न, फळे व पोषक दुग्‍धजन्‍य पदार्थ असलेल्‍या संतुलित आहाराचे सेवन करते.

मी दररोज मेडिटेशन करते, ज्‍यामुळे मला शांतता मिळण्‍यासह ध्येयाकडे लक्ष केंद्रित करता येते आणि ऊर्जा वाढते. आनंदाचा शोध घेताना मी नेहमी प्रामाणिकपणाला प्राधान्‍य देते, तसेच स्‍वत:ची काळजी घेण्‍यालाही महत्त्व देते.

जीवन सर्वांगीण आरोग्‍य व आत्‍म-स्‍वीकृतीने भरलेले आहे. मी माझ्या फिटनेस दिनक्रमामध्‍ये तणावमुक्‍त जीवनशैली राखण्‍याचा प्रयत्‍न करते. आजच्‍या धावपळीच्‍या युगामध्‍ये तणाव हे आरोग्‍यविषयक समस्‍यांसाठी प्रमुख कारण आहे.

मला आजही आठवते, की तणावामुळे मला माझ्या कामावर लक्ष केंद्रित करता येत नव्‍हते आणि मन व शरीरावरदेखील मोठा परिणाम होत होता; पण मी मेडिटेशन व योगांद्वारे तणाव दूर करण्‍याचा प्रभावी मार्ग शोधला. वर्कआऊट नित्‍यक्रमाचे पालन केल्‍यानेही तणावाचे व्‍यवस्‍थापन करण्‍यास मदत झाली आहे.

आपण आपल्‍या आरोग्‍याला बहुमूल्‍य संपत्ती मानले पाहिजे. जीवनशैली आरोग्‍यदायी राखण्‍यासाठी दिवसभर भरपूर पाणी पित हायड्रेटेड राहण्‍याची गरज आहे. हायड्रेशन पचन, अभिसरण आणि तापमानावर नियंत्रण अशा शरीराच्‍या विविध कार्यांमध्‍ये साह्य करते. मद्यपान व साखरयुक्‍त पेयांचे सेवन कमी करणे आवश्‍यक आहे, त्‍याऐवजी पाणी, हर्बल चहा आणि इतर हायड्रेटिंग फ्लूईड्सचे सेवन करावे.

नियमितपणे हात स्‍वच्‍छ धुणे व डेंटल केअर यांसारख्‍या उत्तम सवयी आजाराच्‍या प्रसाराला प्रतिबंध करण्‍यास मदत करतात आणि आरोग्‍य उत्तम राखतात. नियमितपणे आरोग्‍यतपासणी संभाव्‍य आजाराचे लवकर निदान करू शकतात, ज्‍यामुळे वेळेवर हस्‍तक्षेप व उपचार करता येऊ शकतात.

मी सध्या एण्ड टीव्हीवर ‘हप्‍पू की उलटन पलटन’ या मालिकेत दबंग दुल्‍हनिया राजेश सिंगची भूमिका साकारत आहे. त्यामुळे तंदुरूस्‍त राहण्‍यासाठी मी सायकल चालवते. क्रीडाप्रेमी असल्‍यामुळे मी माझ्या परिसरातील आवारात सायकलवरून फेरफटका मारते.

मात्र, माझ्या वयाच्या अनेक व्‍यक्‍ती सायकल फक्‍त मुलांसाठी खेळण्‍याकरिता असल्‍याचे मानतात आणि त्‍यांना सायकल चालवण्‍याचे शारीरिक व मानसिक आरोग्‍यविषयक फायदे माहीत नाहीत, याचे दुःख वाटते.

सायकल चालवणे हा आपल्‍या दैनंदिन जीवनात नियमित व्‍यायामाचा समावेश करण्‍याचा सर्वांत प्रभावी मार्ग आहे. सायकल चालवल्‍यामुळे स्‍नायूबळ वाढते, चयापचय क्रिया सुधारते, तसेच विविध आजारांचा धोकाही कमी होतो. हा सर्व वयोगटांतील व्‍यक्‍तींसाठी अनुकूल असा आरोग्‍यदायी, आनंददायी व्यायाम आहे.

सुदृढ आरोग्यासाठी टिप्स...

सगळ्‍यांनी त्‍यांच्‍या व्‍यग्र वेळापत्रकामधून वेळ काढत शारीरिक व मानसिक आरोग्‍याला प्राधान्‍य द्यावे.

समर्पितता, संयम व स्‍वत:ची काळजी घेण्‍यासह आरोग्‍यदायी राहण्‍यास प्राधान्‍य द्या.

संतुलित आहारासह शरीराला उत्तम पोषण द्या. धमाल व आरामदायी क्षणांचा आनंद घ्‍या.

तुमचे प्रत्‍येक पाऊल चैतन्‍य आणि स्‍वास्‍थ्‍याच्‍या दिशेने असले पाहिजे. तुमची शारीरिक ताकद व क्षमतेवर विश्‍वास ठेवा.

आरोग्‍य ही खरी संपत्ती आहे, म्‍हणून आरोग्‍याची कदर करा आणि आरोग्‍य उत्तम राखण्‍याचा प्रयत्‍न करा.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT