health morning walk on an empty stomach is beneficial or harmful  
आरोग्य

Morning Walk: सकाळी रिकाम्या पोटी चालण्याचे फायदे अन् तोटे; जाणून घ्या

आरोग्य तज्ञ दररोज सुमारे 5000 पावले चालण्याचा सल्ला देतात. दररोज सकाळी 20 ते 30 मिनिटे चालणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात येते.

सकाळ डिजिटल टीम

आपला फिटनेस जपण्यासाठी बहुतांश लोक मॉर्निंग वॉक करताना दिसतात. आरोग्य तज्ञ दररोज सुमारे 5000 पावले चालण्याचा सल्ला देतात. दररोज सकाळी 20 ते 30 मिनिटे चालणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात येते.

आजकाल जगभरातील लोक लठ्ठपणाने त्रस्त आहेत, अनेकांच्या शारीरिक हालचाली लक्षणीयरीत्या कमी केल्या आहेत. त्यामुळे पोट आणि कमरेची चरबी कमी करणे अवघड झाले आहे. त्यामुळे सध्याच्या धकाधकीच्या जीवनातून स्वतःसाठी वेळ काढत सध्याचा तरुण वर्ग सकाळी चालण्याला अधिक महत्त्व देताना दिसत आहे.

तुम्ही अनेकदा ऐकलं असले सकाळी रिकाम्या पोटी हेल्दी फूड, हेल्दी ड्रिंक्स पिल्याने तुमचे वजन कमी होण्यास, फिट राहण्यास मदत होते, तर आज आपण जाणून घेणार आहोत, सकाळी रिकाम्या पोटी चालण्याचे फायदे अन् तोटे

रिकाम्या पोटी धावलात तर तुमचा लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. जर तुम्ही खूप लठ्ठ असाल तर सकाळी रिकाम्या पोटी धावणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल.

रिकाम्या पोटी धावालात किंवा चाललात तर हृदयविकाराचा धोका कमी होतो. दररोज 10-15 मिनिटे धावले पाहिजे. त्यामुळं हृदयाचे पंप योग्यरित्या करते आणि रक्त परिसंचरण सुधारते.

रिकाम्या पोटी चालल्याने किंवा धावल्याने पचनक्रिया सुधारते, आतड्यांसंबंधी पेटके, मळमळ, उलट्या आणि अतिसार यांसारख्या पाचक समस्या दूर होतात.

ज्या लोकांना रात्रीच्या झोपेची समस्या भेडसावत असते त्या लोकांनी रिकाम्या पोटी चालण किंवा धावणं गरजेचं असतं. यामुळे आरोग्य सुधारते.

तोटे काय आहेत?

रिकाम्या पोटी चाललात किंवा धावलात तर तुम्हाला थकवा लवकर जाणवतो. त्यामुळं मॉर्निंक वॉकला जाण्यापूर्वी खजूर यांसारखे हेल्दी पदार्थ खा आणि मग जा.

शरीराला इजा होण्याची शक्यता वाढते. रिकाम्या पोटी चालल्याने आणि धावल्याने शरीरात उर्जा कमी होते.

आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, धावण्याच्या 15 -30 मिनिटे आधी केळी खावे किंवा एनर्जी ड्रिंक प्यावे. त्यामुळे शरीरातील नैसर्गिक साखरेची पातळी सहज पचते. एनर्जी ड्रिंकमुळे शरीराला झटपट ऊर्जा मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT