आजकाल लोकांची जीवनशैली इतकी व्यस्त झाली आहे की आजच्या या धकाधकीच्या काळात त्यांना स्वतःकडे लक्ष देण्यासाठी देखील वेळच नाही. जो बघा तो धकाधकीच्या जिवनात नुसता पळतच आहे आणि आपल्या सर्व गरज पूर्ण करण्याच्या मागे आपापल्यापरीने झटत आहे.
अश्या परिस्थितीत त्याला स्वतःकडे लक्ष द्यायला अजिबातच वेळ नाही. परिणामी शरीर बऱ्याच रोगांनी ग्रस्त होतो. आपले हृदय कमकुवत होऊ लागत. आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका संभवतो. त्यासाठी सर्वात गरजेचं आहे आपल्या व्यस्त असलेल्या धावपळीच्या जीवनशैली मधून थोडा वेळ काढणे आणि स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेच झालं आहे.
माणसाच्या अश्या बऱ्याच चुकीच्या सवयी असतात, जे हृदयाच्या रोगास कारणीभूत ठरतात. आपण जर का आपल्या या चुकीच्या सवयींना सोडलं आणि आपल्या हृदयाला बळकट बनवलं. तर या हृदयविकाराच्या झटका येण्याच्या धोक्याला बऱ्यापैकी कमी करू शकतो.
1) आपल्याला आपले हृदय बळकट करण्यासाठी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे धूम्रपान सोडणे गरजेचे आहे. धूम्रपान म्हणजे सिगारेट ओढणे आजकाल जणू फॅशनच बनले आहे. लोक आपल्या आरोग्याचा विचार न करता सिगारेट ओढण्याची सवय लावून घेतात, जी नंतर त्यांचा साठी हानिकारक ठरते. सिगारेट ओढल्याने कर्करोगासारख्या गंभीर आजार होण्याचा धोका वाढतच नाही, तर हे हृदयविकाराच्या झटका होण्याचे जोखीम देखील वाढवतो. म्हणून आपल्या हृदयाला निरोगी आणि बळकट ठेवायचे असल्यास आजच धूम्रपान करणं थांबवा.
2) दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वजन नियंत्रणात ठेवणे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जास्त वजन असल्यामुळे हृदय विकाराचा धोका वाढतो या व्यतिरिक्त इतरही अनेक रोग शरीराला वेढतात. म्हणून जर का आपल्याला आपल्या हृदयाला बळकट आणि निरोगी करावयाचे असल्यास, तर कमी चरबी आणि कमी साखरयुक्त आहार घ्या. तसेच, जास्तीत जास्त फळे आणि भाज्या खा आणि दररोज व्यायाम करा.
3) तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मद्यपान करणे सोडावे.
जास्त प्रमाणात मद्यपान करणे हे आरोग्यास हानिकारक असतं. या मुळे उच्च रक्तदाब आणि हृदयाशी निगडित आजार होण्याचा धोका वाढतो. जास्त मद्यपान केल्यानं हृदय कमकुवत होतं. म्हणून आपल्या हृदयाला बळकट करण्यासाठी मद्यपानाचे सेवन कमी करावं किंवा करूच नये. हे जास्त सोयीयस्कर आणि आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे.
4) चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दररोज किमान दोन लीटर पाणी पिणे.
पाणी आपल्या शरीरासाठी तेवढेच महत्त्वाचं आहे जेवढा महत्त्वाचा श्वास आहे. पाण्याच्या अभावामुळे माणसाला अनेक गंभीर आजार होऊ शकतात, तसेच हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता देखील वाढते. म्हणून दररोज किमान दोन लीटर पाणी प्यावं, जेणे करून शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये आणि आपण निरोगी राहाल, आपले हृदय बळकट होईल.
5) आरोग्य तज्ज्ञांच्या मते पाचवी महत्त्वाची गोष्ट , हृदय निरोगी ठेवण्यासाठी आपण आपल्या दररोजच्या आहारामध्ये बाजरीच्या भाकरींचा समावेश करायला हवा. बाजरी खाणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.
6) सहावी गोष्ट म्हणजे जास्त गोड पदार्थांचे अतिरिक्त सेवन टाळणे. काही लोकांना जास्त प्रमाणात गोष्ट पदार्थांचे सेवन करणे आवडते. मात्र, हृदय निरोगी ठेवण्यासाठी गोड कमी खा.
7) सातवी गोष्ट म्हणजे पुरेशी झोप घेणे. तुम्ही किमान 7 तास झोपू शकता आणि दररोज सकाळी लवकर उठू शकता. असे केल्याने शरीराचे चक्र शांत होते आणि मनही शांत राहते. यामुळे रात्री लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.