आजूबाजूला तुम्ही अनेकदा पाहिले असेल की वयाची चाळीशी ओलांडलेल्या लोकांची हाडे कमकुवत होऊ लागतात. महत्वाचे म्हणजे महिलांच्या शरीरात हे जास्त दिसून येते. हाडे जेव्हा कमकुवत होतात तेव्हा तुम्हला दैनंदिन जीवनातील महत्वाचे कामे करण्यास देखील त्रास होऊ शकतो, त्यामुळे आपण आरोग्याची काळजी घेणे आणि त्याची तयारी आत्तापासूनच सुरू करणे खूप महत्वाचे आहे.
या गोष्टी खाल्ल्याने हाडे होतील मजबूत
तुमची हाडे वयाच्या चाळीशीनंतरही मजबूत राहावीत असे वाटत असेल तर तुम्हाला त्यासाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी सह अनेक पोषक तत्वावर आधारित खाद्यपदार्थ खावे लागतील. तुम्ही हाडांच्या आरोग्यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश केला पाहिजेत ते बघूया.
हिरव्या पालेभाज्या
दूध आणि दुग्धजन्य पदार्थ
ओट्स
खिचडी
संपूर्ण धान्य
फळे
गाजर
वाटाणे
मखाना
अंजीर
कोशिंबीर
शेंगदाणे
अंडी
रताळे
मशरूम
मुळा
पालक
‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष
महत्वाचे म्हणजे तुम्ही जेवणादरम्यानच कोशिंबीर खा जेणेकरून भरपूर फायदे मिळतील.
2 वेळा दिवसातून दूध प्या कारण ते कॅल्शियमयुक्त सुपरफूड आहे.
तुम्ही कमी चरबीयुक्त पदार्थही खाऊ शकता.
तुम्हाला जर दूध आवडत नसेल तर तुम्ही डाळ नियमित खा.
तसेच अंडी आणि मांसाहारी पदार्थ खाल्ल्याने देखील हाडांना फायदा होईल.
8 ते 10 ग्लास पाणी दिवसातून प्यावे.
तुम्हाला हवं तर फळांचा रसही पिऊ शकता.
रोज किमान अर्धा तास चालणे किंवा वर्कआउट करणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.