sugarcane google
आरोग्य

Health : मधुमेह असलेल्या रुग्णांनी उसाचा रस प्यावा का ? जाणून घ्या.

नमिता धुरी

मुंबई : उसाचा रस हा एक असा रस आहे जो शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करतो, परंतु मधुमेहाच्या रुग्णांची साखर वाढवू शकतो.

मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या आहारात विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जातो. गोड पदार्थांच्या बाबतीत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात उसाचा रस सर्वांनाच आवडतो, पण मधुमेही रुग्ण मात्र याबाबत साशंक असतात.

ऊसाचा रस शरीरातील पाण्याची कमतरता तर भरून काढतोच त्याच बरोबरीने ताजेतवाने ठेवतो, असे तज्ज्ञ सांगतात. पण त्यामुळे मधुमेही रुग्णांची रक्तातली साखर वाढू शकते. ऊसाचा रस आरोग्यासाठी कसा फायदेशीर आहे आणि मधुमेहाच्या रुग्णांची साखर कशी वाढवते ते जाणून घेऊया.

उसाचा रस आरोग्यासाठी कसा फायदेशीर आहे:

डॉ. पॉला गोयल, संस्थापक आणि सल्लागार, फेथ क्लिनिक म्हणतात की एक ग्लास उसाच्या रसामध्ये १८० कॅलरीज, ३० ग्रॅम साखर आणि हाय फायबर असते. उसाच्या रसामध्ये ७०-७५ टक्के पाणी, १३-१५ टक्के सुक्रोज आणि १०-१५ टक्के फायबर असते.

यामध्ये फिनोलिक संयुगे, प्लांट स्टेरॉल आणि पोलिकोसॅनॉलसह विविध फायटोकेमिकल्स आहेत. या फायटोकेमिकल्समध्ये अँटिऑक्सिडंट, कोलेस्ट्रॉल कमी करणारे गुणधर्म असतात. ते आरोग्यासाठी अनेक फायदे देतात. पोषक तत्वांनी युक्त असलेल्या या रसामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, मॅग्नेशियम, झिंक, थायामिन, रिबोफ्लेविन आणि शरीराला निरोगी ठेवणारे अनेक अमिनो अॅसिड असतात.

उसाचा रस साखर कशी वाढवू शकतो:

डॉ.गोयल म्हणाले की, उसाच्या रसाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत, तरीही मधुमेहींनी उसाच्या रसाचे सेवन करू नये. उसाच्या रसामध्ये नैसर्गिक साखर म्हणजेच सुक्रोजचे प्रमाण जास्त असते.

मधुमेही रुग्णांनी उसाचा रस सेवन करताना खूप सावधगिरी बाळगली पाहिजे कारण तो खाल्ल्यानंतर रक्तातील साखर झपाट्याने वाढते आणि नंतर साखर कमी होण्याची शक्यता जास्त असते. उसामध्ये फ्रक्टोजपेक्षा सुक्रोजचे प्रमाण जास्त असते. तज्ज्ञांच्या मते, उसाचा ग्लायसेमिक इंडेक्स 43 आहे, जो फारसा जास्त नाही, परंतु आरोग्य लक्षात घेऊन त्याचे मर्यादित प्रमाणात सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

उसाचा रस पिताना या गोष्टी लक्षात ठेवा :

उसाच्या रसात थोडे लिंबू, आल्याचा रस टाकल्यास आरोग्याला फायदा होईल.

ते रिकाम्या पोटी खाण्याऐवजी, काही प्रथिनेयुक्त स्नॅक्स जसे की ड्रायफ्रुट्स किंवा बियाणे सह सेवन करा.

२०० मिली पेक्षा जास्त उसाचा रस घेऊ नका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Live Updates : मविआच्या बैठकीनंतर नेते शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल

Swine Flu: महाराष्ट्रात स्वाईन फ्लूचा धोका वाढला; मलेरियानेही डोकं वर काढलं

Nitish Kumar Reddy, रिंकू सिंगची तुफान फटकेबाजी; भारताने बांगलादेशविरुद्ध उभारला द्विशतकीय डोंगर

PM Modi: फोर्टिफाईड तांदळाचं देशभरात होणार मोफत वितरण; केंद्र सरकारचा निर्णय, १७ हजार कोटींचा खर्च

INDW vs SLW : Smriti Mandhana, हरमनप्रीत कौरची वादळी खेळी; शफाली वर्माची फटकेबाजी, वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम धावसंख्या

SCROLL FOR NEXT