Nasya Therapy  Sakal
आरोग्य

Nasya Therapy: मायग्रेन-डोकेदुखीपासून हवीय कायमची सुटका? घरच्या घरी करा रामबाण आयुर्वेदिक उपाय

Nasya Therapy Benefits: नस्य उपचार हे आयुर्वेदातील पाच शुद्धिकरण प्रक्रियांपैकी एक म्हणजे पंचकर्मांपैकी एक उपाय आहे. प्रामुख्याने डोके आणि त्याच्याशी संबंधित आजारांची समस्या करण्यासाठी हा उपाय केला जातो.

सकाळ डिजिटल टीम

नस्य थेरपी हा आयुर्वेदिक औषधोपचाराचा एक प्रमुख घटक आहे. मायग्रेन, सायनस, डोकेदुखीसह अनेक आजारांपासून मुक्तता मिळावी, म्हणून हा उपाय करण्याचा सल्ला तज्ज्ञमंडळींकडून दिला जातो. या औषधोपचार पद्धतीमध्ये औषधी तेल व आयुर्वेदिक सामग्रींचा समावेश केला जातो.

नस्य ही (Nasya Therapy Panchakarma) आयुर्वेदातील पंचकर्मातील पाच शुद्धिकरण प्रक्रियांपैकी एक आहे. ही प्रक्रिया केल्यास अनेक आजारांच्या समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते. प्रामुख्याने डोके व डोक्याशी संबंधित आजारांवर उपाय करण्यासाठी नस्य थेरपी केली जाते.  

नस्य थेरपी : आयुर्वेदिक औषधोपचार 

घरच्या घरी नस्य थेरपी सुरू करायची असेल तर त्यासाठी सर्वप्रथम आवश्यक ते साहित्य आणावे लागेल. नाकाचे औषधीय तेल, जे आपण कोणत्याही आयुर्वेदिक औषधांच्या दुकानातून घेऊ शकता. ड्रॉपर किंवा विशेष नस्य ऑइल अ‍ॅप्लिकेटर नस्य थेरपीकरिता ही सामग्री आवश्यक आहे.

तसंच झोपण्यासाठी आरामदायी जागाही गरजेची आहे. नस्य थेरपी हा आयुर्वेदिक औषधाचा एक प्रमुख घटक आहे. मायग्रेन, सायनस, डोकेदुखीसह अन्य आजारांच्या त्रासातून सुटका हवी असल्यास नस्य थेरपी करण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये औषधी तेल, अन्य हर्बल औषधे नाकावाटे शरीरामध्ये सोडले जातात.   

घरच्या घरी नस्य थेरपी कशी करावी?

  • सर्वप्रथम घरातील शांत व निवांत जागेची निवड करावी. 

  • तसंच या थेरपीसाठी आरामदायी स्थितीत जमिनीवर झोपावे. 

  • नाक स्वच्छ करून घ्यावे. 

  • हनुवटी किंचितशी वर करून डोक्याचा भाग थोडासा खालील दिशेला करून झोपावे.  

  • आता ड्रॉपर किंवा नस्य ऑइल अ‍ॅप्लिकेटरच्या मदतीने एक नाकपुडी बंद करून औषधी तेलाचे काही थेंब एका नाकामध्ये सोडावे. 

  •  ही प्रक्रिया सुरू असताना श्वासोच्छवासाची प्रक्रिया सुरूच ठेवावी. 

  • तेल नाकावाटे आत सोडल्यानंतर दीर्घ श्वास घ्यावा. जेणेकरून तेल शरीराच्या आतमध्ये पसरण्यास मदत मिळते.

  • दुसऱ्या नाकपुडीसाठीही हीच प्रक्रिया पुन्हा करावी 

  • नस्य प्रक्रिया झाल्यानंतर काही वेळ जमिनीवर झोपून राहावे. 

नस्य थेरपीमुळे मिळणारे फायदे   

  • नाक स्वच्छ करते - श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेत येणारे अडथळे दूर होऊन हवेचा प्रवाह सुधारण्यास मदत मिळते. 

  • रक्तभिसरण प्रक्रिया सुधारते - नस्य थेरपीमुळे नासिका मार्ग व आसपासच्या भागातील रक्तभिसरण प्रक्रिया सुधारते.  

  • डोकेदुखीपासून मिळतो आराम - डोकेदुखी, सायनस यासारख्या आजारांपासून सुटका मिळण्यास मदत मिळते. 

NOTE - नस्य थेरपी घरच्या घरी करण्यापूर्वी तज्ज्ञमंडळींचे मार्गदर्शन घ्यावे. त्याच्या देखरेखीअंतर्गत हा उपचार करून पाहावा व त्यांच्या सल्ल्यानंतर ही थेरपी घरी करावी. 

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT