रक्तवाहिन्यांची स्वच्छता Esakal
आरोग्य

रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवण्यासाठी हर्बल Detox Water, नियमित सेवनाने कोलेस्ट्रॉलची चिंता होईल दूर

रक्तवाहिन्यांचं कार्य सुरळीत चालावं यासाठी रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉल शरीरातून बाहेर फेकलं जाणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही काही घरगुती डिटॉक्स ड्रिंकचं नियमितपणे सेवन करू शकता. ज्यामुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याचा धोका कमी होईल

Kirti Wadkar

रक्तात वाढणारं कोलेस्ट्रॉल Cholesterol ही सध्या एक वाढत जाणारी समस्या निर्माण झाली आहे. अगदी तरुण वयापासूनच वाढत्या कोलेस्ट्रॉलमुळे आरोग्य धोक्यात येत असल्याचं सध्या पाहायला मिळतंय. अयोग्य आहार आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे Life Style ही समस्या दिवसेंदिवस अधिक वाढताना दिसतेय. Health Tips Cleaning of Blood vessels by detox water

कोलेस्ट्रॉलच्या समस्येवर वेळीच उपाय किंवा उपचार न केल्यास हृदया विकाराच्या गंभीर समस्या निर्माण होवू शकतात. अनकेदा रक्तात वाढलेल्या बॅड कोलेस्ट्रॉलमुळे Cholesterol किंवा वाढलेल्या ट्राइग्लिसराइडमुळे रक्तवाहिन्या Blood Vessels ब्लॉक होवू शकतात. याचा थेट परिणाम हा रक्ताभिसरणावर होतो.

परिणामी हृदयावर त्याचा दबाव निर्माण होवून उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते. तसंच हार्ट अॅटॅकचा धोका देखील यामुळे वाढतो. रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्याने त्याचे आरोग्यावर इतरही गंभीर परिणाम दिसू शकतात.

रक्तवाहिन्यांचं कार्य सुरळीत चालावं यासाठी रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉल शरीरातून बाहेर फेकलं जाणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही काही घरगुती डिटॉक्स ड्रिंकचं नियमितपणे सेवन करू शकता. ज्यामुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याचा धोका कमी होईल.

हे देखिल वाचा-

हर्बल डिटॉक्स वॉटर

रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉल दूर करण्यासाठी तुम्ही घरच्या घरी हर्बल डिटॉक्स वॉटर तयार करू शकता artery cleansing drink recipe. यासाठी तुम्हाला ५ गोष्टींची आवश्यकता आहे. या डिटॉक्स वॉटरसाठी तुम्हाला आलं, लसूण, लिंबू, मध आणि ऍपल सायडर व्हिनिगर लागेल.

हे ड्रिंक तयार करण्यासाठी एका पातेल्यात २ कप पाणी घ्या. त्यात एक आल्याचा तुकडा आणि २ लसणाच्या पाकळ्या टाका आणि चांगलं उकळू द्या. हे आटून अर्ध म्हणजेच साधारण १ कप झाल्यावर गॅस बंद करा. त्यातंनर यामध्ये १ चमचा ऍपल सायडर विनेगर, १ चमचा मध आणि १ चमचा लिंबाचा रस मिसळून या ड्रिंकचं सेवन करा.

कधी करावं हर्बल डिटॉक्स ड्रिंकचं सेवन

या डिटॉक्स ड्रिंकचं सेवन सकाळी उपाशी पोटी करावं. महिन्यातून केवळ २ आठवडे या ड्रिंकचं सेवन करा. यात तुम्ही काही दिवसंचं अतंर ठेवून डिटॉक्स वॉटरचं सेवन करावं.

हर्बल डिटॉक्स वॉटरचे फायदे

कोलेस्ट्रॉलची समस्या होईल दूर- या डिटॉक्स वॉटरमुळे रक्तवाहिन्यांचे तापमान वाढण्यास मदत होते. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये साचलेलं बॅड कोलेस्ट्रॉल वितळून ते शरीराबाहेर टाकणं सोपं होतं. यामुळे रक्तवाहिन्या स्वच्छ होतात आणि हाय कोलेस्ट्रॉलची समस्या कमी होते.

रक्तवाहिन्या स्वच्छ झाल्याने ब्लॉकेजचा धोका टळतो आणि अर्थाच हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका देखील कमी होतो.

रक्तवाहिन्या निरोगी राहण्यात मदत- रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यासाठी हे डिटॉक्स ड्रिंक अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे तुमच्या रक्तवाहिन्या मजबूत होतात आणि त्यांना निरोगी ठेवण्यास मदत होते. तसचं रक्ताभिसरणाचं कार्य सुरळीत होतं.

या ड़िटॉक्स ड्रिंकमुळे उच्च रक्तदाबाची समस्या कमी होते. परिणामी स्ट्रोकचा धोका कमी होतो. एकंदरचं हृदयाचं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी हे हर्बल डिटॉक्स वॉटर अत्यंत गुणकारी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT