Methi Benefits sakal
आरोग्य

Methi Benefits: हिवाळ्यात मेथी खा अन् बिनधास्त वजन कमी करा

जाणून घ्या आणखी फायदे

सकाळ डिजिटल टीम

हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाण्याकरीता विशेष प्राधान्य दिले जाते. त्यामुळे हिवाळ्यात सर्वांचा कल हा हिरव्या पालेभाज्या खाण्याकडे असतो. सध्या मार्केटमध्ये मेथीची भाजीची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.

मेथीच्या पाने शरिरासाठी अधिक फायदेशीर असतात. हिवाळ्यात मेथीपासून बनविलेले पराठे असो की भाजी किंवा पूरी किंवा मेथीची दाळ आवर्जून खातात. मेथीमध्ये प्रामुख्याने कॅल्शियम आयरन, प्रोटीन आणि फॉस्फोरस असतात. ज्यामुळे मेथी पचायलाही सोपी जाते. चला तर जाणून घेऊया मेथी खाल्याने काय फायदे होतात. ( Methi Benefits eat methi leaves in winter and loss weight )

हिवाळ्यात मेथी खाण्याचे फायदे-


वजन कमी होण्यास मदत करते

मेथीची पाने शरिरासाठी खूप फायदेशीर असते. अनेक लोकांची अशी तक्रार असते की हिवाळ्यात वजन वाढतं. अशात वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी तुमच्या डाईटमध्ये मेथीचा समावेश करा. कारण मेथीमध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर असते. फायबर तुमच्या पोटाला भरुन ठेवतं ज्यामुळे तुम्हाला फार भूक लागत नाही आणि तुमचं सहज वजन कमी होते.

ब्लड शुगर (blood sugar) कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत करते

डायबिटीजच्या रुग्णांना आपल्या डाइटकडे विशेष लक्ष द्यावे लागते. हिवाळ्यात तर डायबिटीज लोकांचा शुगर लेवल वाढू शकतो. शुगर लेवलला कंट्रोल करण्यासाठी मेथीचा डाइटमध्ये समावेश करणे गरजेचे असतं. असं केल्याने ब्लड शुगर लेवल अधिक काळ कंट्रोलमध्ये राहू शकते.

स्कीनसाठी अधिक उपयुक्त
हिवाळ्यात स्कीनला भेगा पडतात पण जर तुम्ही मेथी खाल्ली तर तुम्हाला त्याचा फायदा दिसून येईल. मेथीच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात anti-oxidants असतात जे चेहऱ्यावरील मुरुम दूर करतात. मेथीचा वापर करताना मेथीच्या पानांची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावा यामुळे चेहऱ्यावरील डाग दूर होतील आणि चेहऱ्यावर तेज दिसून येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: मनसे नेते अमित ठाकरे यांनी बजावला मतदानाचा हक्क

Nashik Vidhan Sabha Election 2024 : माझे वोट, माझी ताकद! पोलिस आयुक्तांचे मतदानाचे आवाहन

Ajit Pawar : विनोद तावडे प्रकरणामुळे महायुतीला बसणार फटका? वाचा काय म्हणाले अजित पवार

Sindhudurg Assembly Election 2024 : मतदानासाठी ओळखपत्र सोबत नेणे बंधनकारक

अर्ध्यावरती डाव मोडला! २९ वर्षांनी एन आर रहमान व सायरा बानू यांचा घटस्फोट, निवेदन जाहीर करत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT