Brain Disease sakal
आरोग्य

Brain Disease : आजार येतो चोर पावलांनी ; एक लाखात आढळतात ३०० पार्किन्सनचे रुग्ण

औषधी आणि व्यायामातून नियंत्रण शक्य

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मेंदूशी संबधित असलेला व दीर्घकालीन सोबत राहाणारा मेंदूरोग म्हणज पार्किन्सन(कंपवात). यात मेंदूतील न्युरो ट्रान्समिटर डोपेमाईन कमी होत जाते. त्यातून हा आजार पुढे येतो. देशात एक कोटीच्या घरात पार्किन्सनच्या विळख्यात आहेत. वयस्कांमध्ये मोठ्या प्रमाणात हा आजार दिसते.

वयाच्या साठीनंतरच्या वयोवृद्धांमध्ये एक ते दीड टक्के हा रोग दिसून येतो. परंतु हा रोग वयोवृद्धांनाच होतो असे नाही, तरुण वयातही होत असतो. दर लाखात किमान ३०० जण या आजाराच्या विळख्यात सापडतात.

दरवर्षी १८ ते २० जणांची भर यात पडते. ब्रिटीश चिकित्सक जेम्स पार्किन्सन यांनी १८१७ साली एका निबंधाद्वारे या आजाराची लक्षणे जगासमोर मांडली. त्यांच्या स्मृतिसाठी या आजाराला पार्किन्सन असे नाव देण्यात आले. त्यानुसार ११ एप्रिल हा दिवस जागतिक पार्किन्सन दिवस म्हणून पाळला जातो.

जगाच्या पाठीवर

६५ वर्षांवरील १०० लोकांपैकी एकाला हा आजार होतो.

जगात सुमारे ९० लाख या आजाराचे रुग्ण आहेत.

भारतात या रोगाचे ८ ते ९ लाख रुग्ण आहेत. १० वर्षानंतर हे प्रमाण दुप्पट होईल.

८ ते १० टक्के रुग्णांना पार्किन्सस या आजाराला अनुवांशिक कारण असते.

४० वर्ष वयोगटाखालील तरुणांमध्ये सुद्धा हा रोग दिसून येतो. जेव्हा हा रोग ४० ते ६० वर्षे वयोगटातील लोकांना होतो तेव्हा त्याला पार्किन्सनचा तरुण प्रारंभ म्हणतात. ४० वर्षांपेक्षा कमी वयामधे किशोर पार्किन्सन रुग्ण असतात.

जे रुग्ण औषधाने बरे होत नाही, त्यांच्यासाठी ‘डीप ब्रेन स्टिम्युलेशन'' शस्त्रक्रिया फायद्याची ठरते. हृदयात जसा पेसमेकर बसविला जातो, तसा पेसमेकर मेंदूत बसविला जातो. त्याचा रिमोट हातात असतो. गरजेनुसार रिमोटच्या मदतीने पॉवर वाढविता येतो.

-डॉ. चंद्रशेखर मेश्राम, प्रसिद्ध मेंदूरोग तज्ज्ञ, नागपूर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS: भारताला एकच विमान मिळेना, संपूर्ण संघाला एकत्र जाता येईना! BCCI चा जुगाड, रोहित शर्मा...

Kalyan East Assembly Election : विरोधी पक्षांकडून वोट जिहादचा नारा दिला जातोय; भाजपा नेता स्मृती इराणी यांचा आरोप

Ulhasnagar News : उल्हासनगरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त सचिन गोरे ॲक्शन मोडमध्ये; 18 गुंड केले तडीपार

Sambhaji Raje Chhatrapati: छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु केवळ जिजामाता, संभाजीराजे छत्रपतींचे अमित शहांना उत्तर!

Amit Deshmukh : महाविकास आघाडीला लोकसभेपेक्षा अधिक कौल; अमित देशमुख यांचा विश्वास

SCROLL FOR NEXT