Health Tips esakal
आरोग्य

Health Tips : किचनमधील हा मसाला करेल तुमची BP ची कायमची गोळी बंद?

तुमची BP ची गोळी कायमची बंद होईल?

Pooja Karande-Kadam

Health Tips : भारतात उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याचे कारण म्हणजे बाकीच्या देशांच्या तुलनेत भारतात जास्त मीठ खाल्ले जाते. खारट पदार्थांमध्ये सोडियमचे प्रमाण खूप जास्त असते ज्यामुळे अनेक समस्या उद्भवतात. याशिवाय जे लोकं जास्त तेलकट किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ खातात त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल जमा होऊ लागते.

यामुळे ब्लॉकेज होऊन रक्तप्रवाहात समस्या निर्माण होतात. अशा स्थितीत रक्ताला हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी खूप बळ द्यावे लागते, याला उच्च रक्तदाब म्हणतात. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो. वास्तविक, उच्च बीपीमध्ये रक्तवाहिन्या प्रभावित होतात आणि त्याचा दाब हृदयावर पडतो.

यामुळे आपण अशा पदार्थांचे सेवन केले पाहिजे, जे रक्तवाहिन्यांच्या भिंतींचा विस्तार करण्यास आणि रक्त परिसंचरण सुधारण्यास मदत करतात. प्रत्येक घरात एक तरी BP चा पेशंट असतोच. त्यांना असलेली पथ्य पाणी सांभाळताना बाकीच्यांचे हाल होतात. त्या व्यक्तीलाही हा आजार नकोसा होतो. या गंभीर आजारावर एक छोटी वस्तू तुमची मदत करेल.

प्रत्येक किचनमध्ये मसाल्यांमध्ये दालचिनी असते. दालचिनी उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर आहे. तुमची BP ची गोळी दालचिनीच बंद करेल. कसे ते पाहुयात.

एका संशोधनात, उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी, सिस्टोलिक आणि डायस्टोलिक रक्तदाब कमी करण्यासाठी दालचिनी प्रभावी असल्याचे आढळले आहे. दालचिनीमध्ये Cinnamomum zeylanicum नावाचा एक घटक असतो,जो उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी प्रभावीपणे कार्य करते.

हे एक घटक आहे, जो रक्तवाहिन्यांच्या भिंती पसरवते आणि रक्त परिसंचरण आराम करते. तसेच, हे एक संयुग आहे जे रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेले कोलेस्टेरॉल विरघळण्यास मदत करते, त्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या कमी करण्यास मदत होते.

हाय बीपीमध्ये दालचिनीचे सेवन कसे करावे –

तुम्ही BP मध्ये दालचिनीचे अनेक प्रकारे सेवन करू शकता. पण, त्याचा चहा सर्वात प्रभावी आहे. होय, हा चहा बनवण्यासाठी दालचिनी बारीक करून पाण्यात उकळा आणि नंतर कपमध्ये गाळून घ्या. आता या चहामध्ये मध घालून सेवन करा. हे प्यायल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित आणि कमी होण्यास मदत होते.

त्यामुळे जर तुम्हाला हाय बीपीची समस्या असेल तर तुम्ही दालचिनीचा चहा प्यावा. तसेच, तुम्ही दालचिनी बारीक करून गरम पाण्यात मिसळून सेवन करू शकता.

दालचिनीसोबत ही फळ उपयोगी

  • उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी केळी जरूर खावी, हे एक सामान्य फळ आहे आणि अनेकांना ते आवडते. या फळामध्ये भरपूर पोटॅशियम आढळते, ज्यामुळे हायपरटेन्शनची समस्या कमी होते.

  • रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण संत्री खातो, कारण त्यात व्हिटॅमिन सी भरपूर असते. संत्र्यामध्ये लिंबूवर्गीय ऍसिड असते आणि ते रक्तदाब वाढण्यापासून प्रतिबंधित करते.

  • ‘रोज एक सफरचंद खाल्ल्यास डॉक्टरकडे जाण्याची गरज भासणार नाही’ हे आपण अनेकदा ऐकले आहे. हे अँटीऑक्सिडंट्सचा समृद्ध स्रोत आहे ज्यामुळे शरीराच्या अनेक समस्या दूर होतात, तसेच रक्तदाब रुग्णांसाठी हे कोणत्याही औषधापेक्षा कमी नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मानखुर्द विधानसभेत नवाब मलिक पिछाडीवर, अबू आझमी आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT