Health Tips esakal
आरोग्य

Health Tips : हे दोन पाँईंट दाबा आणि शुगर पूर्ण कंट्रोल करा

शरीरात इन्शुलिन तयार करणाऱ्या पॅनक्रीयाजचे पाँईंटस दोन्ही हाताच्या तळव्यांत असतात. ते पाँईंटस कोणते, आसने कोणती याविषयी माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

ॲक्यूप्रेशरचे पाँईंट्स दाबवल्यावर फायदा झाल्याचा अनेकांना अनुभव आहे. पायाचे तळवे व हाताचे तळवे यावर संपुर्ण शरीराचे बहुतेक पाँईंट्स असून ते दाबले की, दुखणे बरे होते. शुगर कंट्रोल करण्यासाठी दोन्ही हातांच्या तळव्यांमध्ये त्याचे पाँईंट्स असतात. ते रोज दाबलेत तर शुगर पुर्ण कंट्रोल होते. यासाठी तज्ज्ञ न्यूरोपॅथ केवल कृष्ण यांनी काही आसने, मुद्रा आणि ॲक्यूप्रेशरचे पाँईंटस सांगितले आहेत.

जाणून घेऊया याची पध्दत

अपान मुद्रा (Apan Mudra)

शुगर कंट्रोल करण्यासाठी करायच्या आसनांसाठी वज्रासन, सूखासन किंवा पद्मासनात बसावे. ज्यात तुम्ही कंफर्टेबल असाल त्यात बसावे. यात अपान मुद्रा करावी. हाताचे मधले बोट (मध्यामा) व त्या शेजारील बोट (अनामिका) या दोन बोटांच्या टिपांना अंगठ्याने स्पर्श करावे आणि तर्जनी व करंगळी ताठ ठेवावे. ही मुद्रा दोन्ही हातांनी रोज ४५ मिनीट करावी. या मुद्रेने पोटाचे अनेक आजार बरे होतात.

योगमुद्रासन (Yogmudrasan)

वज्रासन, सूखासन किंवा पद्मासनात बसावे. दोन्ही हात पाठीनागे घेऊन डाव्या हाताची मूठ आवळा आणि उजव्या हाताने डाव्या हाताचे मनगट पकडा. हात मागे खेचून मोठा श्वास घ्यावा. नंतर श्वास सोडत पुढे वाकावे. नंतर परत श्वास घेत उठावे आणि श्वास सोडत डावीकडे जमिनीच्या दिशेने झुकावे. हिच क्रिया उजव्या बाजुनेपण करावी.

मंडुकासन (Mandukasan)

वज्रासन, सूखासन किंवा पद्मासनात बसावे. दोन्ही हाताच्या अंगठा आत घेऊन मुठी वाळाव्या. बेंबीच्या शेजारी दोन्ही मुठी हलक्याशा दाबाव्या. नंतर श्वास सोडत नजर समोर ठेऊन शक्य तेवढे जास्त खाली वाकावे. हे अजून एका पध्दतीने करता येते. यात मुळ बांधण्या ऐवजी एकदा डावा हात बेंबीवर ठाऊन त्यावर उजवा हात ठेवावा व श्वास सोडत खाली वाकावे. तसच उजवा हात आधी मग डावा हात ठेऊन ही प्रक्रिया करावी.

पँक्रियाज पाँईंट्स

हाताच्या तळव्यावर पंजाच्या मध्यभागी खोलगट भागात हा पाँईंट असतो. उजव्या हाताने डाव्या हाताचा व डाव्या हाताने उजव्या हाताचा हा पाँईंट एक-एक मिनीटांसाठी रोज दाबावा.

तसच तीन पाँईंट्स डाव्या हाताच्या मधल्या बोटात असतात. मधल्या बोटाच्या टिपवर एक तर दोन पाँईंट्स मधल्या बोटावर मधल्या पेराच्या वरील बाजूस असतात. हे पाँईंट्स रोज एक मिनीट दाबावे.

हे सर्व आसन, मुद्रा आणि ॲक्यूप्रेशरचे पाँईंटस दाबणे हे तुम्ही जेवल्यावर किंवा जेवणा आधी कधीही करू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar NCP Second List: अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर! सात नव्या उमेदवारांची घोषणा, वडगाव शेरीचंही ठरलं

शाहरुखच्या 'चक दे इंडिया'च्या बदललेल्या कथेवर अन्नू कपूर संतापले; म्हणाले- मुस्लिम चांगला दाखवून पंडितांची थट्टा...

Share Market Opening: शेअर बाजारात घसरण सुरुच; निफ्टी 24,400च्या खाली, कोणते शेअर्स कोसळले?

Share Market Today: आज कोणते शेअर्स असतील तेजीत? जागतिक बाजारात काय आहेत संकेत?

Ajit Pawar NCP: अजित पवार यांचा धडाका! काँग्रेससह भाजपलाही दिला धक्का; दोन माजी खासदारांसह आमदार राष्ट्रवादीत

SCROLL FOR NEXT