Broccoli benefits for Diabetes esakal
आरोग्य

Health Tips : या पद्धतीने खा ब्रोकोली; Diabetes पेशंटना फायदा होणार म्हणजे होणारच!

ब्रोकोली खाण्याची योग्य पद्धत कोणती?

Pooja Karande-Kadam

Broccoli benefits for Diabetes : आपण जे जेवतो त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. हेल्दी लाइफकरता तुमचा आहारा महत्वाची भूमिका बजावत असतो. कारण आहारामुळे तुमच्या शरीरातील साखरेच्या पातळीवर परिणाम होतो. जर तुम्हाला मधुमेहाची लागण झाली असेल तर तुम्ही बॅलेन्स डाएट घेणे गरजेचे आहे.

ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनात हिरव्या पालेभाज्या मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगल्या असल्याचे आढळून आले आहे. इतके की ते टाइप 2 मधुमेहाचा धोका लक्षणीयरीत्या कमी करते.

मधुमेहींसाठी भाजीपाला इतर आरोग्यविषयक गुंतागुंत होण्याचा धोका कमी करण्यास देखील मदत करतात. पालेभाज्या मधुमेहींसाठी खूप उपयुक्त आहेत आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करतात.

जर्नल ऑफ ट्रान्सलेशनल मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास होत असेल तर तुम्ही भरपूर ब्रोकोलीचे सेवन केले पाहिजे. सहलग्रेन्स्का अकादमी, गोथेनबर्ग विद्यापीठातील मेडिसिन फॅकल्टी यांच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की, ब्रोकोलीचा अर्क टाइप 2 मधुमेहाची लक्षणे नियंत्रित करण्यासाठी प्रभावी ठरू शकतो. हे विशेषत: सल्फोराफेन नावाच्या अँटिऑक्सिडंट कंपाऊंडच्या उपस्थितीमुळे होते.

काय म्हणते संशोधन

संशोधकांनी प्रयोगाच्या पहिल्या टप्प्यात मधुमेही उंदरांना सल्फोराफेनचा अर्क दिला. सल्फोराफेनने यकृताच्या पेशी, रक्तातील साखर आणि ग्लायकेटेड हिमोग्लोबिनमध्ये ग्लुकोजची वाढ थांबवली. संशोधकांनी 12 आठवडे टाइप 2 मधुमेह असलेल्या 97 सहभागींना ब्रोकोलीचा अर्क दिला. रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते, असेही या प्रयोगात दिसून आले.

मधुमेहामध्ये ब्रोकोली खाणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी अधिक फायदेशीर आहे. खरं तर, ब्रोकोलीचा ग्लायसेमिक इंडेक्स 15 आहे, ज्यामुळे ते मधुमेहाच्या रुग्णांसाठीच बनवले गेले असेल. याशिवाय, त्याची एक खास गोष्ट म्हणजे यात भरपूर फायबर असते, ज्यामुळे रक्तातील साखर कमी होण्यास मदत होते.

स्वादुपिंडाच्या कार्याला गती देते

मधुमेहामध्ये ब्रोकोलीचे सेवन अनेक प्रकारे फायदेशीर आहे. हे प्रत्यक्षात स्वादुपिंडाचे कार्य सुरळीत ठेवते. इन्सुलिनचे उत्पादन वाढवते आणि अशा प्रकारे साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत करते.

हृदयविकारांपासून बचाव

मधुमेहाच्या रुग्णांना उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका जास्त असतो. त्यामुले प्रोटीनने भरपूर असलेली ब्रोकोलीसारखे हृदयाचे कार्य व्यवस्थित राखण्यात मदत करते. ब्रोकोलीत असलेली शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांव्यतिरिक्त, ग्लूटाथिओन संपूर्ण शरीरातील पेशींचे नुकसान टाळते आणि हृदयरोगापासून संरक्षण करण्यास मदत करते.

ब्रोकोली खाण्याची योग्य पद्धत

ब्रोकोली पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. यामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, लोह, प्रोटीन आणि पोटॅशियम असते. शिजवलेल्या ब्रोकोलीच्या 1/2 कप सर्व्हिंगमध्ये फक्त 27 कॅलरीज आणि 3 ग्रॅम कार्बोहायड्रेट असतात. त्यामुळेच मधुमेहाचा त्रास असलेल्या लोकांची ही पहिली पसंती असते.

विशेष म्हणजे ब्रोकोली कच्ची आणि शिजवून दोन्हीही खाता येते. ब्रोकोलीमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन अँटीऑक्सिडंट आढळतात, जे डोळ्यांचे आजार बरे करण्यासाठी देखील फायदेशीर आहेत.

मधुमेहाला दुर ठेवायचे असल्यास तुम्हाला मधुमेह असेल तर ब्रोकोली उकळवून त्यावर थोडे मीठ घालून सेवन करा. रात्रीच्या जेवणात याचा समावेश केल्यास ते आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT