Akshay_Kumar_Aqua_Exercise Sakal
आरोग्य

खिलाडी अक्षय फिट राहण्यासाठी करतोय Aqua Exercise, तुम्हीही जाणून घ्या जबरदस्त फायदे

Aqua Exercise बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा वर्कआऊटचा नवीन व्हिडीओ पाहिला का?

Harshada Shirsekar

Aqua Exercise Benefits In Marathi : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आपल्या दमदार अभिनयासोबतच फिटनेसमुळेही नेहमीच चर्चेत असतो. अक्षय वर्काआऊट रूटीनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्यायामांचा समावेश करून फिटनेसच्या रूटीनमध्ये मुळीच खंड पडू देत नाही. 

अक्कीचं हे फिटनेसचे वेड त्याच्या चाहत्यांनाही चांगलंच माहिती आहे. नुकतेच त्याचा पाण्यात व्यायाम करतानाचा व्हिडीओ सोशल मीडिया व्हायरल झाला आहे. यामध्ये खिलाडी अक्की पाण्यामध्ये क्रंचेस (Crunches)सह व्यायामाच्या अन्य प्रकारांचाही सराव करत असल्याचे पाहायला मिळतेय. या व्यायाम प्रकारास 'अॅक्वा एक्सरसाइज' किंवा 'अॅक्वा वर्कआऊट' असे म्हणतात.

अॅक्वा एक्सरसाइज म्हणजे नेमके काय?

अॅक्वेटिक किंवा अॅक्वा एक्सरसाइज म्हणजे स्विमिंग पूलमधील पाण्यात केले जाणारे व्यायाम प्रकार. व्यायामाचा हा प्रकार तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यामुळे शरीराचे सांधे, गुडघे, हाडे, स्नायू मजबूत होण्यास मदत मिळते. 

पाण्यात एक्सरसाइज केल्याने शारीरिक दुखापत होण्याच्या शक्यताही कमी असतात. महत्त्वाचे म्हणजे शरीरातील अतिरिक्त कॅलरी देखील सहजासहजी बर्न होण्यास व वजन कमी होण्यासही मदत मिळते. जाणून घेऊया हा व्यायाम करण्याचे फायदे 

कार्डिओ व्यायामाचा उत्तम प्रकार 

वॉटर एरोबिक्स केल्यानं शरीरामध्ये ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीत होतो. शरीराला ऊर्जा मिळते. हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. चांगली झोप मिळते आणि उच्च रक्तदाबाची समस्या देखील नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. 

शरीराची ताकद वाढते

पाण्यामध्ये व्यायाम केल्यास शरीराचे स्नायू बळकट होण्यास मदत मिळते. यामुळे तुमच्या शरीराचे ताकद देखील वाढते. कारण या व्यायाम प्रकारामध्ये एका विशिष्ट लयबद्ध पद्धतीने व्यायाम केला जातो.

ताण कमी होण्यास मदत मिळते

वॉटर एरोबिक्स करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे शारीरिक व मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत मिळते. यामुळे शरीरामध्ये एंडोर्फिन (Endorphins) नावाच्या हार्मोनचा स्त्राव होतो, ज्यामुळे तणाव कमी दूर होण्यास मदत मिळते. महत्त्वाचे म्हणजे तुमचा मूड देखील फ्रेश होतो.

सांधेदुखीपासून आराम मिळतो

जीममध्ये व्यायाम करताना अनेकदा सांधेदुखीची समस्या निर्माण होते, याचा अनुभव आपण घेतला असेलच. पण अॅक्वा एक्सरसाइजमुळे सांधेदुखीची समस्या कमी होते. गुडघे, निंतब, घोटे संपूर्ण शरीराचे स्नायू मजबूत होण्यास मदत मिळते. 

कॅलरीज् बर्न होतात 

वजन कमी करण्यासाठी आपण नवा उपाय शोधत असाल तर वर्कआऊट रूटीनमध्ये अॅक्वा एक्सरसाइज समावेश करून पाहा. यामुळे शरीरातील अतिरिक्त कॅलरीज् बर्न होण्यास मदत मिळते.

आत्मविश्वास वाढतो

वॉटर एक्सरसाइज केल्यानं तुमचा आत्मविश्वास देखील वाढू शकतो. धकाधकीच्या लाइफस्टाइलमुळे हल्ली प्रत्येकजण इतके दमतात-थकतात कि कोणतीही नवीन गोष्ट शिकण्याची इच्छाच होत नाही. यामुळे आत्मविश्वासावरही परिणाम होतात. पण आत्मविश्वास वाढवायचा असेल तर अॅक्वा एक्सरसाइजची मदत घ्या. तुम्हाला शारीरिक व मानसिक आरोग्यात झालेले सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील. 

वयाची अट नाही

महत्त्वाचे म्हणजे हा व्यायाम करण्यासाठी वयाचीही अट नाहीय. कोणत्याही वयोगटातील महिला-पुरूष हा व्यायाम करू शकता. पण खबरदारी म्हणून तज्ज्ञमंडळी तसेच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT