भारतात अनेकांच्या दिवसाची सुरुवातच चहाने होतो. देशात चहा पिणाऱ्याची संख्या मोठी आहे. मग तो दुधाचा चहा असो किंवा ग्रीन टी, ब्लॅक टी Black Tea तुलसी टी किंवा कावा विविध प्रकारच्या चहाचं सेवन आपल्या देशात केलं जातं. Health Tips Marathi Black Tea danger to Kidney Health
खास करून ब्लॅक टी आणि दुधाच्या चहाचं Black Tea and Milk Tea अनेकजण मोठ्या आवडीने सेवन करतात. चहा हा आरोग्यासाठी घातक आहे हे ठाऊक असूनही दिवसातून एक कप तरी चहाचं सेवन केलंच जातं. दूध आणि साखरेचा चहा तर आरोग्यासाठी अधिकच घातक आहे.
यामुळे मधुमेह Diabetes आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येसोबतच इतरही अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. यालाच पर्याय म्हणून गेल्या काही वर्षामध्ये अनेकांनी आपला मोर्चा ब्लॅक टी म्हणजेच काळ्या चहाकडे वळला आहे.
खासकरून पित्त होवू नये, रिफ्रेश वाटावं किंवा वजन कमी करण्यासाठी अशा विविध उद्देशाने अनेकजण ब्लॅक टीमध्ये लिंबाचा रस टाकून सेवन करतात. मात्र, अनेकांना आरोग्यासाठी चांगली वाटणाऱ्या या लेमन टीमुळे देखील तुम्हाला किडनीच्या समस्यांसोबतच इतर आरोग्याच्या समस्या निर्माण होवू शकतात.
हे देखिल वाचा-
काळा चहा आणि लिंबू
गेल्या काही वर्षात अनेकांना दुधाच्या चहाचे आरोग्यासाठी दुष्परिणाम असल्याचं कळताच ब्लॅक टीचं सेवन करण्यास सुरूवात केली. शिवाय करोना काळापासून व्हिटॅमिन सी Vitamin C चं महत्व वाढल्याने ब्लॅक टीमध्ये लिंबू पिळून अनेकजण या चहाचं सेवन करू लागले आहेत.
व्हिटॅमिन सी हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासोबत, हाडं मजबूत होण्यास, त्वचा आणि केसांसाठी ते लाभदायक आहे. मात्र काळ्या चहासोबत लिंबाचं सेवन केल्यास किडनीच्या समस्या निर्माण होवू शकता. यामुळे मूतखडा होण्याची दाट शक्यता असते तसंच किडनीच्या कार्यप्रणालीवर परिणाम होवू शकतो.
अभ्यासातून असं समोर आलं आहे की जे लोक गरजेपेक्षा जास्त लिंबू टाकलेल्या ब्लॅक टीचं सेवन करतात त्यांच्यात कॅरेटिनिनची Creatinine) पातळी वाढू शकते. साधारणपणे ही पातळी १ हून कमी असणं गरजेचं असतं.
Vitamin C चे दुष्परिणाम
शरीरासाठी व्हिटॅमिन सी हे गरजेचं असलं तरी गरजेपेक्षा जास्त व्हिटॅमिन सी चं सेवन केल्यास शरीरामध्ये ऑक्सिलेटचं प्रमाण वाढू शकतं. परिणामी यामुळे किडनी इंफेक्शन किंवा किडनी निकामी होण्याचा धोका वाढतो.
तज्ञांच्या मते कोणत्याही गोष्टीचं अतिसेवन हे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. यामुळेच आरोग्याची काळजी घेत असताना कोणत्याही गोष्टीचं अतिसेवन टाळावं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.