Health Tips esakal
आरोग्य

Health Tips : थायरॉईड दूर ठेवायला मदत करतील या बिया; रोज खा आणि फिट रहा

थायरॉईड हा आजकाल एक सामान्य आजार झाला आहे. हा आजार कोणत्याही वयात कोणालाही होऊ शकतो.

सकाळ डिजिटल टीम

Thyroid Treatment : तुमच्या कुटुंबातील कोणी अचानक वजन वाढणे, केस गळणे, थकवा, अपचन, नैराश्याने ग्रस्त आहे का, तर कदाचित ही समस्या थायरॉइडच्या विकारांमुळे उद्भवलेली असू शकते. थायरॉईड हा आजकाल एक सामान्य आजार झाला आहे. हा आजार कोणत्याही वयात कोणालाही होऊ शकतो.

या आजारात प्रकारची लक्षणे दिसू लागतात, जसे की अति थकवा येणे, केस गळणे, वेळेवर मासिक पाळी न येणे, तणाव इत्यादी. याशिवाय घाम येणे, वारंवार भूक लागणे ही देखील थायरॉईडची लक्षणे आहेत. तसेच, बद्धकोष्ठता असणे,शरीराचं वजन कमी जास्त होत राहतं,हात पाय थंड पडतात, त्वचा कोरडी पांढरी पडते, जीवनात तणाव वाटतो, वाढता आळशीपणा, शारीरिक आणि मानसिक विकासात अडथळे, केस गळणे

थायरॉइड त्रासाच्या प्रकारानुसार थायरॉइडची लक्षणे असतात. हायपरथायरॉइडिझम असल्यास झोपेच्या तक्रारी, दुर्बलता, वजन कमी होणे, थायरॉइडचा आकार वाढणे, अधिक गरम वाटणे, मासिक पाळीच्या तक्रारी सुरू होणे अशी लक्षणे जाणवतात. तर हायपोथायरॉईडची समस्या असल्यास लठ्ठपणा, पोट साफ न होणे, थकवा, केस गळणे, थंडी अधिक जाणवणे अशी लक्षणे हायपोथायरॉइडिझममध्ये जाणवतात.

थायरॉईड ग्रंथी थायरॉक्सिन नावाचे हार्मोन तयार करते. हा हार्मोन शरीरातील मेटाबॉलिज़्म वाढवतो आणि शरीरातील पेशी नियंत्रित करतो.शरीरात आयोडीनच्या कमतरतेमुळे थायरॉईडची समस्या उद्भवते. डाउन टू अर्थच्या अहवालानुसार, आपल्या देशात ४० दशलक्ष लोक या आजाराने ग्रस्त आहेत.

थायरॉईड ग्रंथी पुरेशा प्रमाणात हार्मोन्स तयार करू शकत नाही, ज्यामुळे शरीरात अनेक समस्या उद्भवू लागतात. थायरॉईडपासून बचाव करायचा असेल तर या आजाराची लक्षणे समजून घ्या आणि काही आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश करा.

थायरॉइड ग्रंथीची होणारी अनिर्बंध वाढ म्हणजे गलगंड. हायपो किंवा हायपर थायरॉइडिझममध्ये ही स्थिती येऊ शक . तसेच, आयोडिनची मात्रा कमी झाल्यानेही गलगंड होतो.

सुर्यफुलाच्या बिया

थायरॉईड असलेल्या लोकांमध्ये हार्मोनल असंतुलन कायम राहते. थायरॉईडच्या रुग्णांसाठी सूर्यफुलाच्या बिया फायदेशीर असतात. कारण सूर्यफुलाच्या बियांमध्ये कॅलरी कमी आणि सेलेनियम जास्त असते.

फ्लेक्ससीड

थायरॉईडच्या रुग्णांसाठी फ्लेक्ससीड्समध्ये भरपूर पोषक घटक असतात. तुम्ही रोज जवसाच्या बियांचे सेवन करू शकता. त्यामुळे थायरॉईड नियंत्रण राहते.

चिया सिड्स

चिया सिड्स सुपरफूड मानल्या जातात. यामध्ये असे अनेक घटक असतात जे तुमचे थायरॉइड नियंत्रित करण्याचे काम करतात.

भोपळ्याच्या बिया

थायरॉईडच्या रुग्णांनी भोपळ्याच्या बियांचे सेवन करावे. भोपळ्याच्या बियांमध्ये झिंकचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे थायरॉईडच्या रुग्णांसाठी ते चांगले मानले जाते.

तिळ

तिळामध्ये जिंक आणि कॉपर दोन्ही असतात. तीळ थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी औषधाप्रमाणे काम करतात.

जवस

जवसामध्ये कॅलरीज, सोडियम, पोटॅशियम, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम तसेच ओमेगा ३ फॅटी अॅसिड असतात, जे थायरॉईड नियंत्रित करतात, तसेच वजन वाढू देत नाहीत.

नारळ

थायरॉईडच्या रुग्णांनी नारळाचे सेवन केल्यास चयापचय क्रिया वाढेल, तसेच थायरॉइडच्या समस्येपासून सुटका मिळेल. खोबरे कच्चे, खोबरेल तेल, चटणी आणि लाडू बनवण्यासाठी तुम्ही वापरू शकता.

ज्येष्ठमध

ज्येष्ठमधामध्ये ट्रायटरपेनॉइड ग्लायसिररेटिनिक ऍसिड असते, जे थायरॉईड कर्करोगाच्या पेशी नष्ट करते, तसेच ते नियंत्रित करते.

मशरूम

जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध मशरूम थायरॉईडच्या रुग्णांसाठी खूप उपयुक्त आहेत. वजन नियंत्रित ठेवण्यासोबतच मशरूम थायरॉईड देखील नियंत्रित करते.

हळदीचे दूध

औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली हळद थायरॉईडच्या रुग्णांसाठी खूप गुणकारी आहे. हळदीसोबत दुधाचे सेवन केल्याने थायरॉईड नियंत्रण राहते, तसेच अनेक आजारांवर उपचार होतात. रोज झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधात हळद टाकून प्या.

कोथिंबीर

धन्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. दररोज एका ग्लास पाण्यात २ चमचे संपूर्ण धणे घाला आणि रात्रभर भिजवा. ही कोथिंबीर सकाळी पाण्यात पाच मिनिटे उकळवा आणि नंतर गाळून सेवन करा, फायदा होईल.

थायरॉईडसंबंधी काही महत्त्वाचं

  • थायरॉईडचं सर्वात सामान्य कारण म्हणजे ग्रॅव्हज रोग. हा एक ऑटोइम्यून रोग आहे ज्यात अँटीबॉडीज थायरॉईड ग्रंथीला जास्त प्रमाणात थायरॉईड हार्मोन्स तयार करण्यासाठी उत्तेजित करतात.

  • थायरॉईडची समस्या शरीरात आयोडीनच्या अत्यधिक कमतरतेमुळे उद्भवते. गर्भधारणेदरम्यान, महिलेच्या शरीरात हार्मोनल बदल होतात. यापैकी काही हार्मोन्समधील बदलांमुळे हायपरथायरॉईडीझम होऊ शकते.

  • जे लोक खूप ताणतणावाखाली असतात त्यांना थायरॉईडची जास्त शक्यता असते, म्हणूनच तणाव कमी करण्यासाठी लोकांनी प्रयत्न केला पाहिजे.

  • ज्या लोकांना उच्च रक्तदाब किंवा कमी रक्तदाब समस्या आहे, त्यांना थायरॉईड होण्याचा धोका जास्त असतो.

  • थायरॉईडची ही समस्या बहुधा बाळाला जन्म दिल्यानंतर आईला येते, पण काही काळानंतर ती स्वतःच सुधारते. पण ते कमी झालं नाही तर थायरॉईड गंभीर समस्या बनते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: ...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

IND vs AUS : स्टंपकडे जाणारा चेंडू लबूशेनने रोखला, सिराज चांगलाच चिडला; कोहलीने तर बेल्सच उडवल्या..काय हा प्रकार

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

IND vs AUS: पर्थ कसोटीत ऋषभ पंतसोबत IPL ऑक्शनची चर्चा; हाय व्होल्टेज सामन्यातील दोन्ही संघातील खेळाडूंच्या संवादाचा Video Viral

Ram Naik : अलीकडच्या राजकारणात एकमेकांना नाव ठेवण्याची स्पर्धा : राम नाईक यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT