Cucumber For Weight Loss Sakal
आरोग्य

Cucumber For Weight Loss काकडी अशा पद्धतीने खाल्ल्यास वाढलेले वजन झटपट होईल कमी

Cucumber For Weight Loss: शरीराचे वाढलेले वजन कमी करण्यासाठी काकडीचे सेवन खूप फायदेशीर मानले जाते. आपल्याला फक्त काकडी खाण्याची योग्य पद्धत आणि योग्य वेळ माहीत असणे आवश्यक आहे.

सकाळ डिजिटल टीम

धकाधकीच्या युगात खाणपिण्याच्या सवयी व चुकीच्या लाइफस्टाइलमुळे लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढत आहे. लठ्ठपणामुळे कित्येक गंभीर आजारांचीही लागण होण्याची भीती असते. या समस्या टाळण्यासाठी आहाराची विशेष काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. शरीराचे वाढलेले वजन झटपट कमी करायचे असल्यास डाएटमध्ये काकडीचा समावेश नक्की करावा. 

यामुळे शरीरात पाण्याची कमतरताही निर्माण होत नाही आणि वजन देखील कमी होण्यास मदत मिळते. तसंच काकडीमुळे शरीराला थंडावा मिळतो व पोटाशी संबंधित सर्व समस्या देखील कमी होतात.

काकडीमध्ये आरोग्यास पोषक असणारे अँटी-डायबेटिक, अँटी-ऑक्सिडंट्स,  व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि इतर पोषक घटकांचा मोठा साठा आहे. जे शरीराचे वजनही नियंत्रणात ठेवण्यात उपयुक्त ठरू शकतात. काकडीचे कशा पद्धतीने सेवन केल्यास लठ्ठपणाची समस्या कमी होऊ शकते, जाणून घेऊया सविस्तर...

काकडीच्या सेवनामुळे आरोग्यास कोणते फायदे मिळतात?

  • काकडीमध्ये कॅलरी व फॅट्सचे प्रमाण कमी असते. ज्यामुळे शरीराचे वजन कमी होण्यास मदत मिळते. 

  • बद्धकोष्ठता व पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी काकडीचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते. 

  • काकडीमध्ये फायबर व पाण्याचेही प्रमाण खूप असते, म्हणूनच वेटलॉस करण्यासाठी डाएटमध्ये काकडीचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.  

  • नैसर्गिक स्वरूपात शरीर डिटॉक्स करायचे असेल तर काकडीचे सेवन करणं फायदेशीर मानले जाते. काकडीतील पोषणतत्त्वांमुळे शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर सहजरित्या फेकले जातात. 

काकडीचे सेवन करण्याची योग्य पद्धत

काकडीची कोशिंबीर

वजन कमी करण्यासाठी तुम्ही काकडीचे सॅलड करून खाऊ शकता. काकडीची कोशिंबीर शरीराचे वजन कमी करण्यासाठी प्रभावी उपाय आहे. सकाळी आणि दुपारच्या जेवणात कोशिंबीरचे सेवन करणे चांगले मानले जाते. काकडीची कोशिंबीर पोळी-भाजीसह खाल्ल्यास तुमचे पोट भरेल आणि यामुळे वारंवार भूक लागण्याची समस्या निर्माण होणार नाही.

काकडीचे सूप

वजन कमी करण्यासाठी तुम्ही काकडीचे सूप देखील पिऊ शकता. काकडीचे सूप आरोग्यासाठीही फायदेशीर आहे, शिवाय या पदार्थाची पाककृतीही सोपी आहे. सूप तयार करण्यासाठी चार काकड्या, एक कप दही, दोन ते तीन चमचे मेथीची ताजी पाने,  एक कप पाणी, एक चमचा लिंबाचा रस ही सामग्री आवश्यक आहे. सूप तयार करण्यासाठी सर्व सामग्री किसून घ्या व पाण्यात उकळा. तयार झाले हेल्दी सूप. आपण हे सूप गरम किंवा थंड करूनही पिऊ शकता.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT